नवऱ्याच्या सर्व अंत विधी झाल्यानंतर तिच्या मनातील भाव…
टीम आपलं मानसशास्त्र
किती सोप होत तुझ्यासाठी हे जग सोडून जाणं.. किती सहज तू आम्हाला, तुझ्या बायकोला आणि इवल्याशा लेकराला सोडून गेलास.. तू असताना जे दिवस काढले त्यामधे कितीही वाईट वेळ आली तरी माझं सौभाग्य माझ्यासोबत आहे यामुळे धीर मिळायचा..
लग्नाच्या सुरवातीला जे चार क्षण सुखात घालवले त्यातच समाधान मानलं होत म्हणून ना गाडी बंगल्याची कधी अपेक्षा केली ना कोणत्या सुखाची अपेक्षा केली…
तू माझ्यासोबत कायम राहाव.. माझं मन जपावं अस एका क्षणाला वाटायचं सुद्धा पण नंतर तुझ काम तुझ्या जबाबदाऱ्या यातून तुझी इतकी दमछाक व्हायची की पुढे मला वेळ द्यावास, माझ्या आवडीनिवडिंकडे तू लक्ष द्यावस अशी माफक अपेक्षा सुद्धा मी तुझ्याकडुन कधी केली नव्हती.
माझा नवरा घर सांभाळतोय, मुलांना सगळं पुरवतो यातच सगळं आल आणि यामधे मी फक्त माझ्या मुलांची माझ्या नवऱ्याची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल यासाठी धडपडत होती.
पण तू मात्र माझा विश्वासघात केलास.. हातात पैसा आला आणि तो योग्य मार्गी नाही लावला की त्याचे उपयोग मात्र भलतीकडेच होतात हे तू जगाला दाखवून दिलस. तुला लागलेलं दारूच व्यसन आणि बार मधे बसून नकोते वाईट सवयी वाईट वळण असलेले तुझे मित्र आणि त्यांच्या सांगण्यावरून तू घरात बायको मुल असताना दुसऱ्या बाईशी संबंध ठेवू लागलास…
खरचं पैसा हा गरजेचा असतो पण याच पैशाने आज किती संसार मोडले असतील याची मला जाणीव करून द्यायला तू फार वेळ लावला नाहीस. अरे या सर्वात माझ्यापेक्षा तुझच जास्त नुकसान होतेय हे तुझ्या कस लक्षात नाही आले…
माझ्याशी खोटं बोलताना.. माझ्यापासून लपवताना इतकी धडपड करत होतास त्यापेक्षा थोडासा विचार केला असतास आपल्या संसाराचा.. आपल्या मुलांचा तर आजचा हा दिवस बघायची वेळ आली नसती..
अरे आमचं दुःख आमच्या त्रासच राहु द्यायच पण त्या दारू पिल्याने स्वतःच्या शरीराला त्रास देत होतास हे नाही का कळलं तुला… चुकीची संगत माणसाला बिघडवते हे ध्यानात नाही का आल तुझ्या… माझ्या वाटेच प्रेम तू भलतीकडे व्यर्थ घालवताना माझ्या त्यागाची जाणिव नाही का झाली तुला…
किती समजून घेतल तुला आजवर.. तुला त्रास नको म्हणून सगळं मनात साठवलं.. त्याग केला माझ्या इच्छांचा… पण तुला कधीच जाणीव नाही झालि का..???.
जे झालं ते खूप वाईट झाल म्हणून मला समजावणे खूप असतील पण नवऱ्याचा भक्कम आधार गमवला आहे मी आज… पोरांच्या खेळवण्याचा वयात त्यांना तू अस कस सोडून गेलास.. आणि या सगळ्याच कारण म्हणजे दारूच, चुकीची संगत आणि बाईचा नाद…. आमची काय चूक नसताना आज आम्ही हे सगळं भोगतोय…
तरीपण एक मागेन आजही… पुढचं जन्म मिळणार असेल तर तूच मला जोडीदार म्हणून हवा आहेस फक्त या चुका पुन्हा करू नकोस.. तू खूप चांगला होतास फक्त चुकीची संगत तुला व्यसनाधीन करून गेली आणि आयुष्यचं संपवलं तुझ…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


बाई, बाटली, बुवा आणि धुव्वा या चार पासून दूर राहावे. आणि हे याच जीवनात उतरावे. पुढील जनम मरण कोण इतिहासकार लिहून ठेवेल??