Skip to content

अचानक मध्यरात्री त्याने बायकोला फोनवर बोलताना पकडलं !!!

अचानक मध्यरात्री त्याने बायकोला फोनवर बोलताना पकडलं !!!


मिनल वरपे


स्मिता आणि राजेश.. यांच्या लग्नाला काही वर्ष झाले त्यांना मूलबाळ सुद्धा नव्हत.. स्मिताने शिक्षण तर घेतल होत पण नोकरी करण्यापेक्षा घरी राहिलेली उत्तम असे तिचे विचार…

आणि राजेश एका चांगल्या कंपनी मधे काम करत होता. सकाळी उठायचं लवकर स्वतःच सगळं आवरायचं डब्बा घेऊन कामावर जायचं आणि संध्याकाळी कामावरुन परतायचं. आणि मिळेल त्या वेळेत जॉब मधे असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या, टारगेट यासाठी सतत फोनवर बोलत राहायचा.

सुरवातीचे काही महिने आपला नवरा काम करतोय मग उगाच कशाला वेळ देत नाही ही तक्रार करत त्याचा ताण कशाला वाढवायचा असा विचार करून स्मिताने कधीच राजेशला मनातल सांगितलं नाही.पण नंतर तिला खूप एकटेपणाची जाणीव व्हायला लागली.

त्यानंतर मात्र तिचे विचार बदलत गेले.. पूर्ण दिवस नोकरी आणि नंतर आल्यावर फोनवर बोलणं, सतत मेसेज नक्की माझ्या नवऱ्याच काय चालू आहे… त्याचं बाहेर कुठे प्रकरण तर चालू नाहीना… हा मला अजिबात वेळ नाही देत.. दिवसा मला साधा एक फोन नाही .. मला काय आवडते काय आवडत नाही याकडे अजिबात लक्ष नाही… रात्रीसुद्धा प्रेमाचे चार शब्द बोलावे तर माझं सगळं आवरून येईपर्यंत हे गाढ झोपलेले असतात.

यांना माझ्याबद्दल काहीच भावना नाहीत असे वाटतेय. आणि आता जर मी हे सगळं यांना बोलली तर नुसते वाद होतील.म्हणून काहीच न बोलता स्मिता शांत राहायची.

त्यानंतर काही दिवसांनी ती तिच्या मित्र मैत्रीणीना फोन करून गप्पा मारून वेळ घालवू लागली.. मित्र मैत्रिणींशी बोलताना तिला खूप आनंद व्हायचा वेळ कसा जातो हे कळत सुद्धा नव्हत. आणि मग या नेहमीच्या तिच्या सवयीप्रमाणे ती तिच्या एका मित्राला रोज फोन करू लागली तर कधी तो तिला फोन करायचा.

दिवसा तर काम आवरून तिला वेळ मिळायचाच आणि रत्रिसुद्धा राजेश झोपला की ही मेसेज वर त्या मित्राशी बोलत राहायची. त्यांच्या गप्पा त्यांचं बोलणं इतकं पलीकडे गेलं की ना तिला वेळेचं भान राहिलं ना नात्याच..

आणि या सगळ्यात तिला आपलं लग्न झालंय आणि आपण चुकीचे वागतोय याचीसुद्धा जाणीव नव्हती कारण माझा नवरा मला वेळ नाही देत, माझ्याशी बोलायला सुद्धा त्याला वेळ नसतो, माझ्या मनातल ओळखण तर दूर पण त्याला माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही, आणि नक्कीच जर त्याच बाहेर कोणासोबत असेल तर मी तसच वागले तर यात काय चुकीचं आहे असे तिच्या मनाला सांगत तिने तीच वागणं बोलणं चालूच ठेवलं.

एका रात्री राजेशला अचानक जाग आली आणि तो एकदम अवाक झाला, त्याने पाहिलं की स्मिता यावेळी कोनाशीतरी फोनवर बोलतेय ते सुद्धा एकदम हळू आवाजात…आणि त्याला जागे झालेलं पाहताच तिने फोन बाजूला ठेवला आणि झोपून घेतलं.

काही दिवस राजेश तीच वागणं तिच्या नकळत बघत होता. तेव्हा त्याने तिला बाजूला बसवलं आणि सगळ विचारलं.. त्याचे प्रश्न असे होते जिथे खोटं बोलून काहीच लपवण तिला शक्य नव्हत तेव्हा तिने सगळं त्याला सांगितल…

सगळं ऐकल्यावर राजेशला राग तर खूपच आला. पण नाण्याला दोन बाजू असतात याचा विसर त्याला पडला नाही. स्मिता हे काही वागली ते अत्यंत चुकीचं जरी असल तर तिच्या या वागण्याचं कारण तर माझं वागणं आहे हे त्याला जाणवलं.

म्हणून त्याने तिच्या मनातील त्याच्याबद्दल झालेला गैरसमज दूर केला, तिला चांगलं समजावलं.. तेव्हा स्मिताच्या डोळ्यात पाणी आले, आपण काय वागली आणि आपण किती चुकीच्या वाटेला जाणार होतो हे तिच्या लक्षात आले.आणि राजेशच्या मिठीत जाऊन ढसाढसा रडली..आणि दोघांनी एकमेकांना जाणून घेतलं.

इथे जर राजेश ने तिची बाजू न समजता, तिला माफ न करता, रागावून, नाराज होऊन भांडला असता तर त्यांच्या नात्याला प्रश्नचिन्ह लागला असता..

त्यानंतर राजेश सुद्धा नोकरी ही नोकरीच्या वेळेत आणि घरी आल्यावर स्मिता ला वेळ द्यायचा..तिच्या आवडीनिवडी, तिला काय हवं नको याकडे तो लक्ष द्यायला लागला.. आणि ती सुद्धा त्याची तेवढीच काळजी घ्यायला लागली.

पती पत्नी हे नात इतर नात्यांपेक्षा जरा वेगळं आहे. या नात्यातील भावना वेगळ्या असतात, अपेक्षा वेगळ्या असतात आणि भांडतात तर सगळेच पण या भांडणाला कुठपर्यंत तानायच हे आपल्याच हातात असते. समज गैसमज तर होतीलच पण त्यातून एकमेकांना समजून समजावून पुढे गेलं तर या नात्यातील विश्वास अजून वाढेल.

काहीही वेगळं जाणवलं, चुकीचं वाटलं तर सरळ बोलून विचारून मोकळं व्हावं. कारण गैरसमज व्हायला एक छोटंसं कारण सुद्धा पुरेस असते. म्हणून गैरसमज करून चुकीची वाट निवडण्यापेक्षा मनातील शंका स्पष्ट केल्या तर नक्कीच नात्यातील संवाद वाढेल.

या नात्यात जास्तीत जास्त गरज असते ती एकमेकांना पुरेसा वेळ देण्याची, समजून घेण्याची, काळजी घेण्याची.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “अचानक मध्यरात्री त्याने बायकोला फोनवर बोलताना पकडलं !!!”

  1. पछतावलेला एक नवरा

    पण मी कोणाशी ही बोलेल , तू तूझा झोप … मला handsome , charming ,,नवरा पाहिजे होता … दिवसभर नोकरी करणारा नको … मला रोज रात्रभर night out करायला आवडते ,तू सकाळी कामावर नाही गेला तरी चालेल …

    असं बायको बोलत असेल तर कसं चालेल …

  2. Vijay Chandanshiv

    Exactly the fact..this is very common and prevalent happening in today’s life…misunderstanding and misconception always results into the breakdown of a very harmonious relation between wife and husband..here one thing plays key role and that is mutual understanding…so everybody take care be talkative…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!