आहे त्या क्षणाचा आनंद घ्या.. उद्या कोणी बघितला आहे …
मिनल वरपे
आपण आपला असा स्वभाव बनवतो ज्यामुळे आपल्या मनासारखं काही घडलं नाही तर आपल्याला लगेच वाईट वाटते, राग येतो … पण यापेक्षा जर आपण अस वागण्याचा प्रयत्न केला की काहीही होऊदेत मला माझा आजचा दिवस खूप छान अनुभवायचा आहे…
जर वाईट काही झालं तर जाऊदेत जे झालं ते झालं, जे घडून गेलं त्यामधे बदल करायला तर नाही जमणार त्यापेक्षा आज आता येणाऱ्या नविन क्षणात जे सुख असेल ते शोधुयात.
एका गावात एक म्हातारी आजी असते.. तिला तीच अस कोणीच नसते … मिळेल ते काम करायचं आणि त्यामधे दिवस काढायचा हे तीच ठरलेलं होत. तिच्या गावात एक राजा होता त्याने धान्य वाटप केलं पण जेव्हा तिच्या झोपडीत ते सेवक धान्य घेऊन आले तेव्हा तिने विचारलं हे काय आणि कशासाठी.. तेव्हा ते बोलले राजाने सगळ्या गोर गरिबांना गरज म्हणून हे धान्य वाटप करायला सांगितले आहे… तेव्हा तिने तो घ्यायला सरळ नकार दिला.. माझ्या आजची सोय मी केलेली आहे.. त्यामधे मी आजचा दिवस छान जगू शकते आणि माझा उद्या मलासुद्धा माहीत नाही तर त्या उद्याची सोय आज कशाला.. त्यामुळे मला याची गरज नाही.
तेव्हा ते सेवक माघारी गेले.. राजाला घडलेला प्रसंग सांगितला… तेव्हा राजाला त्या म्हातारीच खूप कौतुक वाटलं.आणि त्याच्या लक्षात आले की ज्या म्हातारीची परिस्थिती चांगली नाही.. झोपडीत राहते.. तरी हातात जे आज आहे त्यामधे ती छान जगतेय.. आणि आपण मात्र उद्याची सोय करण्यात आजचा दिवस कसा घालवतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही.
आपल्याला सुद्धा असच जगायच आहे जो आज आता क्षण आहे त्यामधे जगायचं आहे उद्याचा दिवस काय तर येणारा पुढचा क्षण कसा असेल आणि काय घेऊन येईल कोणाला माहितीये…
आपण जॉब करतो.. बिझनेस करतो हे कशासाठी असतात तर आपल्याला सगळ्या गरजेच्या गोष्टी मिळाव्यात, आपल्याला सुखसोयी हव्या त्या मिळाव्यात म्हणूनच ना…. पण या सगळ्या धावपळीत आपण आपल्यासाठी आपल्या माणसांसाठी वेळ काढतो का???
आपण ज्या अन्नासाठी आयुष्यभर धडपड करतो.. तेच जेवण आपण चवीने आणि आनंदाने जेवतो का??
आपल्याला आपली माणसं खूप हवीहवीशी वाटतात.. पण त्यांच्यासोबत मोकळेपणाने खूप छान वेळ काढून आपण बोलतो का?? आपण त्यांना वेळ देतो का??
इतरांच तर लांब आहे पण जगताना आपण स्वतःला कधी विचारतो का.. की तू ज्यासाठी ही सगळी धडपड, धावपळ करत आहेस त्या येणाऱ्या क्षणात तू जगतोस का??
खर तर प्रत्येकाला स्वतःच्या आवडीनिवडी असायलाच पाहिजेत.. स्वतःची स्वप्न, स्वतःच ध्येय हे जपलच पाहिजे… ते कोण नाय म्हणतेय पण .. मी , माझं, माझी तत्व, माझे नियम, माझी अशीच सवय, माझा असाच स्वभाव, मला हेच आवडते आणि या सगळ्यात जे आहे त्याचा आनंद आपण घेतो का???
आपण फक्त शिक्षण, नोकरी, जबाबदाऱ्या आणि लहानसहान गोष्टींवरून येणार दुःख यामधे इतकं अडकून राहतो की त्यावेळी ही वेळ पुन्हा मिळणार नाही हे पूर्णपणे विसरून जातो. सुखी राहावं आनंदी राहावं यासाठी इतकी तारेवरची कसरत करणारे आपण…. त्याचं सुखाचा आनंद घ्यायला विसरतो…
जगण्यातला आनंद तेव्हा मिळेल जेव्हा येणाऱ्या प्रत्येक क्षणात आनंद घेण्याची सवय आपल्याला लागेल…. कारण हर पल यहा जी भर जियो.. जो हे कल हो ना हो…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

