Skip to content

मराठी कि इंग्रजी माध्यम ?? विज्ञान काय सुचवतंय पहा!!

मराठी कि इंग्रजी माध्यम ?? विज्ञान काय सुचवतंय पहा!!


लालचंद कुंवर

पुणे.


जुन महिना म्हटला म्हणजे सगळीकडेच लहान लेकरांच्या शाळा प्रवेशासाठी आम्हा पालकांची एकच लगबग सुरु असते.

कुठे आणि कोणत्या माध्यमात प्रवेश घ्यावा ? असे असंख्यप्रश्नांच काहूर सर्वत्र पाहायला मिळतं. म्हणुनच मनात निर्माण झालेल्या संभ्रमाला नेमकी दिशा मिळावी, त्यासाठी ह्या लेखाद्वारे विचारमंथन आणि ऊहापोह.

21 व्या शतकाला कुणी विज्ञानयुग तर कुणी संगणकाच युग म्हणून गौरवलं , पण मी म्हणतोय हे स्पर्धेचं य़ुग आहे ,अगदी जीवघेणी स्पर्धा !

उषा:काल होता होता कधी स्पर्धेची काऴरात्र झाली ! तशातच पुन्हा म्हणायच आयुष्याच्या पेटवा रे मशाली. कशा पेटतील मशाली? जळत्या निखार्यावर उभा आहे इथे प्रत्येकजण ! हा स्पर्धेचा निखारा एखाद्याचं आयुष्य तावून सलाखून काढतो तर काहींच्या बाबतीत कवी सुरेश भट यांना , “इतकेच मला जातांना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते” हे सांगण्याची वेळ येते . खरं तर Education is a journey not a destination and competition. पण आम्हा शिक्षित पालकांना हे लक्षातच का येत नाही ?

काऴाबरोबर बदलायच का इतरांबरोबर नुसतच मेंढरासारख धवायचं ? मनात राहीलेल्या सुप्त इच्छा लेकरांवर लादयच्यात , आणि त्या पुर्ण करण्यासाठी त्यांना गर्दीत फरफटत ओढत नेयायचं ! आणि समाजात आपणच आपली पाठ थोपटून घेयायची की , पोरगं किंवा पोरगी Engg , Medical , M. B. A. करतयं .

मुलांची इच्छा, आवड मात्र गुलदस्त्यातच !

आता शिक्षणक्षेत्रात तर इंग्लीश मेडीयम किंवा सेमी इंग्लीश कधी प्रतिष्ठेच्या यादीत जावून बसलेत कळालच नाही.

अगदी पहीलीच्या वर्गापासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किंवा सेमी इंग्रजी च्या वर्गात मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी अक्षरशः पालकांमध्येच चढाओढ चालू आहे .

आम्ही शिकलेले , सुजाण पालक खरचं मुलांच्या बाबतीत एवढे कर्तव्यदक्ष आहोत ? का एका गर्दीचा हिस्सा बनू पाहतोय? का हे अर्थिक सुबत्तेच लक्षण मानायच ? का आर्थिक पाठबळ नसतांनाही ,’हम भी कुछ कम नही ‘ हे जगाला दाखवण्याचा आटापिटा करतोय?

माझं M.A., B.Ed. झालंय पण शेवट पर्यंत माझ्या अडाणी , अशिक्षित आईवडीलांना हे कऴाल नाही की मी काय शिकतोय .
फक्त शाळा शिकलाय , एवढंच पुरेस होतंय.

आज इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी विषयांचा इतका सुळसुळाट झालाय की बस्स ! आणि धनाढ्या लोकांनी पालकांच्या खिशातील अर्थ चा अर्थपुर्ण अभ्यास करून ‘ मागणी तसा पुरवठा ‘ या युक्तीप्रमाणे गल्ली पासून दिल्ली पर्यंत नुसतेच इंग्रजी पंडीत तयार करण्याचे झगमगीत शाळा सुरू करण्याचा एकच सपाटा लावलाय ! पण हे इंग्रजी पांडित्य नसून नुसतीच वरून आलेली इंग्रजी ज्ञानाची सुज आहे हे कऴेल त्यावेळेस वेळ हातातून ऩिघून गेलेली असेल .

बालमानसशास्रज्ञ प्रा. रमेश पानसे सर व आनंदमय शाऴांचे प्रवर्तक पी.बी शितोऴे काका या दोन्ही विचावंतांचे बालकांविषयीचे विचार प्रत्येक बालकांच्या पालकांना विचार करायला लावणारे आहेत . “बालकांच आपल्या मातृभाषेच ज्ञान जर परिपुर्ण असेल तर मुलं जगातील कोणतीही भाषा विनाअडथळा आत्मसात करु शकतात” असे हे दोन्हीही शिक्षणतज्ञ समाजाला ओरडून सांगताहेत पण लक्षात कोण घेतं?

पण आम्ही सुज्ञ जागरुक पालक , मुलांची अवस्था ‘ ना घर का ना घाट का ‘अशी बालवयापासून इतर भाषेचा डोस पाजून करुन ठेवतो आहोत.

सेमीच्या बाबतीतही तसच होत . गणित आणि विज्ञान विषयाच्या संकल्पणा शालेय जीवनात मातृभाषेतून ज्या प्रमाणात स्पष्ट होतील त्या इतर भाषांच्या किंवा इंग्रजी विषयाच्या अर्धवट ज्ञाऩामुळे खरच स्पष्ट होतील का?
का मार रट्टा कर घोकंपट्टी , हे नवीन बीज रुजू पाहतय !

कारण जगाच्या पाठीवरील कोणतीही भाषा आधी आपण कानाने ऐकूनच शिकत असतो. म्हणूनच आपल्या घरातील आणि सभोवताली असणार वातावरण मुलांच्या जडणघडण आणि भाषा संवर्धनासाठी milestone ठरत असतात.

म्हणूनच बालकांचं Primary Education च माध्यम निवडतांना इतरांच विचारहीन अनुकरणापेक्षा डोळस अणि सजग व्हावंच लागेल. जगातली सर्व शिक्षणतज्ज्ञ यांची आर्त हाक ऐकावीच लागेल.
नाहीतर ………………………………….. !

समाप्त.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मराठी कि इंग्रजी माध्यम ?? विज्ञान काय सुचवतंय पहा!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!