रोज काहीतरी नवीन लक्षात ठेवा आणि वाईट विसरा.
लालचंद कुंवर
(उरुळी कांचन) , पुणे.
मानवी स्वभाव आणि मनाच मानसशास्त्र एक विलक्षण अस अजब रसायन आहे. वाईट घटना, प्रसंग किंबहुना वाईट सवयी, मानवी मन चटकन स्वीकारत पण चांगल्या सवयी , चांगले विचार हे अंगी रुजवावे लागतात , अगदी प्रयत्नपूर्वक चांगली संस्कार मुल्ये जोपासावी लागतात.
कारण आपल्या मेंदुमध्ये निर्णय घेण्याच्या दोन बाजू असतात. एक म्हणजे आपली सुप्त अवस्था अणि दुसरी जागृत अवस्था. त्यालाच Subconscious mind अणि Conscious mind असं म्हटलं जातं.
सबकॉन्शियस माईंडमध्ये आपण अनेक काम खुप झटपट करतो. त्या मानसिक हालचालींची आपणाला लवकर जाणीवही होत नसते . याउलट कॉन्शियस माइंडमध्ये आपण एखाद्या गोष्टीचा शांतपणे सारासार विचार करून कृती करतो. त्यासाठी अपला वेळ आणि ऊर्जा खर्ची होत असते . नंतर सावकाशपणे आपण योग्य निर्णय घेतो आणि गुंतागुंतीच्या प्रसंगातून आपण मार्ग काढतो.
अर्थात आता इथून पुढे सबकॉन्शियस माइंड ला वेल ट्रेन करायचं. म्हणूनच दररोज प्रयत्नपुर्वक अगदी न चुकता काहीतरी नवीन , चांगलं लक्षात ठेवायचं आणि वाईट विसरायचं .
असं म्हटलं जातं, एखादी चांगली सवय अंगी बिंबवायची असेल तर नेटाने प्रयत्न पुर्वक 21 दिवस सातत्य ठेवलं पाहिजे. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला त्याची सवय लागली पाहिजे. मग एकदा का सवय लागली की ती सवय अंगवळणी पडते.
बऱ्याचदा आपल्या आयुष्यात क्लेशदायक घटना , काही दुःखद प्रसंग हे अनपेक्षितपणे घडून येतात. आणि तेच प्रसंग आपण सारखे सारखे आठवत राहतो. त्यामुळे आपलं दैनंदिन जीवन disturb होत . कामात लक्ष लागत नाही. घरात लहानसहान कारणांवरून चिडचिड होत असते. ह्याच विमनस्क परिस्थितीत आपण घुटमळत राहिलो तर त्याचे परिणाम हळूहळू मानसिक आणि शारीरिक व्याधीची स्वरुपात जाणवायला लागतात.
वेळीच अशा घटनांमधून बाहेर निघणं अत्यंत गरजेचे असते. अणि प्रयत्न पुर्वक असे क्लेशदायक प्रसंगापासून स्वतःला लांब ठेवा. सतत नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्ती पासून सुध्दा चार हात लांबच रहा. कारण अशी लोकं तुमचही down shifting करुन ठेवतील.
याच दरम्यान काही चांगले प्रसंग , आनंददायी घटना , काहीतरी नवीन घडलेल असत. त्या जाणीपूर्वक आठवा. स्वतः ला motivate करा. नवीन काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी. चांगल्या विधायक कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. एखादी आवड किंवा ज्यात मन रममान होईल असा एखादा छंद मस्तपैकी जोपासा.
खरं तर, Mind या नावाच्या Processor मध्ये best things ह्या input करा म्हणजे output एकदम झक्कास निघेल.
‘ थ्री इडियट ‘ चित्रपटात सांगीतल्या प्रमाणे,
” अपना मन बहुत डरफोक है,
उसे हमेशा , All is Well बोलके,
बेवकुफ बनाके रखो.”
समाप्त.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


Superb blog 😊