Skip to content

तडजोड करण्याची तयारी होती, म्हणूनच पूर्वीची लग्ने टिकत होती!

तडजोड करत होते, म्हणूनच पूर्वीची लग्ने टिकत होती.


लालचंद कुंवर.

पुणे.


साधारणतः १९९४-९५ च्या आसपासचा काळ असावा, आता नेमकेपणाने आठवत नाही , त्यावेळेस दूरदर्शनला एक डॉ. श्रीराम लागू यांची मालिका लागायची , ” प्रतिकार ” नावाची. त्या मालिकेचं अप्रतिम असं अर्थपूर्ण शीर्षक गीत होत .

या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अगदी प्रत्येकालाच चिंतन करायला अणि भूतकाळाच्या पटलावर डोकवायला लावणारं !
त्या गीतात एवढा गोडवा होता की आजही ते गीत मनात घर करुन राहिलं.

” आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा
पाव्यातला सुर जैसा, ओठातूनी ओघळावा ,

झिझुनी स्वतः चंदनाने , दुसऱ्यास मधुगंध द्यावा
हे जाणता , जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा ,

संसार वेलीवरी ही सुखंदुखं फुलोनी फुलावे
संदेश हा जीवनाचा, दुःखी मनी हर्षवावा,

आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा.

या गीतातील भाव नक्कीच मनाचा ठाव घेणारा आहे. पूर्वीची घरं म्हणजे नंदनवनच होती. आनंद हा घराघरात सुगंधा सारखा दरवळायचा अणि ओसंडूनही व्हायचा. गोकुळाप्रमाणे घराघरात माणसांचा राबता असायचा .

भाऊ, बहिणी, मामा, मावशी, काका , काकी अशी नाती नात्यातील नावाप्रमाणेच जपली जयायचीत. कधीतरी घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचीत . पण त्यातून निर्माण होणारा राग , रुसवा क्षणात नाहीसा व्हायचा आणि पुढच्याच क्षणी एकमेकांना काय हवं , काय नको, याची प्रेमाने विचारपूस व्हयाची . घरातील प्रत्येक लोकांमध्ये आपल्या माणसांसाठी चंदना सारखे झिजून दुसऱ्यास मधुगंध देण्याची स्वभावातच वृत्ती होती.

घरातील थोरामोठ्यांचा आदर असायचा. त्यांच्या अनुभवाच्या बोलाचा मान प्रत्येकाकडून राखला जायचा. आचार विचारांची एक मजबूत गुंफण असायची. आणि याचंच बाळकडू आपोआपच मुलांना घरातच अनुकरणातून शिकायला मिळायच. त्याचं मातीनं मुलं घडायचीत. त्यामुळे आता सारखे, पूर्वी संस्कार वर्ग , शिबिरं या गोष्टींची कधी गरजच भासलीच नाही.

सध्या हळूहळू आधुनिकतेची कास धरत नात्यातली घट्ट विण कुठेतरी सैल व्हायला लागली आणि आता बऱ्याच गोष्टी हातातून निसटत चालल्यात. आता नक्कीच काळ बदलत आहे. काळाची पावलं ओळखुन बदल झालाही पहीजे कारण Nothing permanent except Change in the World. पण हा बदल स्वीकारत असतांना संस्काराची नीतिमूल्ये पायदळी तुडवली तर जात नाहित ना ?

याच विस्मरण का व्हावं !

बदलत्या काळाच्या प्रवाहा बरोबर एकमेकांशी असलेले नातेसंबंध यांच्यातील सुर ही आता कुठेतरी बेसूर व्हायला लागलेत ! कारण पूर्वी नात्यातली तार छेडल्यानंतर तडजोड, संयम, सहनशक्ती या सुखी आयुष्याच्या त्रिसुत्री बरोबरच एकमेकांप्रती असलेले आदर , प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास अशा या सप्तसुरांची छान उधळण व्हायची, अणि घराचं घरपण जपलं जायच अणि माणसातलं माणूसपण टिकून राहायच.

पण आता घरादरालाच घरघर लागल्यासारख झालंय. सुबत्ता आली पण नीतिमत्ता कुठेतरी लोप पावत चालली. विज्ञानाची कास धरली , त्याला आधुनिकतेची जोडही दिली पण एक माणूस म्हणून माणसातली माणुसकीचं क्षीण होत चालली . घराघरात Smart phone आलेत पण स्मार्ट आचार विचारांचा वणवा पेटला.

सध्या ‘अरे ला कारे’ हि नवीन संस्कृती उदयास येत आहे. त्यामुळे मर्यादाहीन पिढी निर्माण होत आहे. मग मीच का तडजोड करावी ? मीच का समजून घ्यायचं ? मीच का माघार घ्यायची ? अशी मीपणाची लांबलचक यादीच आता घरोघरी तयार होत आहे.

या मीपणामुळे , ‘ मोडेन पण वाकणार नाही ‘ हिच प्रवृत्ती आज बोकाळत अनेकांचे संसार हे फुलण्या आधीच कोमजले जात आहेत आणि त्यामुळेच अनेक नातेसंबंध यांचे ही बळी घेतले जात आहेत. पूर्वी लग्नं ही संसारात आलेल्या वादळ वारांचा सामना करत यशस्वीपणे पैलतीरावर पोहचायचीत अणि शेवटपर्यंत टिकायचीत.

कारण योग्यवेळी तडजोड करण्याची मानसिकता होती. घट्ट अशी आपुलकीची नाळ जोडलेली असायची. पण सध्या लहानसहान गोष्टींवरुन राईचा पर्वत करायचा , अन लगेच नवीन चूल मांडायची तयारी ! हि दुबळी विचारसरणी , मनावर कोरली जात आहे.

परिणामतः दुभंगलेल मन अणि दुबळा मीपणा घेऊन , माणूस हा भुता सारखा या इहलोकी आत्मकेंद्री जीवन जगतोय. त्याला हेच लक्षात येत नाही की आपल्या या ताठपणामुळे ,आणि तडजोड न करण्याच्या प्रवृत्ती मुळे आपण कशाची किंमत मोजतोय ? अणि काय पणाला लावतोय !
जिथे महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती.

समाप्त



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “तडजोड करण्याची तयारी होती, म्हणूनच पूर्वीची लग्ने टिकत होती!”

  1. Earlier only females used to make adjustments, males never did and they neither do now..the problem lies there..teach your sons to be a normal human being not ” Pati Parmeshwar”. When husbands start to behave as a human being with their wives everything will fall back into place and there will be happy marriages.

  2. पुर्वी चे कुटुंब व्यवस्था व संस्कार टिकवण्यामध्ये महिलांचे योगदान खूप मोठे होते. त्यांच्या त्यागावर सर्व काही होत आजही आहे. पण आजच्या महिलेला घर सांभाळून सर्व बघावे लागते त्यामुळे तिची परवड होते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!