Skip to content

अबोल नात्यांमध्येच गैरसमज जास्त होतात.

अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतात.


मिनल वरपे


जुन्या माणसांसोबत कधी अधून मधून छान गप्पा माराव्यात. तेव्हा आपल्याला त्यांच्या अनुभवातून गप्पा गोष्टींमधून खूप सारी शिकवण मिळतेच. मग ते लहान मुलांसाठी असुदेत नाहीतर मोठ्या माणसांसाठी .. कस वागावं आणि कस जगावं हे आजच्या पिढीला सहज कळतच नाही अस म्हंटल तरी वावग ठरणार नाही.

अग मम्मी तुला काय माहित किती टेन्शनस् असतात आम्हाला…. अहो पप्पा कितीवेळा तेच तेच सांगता की तुम्ही खूप वाईट दिवस काढलेत आणि आज आम्हाला जे मिळतेय त्याची कदर नाही.. अस म्हणत आजची आपली तरुणाई ज्या गरजेच्या आणि आयुष्यात पुढे कस जावं हे शिकता शिकता मागे पडते.

फक्त शिक्षण घेऊन आणि नोकरी करून, फॅशन प्रमाणे राहून आयुष्य आनंदी नसते होत तर त्याला गरज असते ती चांगल्या विचार आणि कृतींची.

आणि हेच आज नवरा बायकोच्या नात्यात सुद्धा घडतेय. कुठे काय बोलावं, कस वागावं, कसा संसार करावा, एकमेकांना साथ कशी द्यावी या ज्ञानाची तर आता खूप कमतरता जाणवतेय.

म्हणून तर आपल्या घरातील, शेजारी असणाऱ्या तसेच आपल्या ओळखीच्या वयस्कर किंवा आपल्यापेक्षा वडीलधारे लोकांना संसार काय हे नक्की विचारावं… नात कस जपायच आणि नात्यातील विश्वास प्रेम कस वाढवावं हे त्यांच्याकडूनच ऐकावं.

आजकल मोबाईल इंटरनेट यांचं वाढत प्रमाण बघता मिळेल त्या वेळेत आपण एकमेकांशी बोलतो. जॉब ची गडबड, travelling, घरच्या जबाबदाऱ्या हे सांभाळताना कसरत तर नक्कीच होते आणि या सगळ्यात परिणाम होतो तो नवरा बायकोच्या नात्यावर..

पूर्वी मोबाईल फोन नव्हते .. पण संवाद मात्र खूप छान होता. कामावर पोहोचल्यावर अहो पोहचलात का किंवा कामावरून सुटायची वेळ झाली की अहो कितीवजेपर्यंत पोहचणार हे विचारायला साधणं नव्हती… पण तरीसुद्धा संवाद इतका उत्तम की बरोबर नवरा येण्याच्या वेळी चहा तयार…

अग येताना काय आणायचं.. हे विचारायला फोन नसताना सुद्धा बायकोसाठी गजरा आणायला तो कधी विसरत नव्हता कितीही कामाची गडबड असली तरी…

हे सगळं होत कारण फक्त फोटो काढून स्टेटसला ठेवणे यांच्यात जो आजच्या जोडप्यांना आनंद मिळतो तसा आनंद त्यांचा नव्हताच. त्यांचा आनंद तर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांशी गप्पा मारणं, एकमेकांना काय हवं काय नको हे न सांगता ओळखून तेच करणं.आणि याला सुद्धा संवादच म्हणतात बर का…

पण हल्ली वेळ कुठे आहे एकमेकांसाठी.. दिवसभर दोघांच्याही कामाची गडबड आणि रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ मिळाला तर तो सुद्धा मोबाईल मधे गुंतून कसा निघून जाईल माहितीच नाही.

एकमेकांची काळजी म्हणून फोन करायचा हे आजच्या नवरा बायकोला माहितीच नाही. फोन असतो तो सुद्धा कामांची वस्तूंची यादी सांगण्यासाठी…

एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही.. संवाद नाही मग अशावेळी नात्यात जागा मिळते ती गैरसमज या नात्याला पोखरणाऱ्या घातक गोष्टीची.

आपण एक सांगण्याचा प्रयत्न करतो पण संवादच नाही तर त्याचा चुकीचा अर्थ घेऊन गैरसमज वाढत जातात. त्यानंतर कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा झालेला गैरसमज दूर होणे अवघड जाते त्यापेक्षा आत्ताचं संवाद असेल तर एकमेकांच्या भावना, विचार खूप चांगल्या प्रकारे एकमेकांपर्यंत पोहोचतात.. मग कोणत्याच गैरसमज ना जागा मिळत नाही.

तो मला वेळ नाही देत , माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही म्हणजे नक्कीच याच बाहेर कुठेतरी चालू असेल किंवा ही सतत फोनवर असते, माझ्याकडे लक्ष द्यायला माझ्याशी बोलायला तिला वेळ सुद्धा नाही काय माहित नक्की काय चाललय तिच्या मनात .. अशी ही संशयाची गैरसमजच ची सुरवात नात्याला नको त्या जागी नेवून ठेवते. त्यापेक्षा आधीच एकमेकांना वेळ दिला , छान गप्पा मारल्या, मोबाईल कमी महत्त्व देऊन संवादाला आणि आपल्या नात्याला जास्त महत्त्व दिलं तर नक्कीच अबोल्यामुळे होणारे गैरसमज थांबतील..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!