Skip to content

स्वतःच मानलं की आपण सुखी आहोत तर आपल्यापेक्षा जास्त कोणीच सुखी नसेल…

स्वतःच मानलं की आपण सुखी आहोत तर आपल्यापेक्षा जास्त कोणीच सुखी नसेल…


मिनल वरपे


आश्चर्य वाटलं असेल ना… अर्थात सुख आणि दुःख या भावनांची सुरवात ही आपल्यापासूनच होते. आपण आपल्या मेंदूला ज्या सूचना देतो तेच तो पूर्ण करतो. म्हणून आता आपल्यावरच आहे की आपण त्याला कोणती आज्ञा द्यायची.

बघाना एक अगदी साधं उदाहरण घेऊयात.. मी म्हंटले की आज माझा खूप घसा दुखतोय म्हणजे उद्या ताप येणारच.. जर आपणच स्वतःबद्दल असे विचार करत असू तर नक्कीच दुसऱ्या दिवशी तेच घडणार जे आपण सारखं घोकत होतो.

आता आपण सुखी राहायचं ठरवूयात.. अगदी मनापासून एक विचार करा.. की आपल्याला आपण काहीच न सांगून सुद्धा कधी समोरची व्यक्ती येऊन बोलिये का की अरे तू तर खूप दुःखी आहेस.. तुला किती दुःख आहेत..याच उत्तर काय मिळालं… नक्कीच नाही हे उत्तर असणार.

कारण आपण जसे हावभाव ठेवू, आपण जस वागू , आपण जे काही बोलू, उत्तर देऊ त्यावरच आपल्या आजूबाजूची माणसं विचारतात की काय झालं आहे.. अस कधी आहेका की आपण मस्त हसतोय आणि कोणी येऊन विचारलं अरे किती दुःखी आहेस तू…. नाहीच विचारणार कारण त्यांना काही तस दिसतच नाही.

म्हणूनच तर… आता आपणच काय ते ठरवूयात की आपल्याला नेमक कस वागायचं आहे.. कारण बाकी सर्व आपल्या वागण्या बोलण्यातून ठरवतील की आपण सुखी आहोत की दुःखी.. इथे आपण स्वतःला सुद्धा हेच सांगायचं की मी खूप सुखी आहे.आणि मग बघा किती फरक पडतो.

आपण दुसऱ्यांना काय सांगतो याने काहीही फरक पडणार नाही पण आपण स्वतःला जर सांगितल की मी खूप सुखी आहे तर आपल्या जगण्यातच बदल होतो. मला हवं ते मिळालं तर मी सुखी.. माझ्या अपेक्षा पूर्ण होत असतील तर मी सुखी.. ही आजची सुखाची व्याख्या आहे. आणि जर आपण स्वतःला सुखी मानलं तर नक्कीच या इच्छा अपेक्षा आपल्याकडे राहणार नाहीत.

दुःख , टेन्शन , चिंता हे तर कोणाला नाही. आयुष्य mhantal तर सुख दुःख अडचणी चिंता अशी डिश सगळ्यांना येतेच पुढ्यात.. म्हणून कायम फक्त सुख ही आपल्याला हवीहवीशी वाटणारी गोष्ट सतत नाहीना मिळणार. म्हणून सर्व गोड मानून खावं…

जे आहे त्यामधे आपण सुखी राहण्याचा एक सुंदर प्रयत्न करू.. खर तर सुख कशात असते तर जे आहे त्यामधे समाधान मानण्यात खूप मोठं सुख असते. निरार्थक इच्छा आणि नकोत्या बिनकामाच्या अपेक्षा यामधे अडकून आपण समाधान हरवून बसलो आहोत.

म्हणून स्वतःला कायम सांगा की मी खूप सुखी आहे आणि या सुखाचा आनंद घ्या…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “स्वतःच मानलं की आपण सुखी आहोत तर आपल्यापेक्षा जास्त कोणीच सुखी नसेल…”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!