शरीर फक्त नवऱ्यापाशी आणि मन मात्र कुठंतरी घिरट्या घालत असतं!!
लालचंद कुंवर
पुणे.
माणूस जन्मला येतो तोच नात्यांच पुंजक घेवून. आयुष्यभर मिरवत आसतो हि नाती, हा माझा…, तो माझा . पण निसर्ग हा मोठा किमयागार आहे. काही नाती हि मिरवायला नाही तर तो जपायला देतो. ज्याला जपण कळल त्याला जगण कळलं. त्यातलच नवरा बायकोच नातं. काय भन्नाट नातं असतं ना !
नुसतं नावानेच अंगावर शहारे आणि रोमांच ! रेशिमगाठ म्हणे स्वर्गात बांधली जाते , आम्ही फक्त निमित्तमात्र ! वा रे वा ! म्हणजे सगळा भार देवावर आणि नशिबावर. आपण नात जपायच्या जबाबदारीतून मुक्त . किती छान पैकी आपणच आपल्या जबादारीच्या कर्तव्यातून सुटका अणि मुक्तता करुन घेतो ना !
पण हिच मुक्तता आज आयुष्याला ठेचा देत , जगणं रक्त बंबाळ करत असते. कुटुंबरुपी संसाराची नौका पैल तिरावर नेयायची आणि समाधानाने डोळे बंद करायचे ! किती छान वाटतं ऐकायला पण संसार म्हणजे काही तीन तासांचा चित्रपट नव्हे कि जेथे आधीच सर्व कथानक ठरला आहे.
कधी कोणतं वादळ कोणत्या रुपात येईल, आणि नवरा बायकोच्या नात्यालाच आव्हान देईल , सांगता येत नाही . अशावेळी नात्याची वीण घट्ट असावी. काही प्रसंग धगधगत्या आगी सारखे सत्व पाहण्यासाठीच येतात की काय जणू. असले प्रसंग म्हणजे जळते निखारेच. आयुष्य होरपळून काढतात . छातडावर आसुड ओढले जातात. जगणं असहय आणि नकोसं होतं. संवेदना बधिर होतात . डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार. मग सुरेश भट यांच्या काव्यपंक्ती मनात घिरट्या घालतात,
” इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ”
खरच! काही घटना ह्या ह्रदयात कायमस्वरूपी कोरल्या जातात. असं म्हणतात, नवरा बायकोच्या नात्याची गाठ म्हणे सात जन्मापर्यंत बांधलेली असते. पण सध्या या एकाच जन्माने पळता भुई थोडी केली आहे.
पत्नी ! संसाराचा गाडा हाकत हाकता कधी कधी जबाबदारीच्या ओझ्याने त्रासुन जाते, चिडचिड होते. लक्ष वेधण्यासाठी आदळआपट ही केली जाते. मनात नुसती घालमेल आणि खदखद. दिव्या खाली ही अंधार असतो, तो अंधार दूर करण्याची दिव्यदृष्टी नवरा बायको या दोघांकडे असावी लागते.
पण लक्षात कोण घेतं ? स्री ला ही मन, भावना असतात आणि त्या जर सारख्याच पायदळी तुडवल्या जात असतील, तर हि नवर्यांसाठी वादळापुर्वी धोक्याची घंटाच समजावी ! काय हव असतं हो तीला ? देखना नवरा, पैसा , दागिणे … तशी यादी खुप मोठी होईल.
खर तर यातलं कहीही नको असतं . फक्त आणि फक्त निखळ प्रेम , समजून घेणारं मन , किमान मानाने जगता येईल असं घरपण,
हक्काने मान टेकवता येईल असा विश्वासू खांदा आणि ढसा ढसा रडून कधीही मन मोकळ करता येईल असा विश्वासू सारथी. मला जगाने नाकारलं तरी , तरी माझा सारथी माझ्या सोबत आहे , हा विश्वास. आणि उभ्या आयुष्यात , नवरा बायको या दोघांनाही हा विश्वास एकमेकांप्रती नाही निर्माण करता आला , तर त्याच्या सारख संसारातल दुसरं अपयश कोणतं नाही !
खरं तर जगात तरी संवादाने सुटू शकत नाही, अशी एकही समस्या अस्तित्वात नाही . पण तो संवाद एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयापर्यंत पोहचणारा असावा. तेथे मीपणाचा लवलेश ही नसावा. कारण मला कोणीतरी समजून घेतयं . माझ कोणतरी ऐकून घेतय हि भावनाच स्रीला जगण्यासाठी बारा हत्तीचं बळ देतं.
नुसत्या ठेल्यावरची पाणी पुरी खाऊ घाला, बायकोला ! आनंदाने अख्या जगाला ओरडून सांगेल . पण जेव्हा हा नवरोबा अशा छोट्या छोट्या क्षणाचा आनंद हिरावून घेतो. तेव्हा नुसती धुसफूस होत असते मनात ! कळतच नाही त्याला त्याच्या हातातून काय निसटून चाललय. मुलं जन्माला घातली आणि घरखर्च भागवला म्हणजे झाली कर्तव्यपुर्ती, अस नसतं कधी.
खरं तेव्हाच तिच्या काळजात विस्तवाची ठिणगी पडायला सुरवात होते. त्याच वणव्यात रुपांतर होण्यापूर्वीच डोळस व्हाव. कारण शरीरावरचे कसले ही खोल घाव भरुन निघतात. पण काळजात होणारी जख्म भरुन काढणारे औषध अजून तरी वैद्यकीय शास्रात नाही.
तीला ही मन आहे, भावना आहेत आणि शरीरही ! दोन शरीर एकत्र येण्याआधी दोन मन एकरुप व्हावी लागतात, हे जपाव . नाहीतर कालांतराने एक वेळ अशी येते की शरीर फक्त नवर्यापाशी आणि मग मन कुठतरी घिरट्या घालत असत आभाळात , आणि अशावेळी आभाळच फाटलं तर ?
तर गल्लोगल्ली टपुन बसली आहेत बोलघेवडे श्वापदे , गिधाड्या सारखी शरीराचे लचके तोडण्यासाठी. अणि नंतर साप निघून गेल्यावर , भुई थोपटण्यात काही आर्थ नाही. म्हणून ” नवरा बायको ” या नात्याच लेबल लावून समाजात जर वावरणार असाल तर मनाची सायकॉलॉजी समजुन घ्यावीच लागेल.
एकमेकांचे चांगले प्रियकर प्रीयेसी असतांना , नंतर नवरा बायको सहज होता येतं हो ! पण नवरा बायकोच्या नात्याला सुरुंग तेव्हाच लागतो
जेव्हा नवरा बायको हे नातं निभावत असतांना , एकमेकांचे चांगले प्रियकर प्रीयेसी आणि मित्रं म्हणून आयुष्यभर होता आलं पाहिजे. आणि हे जगणं ज्यांना जमलं त्या नवऱ्याला ” सुंदर मैत्रिणीची ” आणि बायकोला ” समजून घेणाऱ्या दुसऱ्या मित्राची ” उभ्या आयुष्यात कधीच गरज भासणार नाही .
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


खूप छान, पण प्रत्यक्षात आणन थोड कठीण असत, नवीन लग्न झालेल्यांना खूप चांगले मार्गदर्शनपर विचार आहेत, 10-12 वर्षानंतर अचानक वागणूकीतले बदल पचनी पडत नाहीत
अत्यंत बाळबोध, भारतीय विवाह संस्था आज कुठल्या टप्प्यावर आहे. याचा अभ्यास कमी दिसतो आहे.
तुम्ही मांडलेली परिस्थिती 15- 20 वर्षापूर्वीची आहे, आज त्यात खूप फरक पडला आहे. विशेषतः पती – पत्नी कडून एकमेकांच्या अपेक्षांच्या बाबतीत. आणि एकमेकांना *सर्वार्थाने* द्यायच्या समाधाना बाबतीत……
Unconditional love and Understanding matters a lot………..I have seen many relationships are breaking just because of Ego………….Even though a person is trying hard to save the relationship still……..next person is least bothered to maintain the same……..breaking a relation is just a game for some people……these people never understand what other person is suffering
लेख आवडला, परंतु दोन्ही बाजूंनी विचार करायला हवा तेव्हाच समतोल साधला जाईल
लेख खूप सुंदर आहे पण एक खंत वाटते की… प्रेम व्यक्त करण… हें प्रत्येक व्यक्ती ला नाही जमत याचा अर्थ असा नाही की तो प्रेम नाही करत… खूप वेळ असं होत की… मनात खूप इच्छा असतें की आपण आपल्या बायको सोबत बाहेर जावं… आपल प्रेम व्यक्त कराव… पण कामाचं ओझं एवढं असतें की नाही मिळत सवळ…पुरुष जे काही करतो ते आपल्या आणि आपल्या पत्नी च्या उज्वल भविष्यासाठी च… आता असं नाही की याला अपवाद नाही… अपवाद हें प्रत्येक गोष्टी ला असतातच…
Purushala hi man asat, te haluvar pane kas japav he striyaana samjawa pahil
अप्रतिम अति सुंदर
ठीक आहे मानलं सगळं पण बायकोने आदळ आपट किती करायची असते याला पण काही मर्यादा असते का नाही की, समतोल फक्त नवऱ्यानेच राखायचा का दमून आलेल्या नवऱ्याच्या जास्त मोठ्या अपेक्षा नसतात ओ, आणि नवऱ्याने बायकोलाही तिच्या इच्छेप्रमाणे संधी दिल्यावर जमत नाही म्हणून तिने ती अर्ध्यात सोडल्यावर नवऱ्याला दोष का द्यावा, उगाच फालतूगिरीचे लेख लिहिताय
Real Life fact
Very good this is fact
True and meaningful lines. These types of post are necessary for growth of relationships. But in your next post please show another side called husband.
Laxman Salve
ह्या गोष्टी दोघांसाठीही तेवढ्याच महत्वाच्या नाहीत का? दिवस रात्र काबाड कष्ट करणारा नवरा, त्याचे tensions बायको ने ही समजायला पाहिजेत। लेख हा स्रीभिमुखी आहे पुरुषाचा विचार तिळमात्र करण्यात आला नाही। संसारात पती व पत्नी तेवढेच महत्वाचे कृपा करून समतोल राखणार लेख लिहा। तुमचे लिखाण फार सुंदर आहे। समाज परिवर्तन करू शकते
So great thinking !!!!!
Well elaborated its real fact
Afterall human life is name of adjustment, you if adjust everytime happiness will get fitted in each moment of life
खुप च छान मस्त सुखी संसार यालाच म्हणतात धन्य वाद
khupch chan
Real fact it’s a common story of human life
Relation is not a just timepass it had done to be practical.
It’s very serious thing really thinking about that for every coupple so be carefully each and every person
Great thinking for newly couple