लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्याची इतकी घाई कशासाठी ??
टीम आपलं मानसशास्त्र
लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ.. सुखदुःखाचे सोबती… लग्न म्हणजे अस बंधन ज्याच्या बेड्या न वाटता त्यामधे अडकून कायम आनंद आणि समाधान मिळेल.. लग्न म्हणजे फक्त मंगलाष्टक अक्षदा सात फेरे नसून दोन मनांच मिलन आणि शेवटी असते ते दोन शरीराचं मिलन…
पण जिथे पहिले मनाला एक होण्यासाठी वेळ मिळत नाही .. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही… जिथे एकमेकांच्या स्वभावाची ओळख नाही…तिथे इतकी का घाई असते शारीरिक सुखाची…
हो शारीरिक सुखाची अनेकांना इतकी घाई असते की तिथे कोणताच विचार केला जात नाही. पण त्या आधी जर एकमेकांची मन ओळखायला वेळ दिला तर नात्याची वीण अधिक घट्ट होईल हे कोणाच्या लक्षात कस येत नाही…
काही वेगळे असतात पण त्यांचं कारण एकमेकांना ओळखून त्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे हे नसून शिक्षण, नोकरी, जबाबदाऱ्या यांना महत्त्व देणे हा असतो. लग्नानंतर लगेच मूलबाळ नको आधी आपण settled झालो की मग बाळाची जबाबदारी घेऊयात असा निर्णय घेऊन दोघेही आपापल्या कामात इतके बिझी होतात की एकमेकांना समजून घेऊ, स्वभाव ओळखू यासाठी त्यांना वेळ नाही मिळत.. आणि सगळी settlement झाली की शारीरिक संबंध ठेवले जातात.
जर आपण पाहिले एकमेकांना महत्त्व दिलं तर किती बरं होईल… जिथे शरीराला नाही तर मनाला महत्त्व दिले जाते त्या नात्यात कसलीच उणीव राहत नाही.. कारण जर मला त्याचा स्वभाव नाही पटत, त्याच वागणं आवडत नाहीये तर तिथे मी त्याच्याशी असलेलं नातं हे फक्त लग्न केलंय सोबत राहायचं म्हणून राहायचं अशा पद्धतीने ठेवेण.. कारण इथे आधी एकमेकांची ओळखच नाहीये म्हणून स्वभाव आणि वागणं पटत नाही. दोन वेगवेगळी माणसं जेव्हा एका नात्याच्या बंधनात येतात तेव्हा एकमेकांच्या सवयी, स्वभाव , आवडनिवड याबद्दल चांगली ओळख नसते. पण जर चांगली ओळख झाली एकमेकांची तर नक्कीच एकमेकांच्या सवयी लक्षात येतात.
एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या की त्या जपायला सुद्धा वेळ लागत नाही. बघाना आपल्या मनाप्रमाणे घडलं की आपल्याला खूप आवडते. आज जर तिला खूप मनमोकळ बोलावंस वाटतेय आणि तो कामावरून खूप थकून आलाय.. अशावेळी जे एकमेकांना चांगलं ओळखत असू तर तो त्याचा थकवा बाजूला सारून तिच्याशी गप्पा मारतो.आणि तीलासुद्धा कळते की तो कामामुळे थकला आहे तर आपण आता जास्त न बोलता त्याला आराम करायला वेळ देऊ.
जिथे एकमेकांना समजून घेण्याचा विचार असेल तिथे एकमेकांना साथ द्यायला कठीण जात नाही. पण हे सगळं तेव्हाच घडेल जेव्हा आपण एकमेकांना ओळखू, एकमेकांना आधी समजून घेऊ…
पण जर आपण आधी शरीरसंबंध महत्त्वाचे समजले तर एकेमकांना न ओळखता काहीवेळेस जबरदस्तीने ते संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि या उलट मनापासून एकमेकांचा स्वीकार करणे महत्त्वाचे तेव्हाच एकमेकांच्या मर्जीने शरीर एक होईल…
कारण शरीर संबंध हे काही वेळेस मर्यादा घालतात.. कुठेतरी थांबण्याची गरज असते.. पण एकमेकांची साथ ही आयुष्यभर हवी असेल तर पाहिले मन ओळखण गरजेचं…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
Kshhh
Sexualy part is important part in human life but understand the partner is very important…
Very nice post