Skip to content

या साऱ्यांना वैतागून मी आत्महत्या करायला निघालोच होतो, पण..

या साऱ्यांना वैतागून मी आत्महत्या करायला निघालोच होतो, पण..


मिनल वरपे


त्यादिवशी आई ने एक घडलेला किस्सा सांगितला.. आपण काही ऐकलं की फार लवकरच भावनिक होतो माझं सुद्धा तसच झाल.. आई ने सांगितलं की तुझे वडील जेव्हा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते तेव्हा जाताना उंच भागावर एक मुलगा जीव देत आहे अस दिसलं तेव्हा त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्याजवळ गेले.त्याला विचारलं तू कुठे राहतोस, काय करतोस, तुझ कुटुंब कुठे आहे ?? त्याने सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली.

नंतर बाबांनी त्याला विचारलं की तुझं जीव देण्याच कारण काय… त्यावेळी तो एकदम शांत झाला. बाबांनी त्याला जवळ घेतलं, विश्वास दिला नंतर इकड तिकडच्या काही गोष्टी केल्या मग नंतर तो बाबांकडे मोकळा झाला.

खरं तर तो तरुण वयाचा होता. काही वर्ष झाले लग्नाला.. त्याला एक मुलगा आणि घरात आई वडील एक लहान भाऊ आणि बायको अस त्यांचं कुटुंब.. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने एक चांगली नोकरी मिळाली. त्यानंतर लग्न झाल.काही दिवस खूप छान गेले. पण घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना.. अगदी तसेच झाले.

त्याच्या बायकोचं घरात कोणाशी जास्त पटत नव्हतं. तिच्या मुलाला थोड काही लागलं, तो रडला की ही घरात सर्वांशी भांडायची..हा घरात आला की पूर्ण दिवसाचं सगळं सांगत बसायची. घरातलं वातावरण पाहिल्यासारखं राहिलं नव्हतं. आणि मग कामावर गेल्यावर या सगळ्या गोंधळाचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. आणि एक दिवस याच गडबडीत त्यांच्याकडून कामात चूक झाली आणि त्याला कामावरून काढून टाकलं.

काम सुटलं..वडील घरी ..भाऊ शिकतोय..मग आता सगळ्या जबाबदाऱ्या पार कशा पाडणार, आधीच घरातलं वातावरण अस कोणीच समजून घेणार नाही.. आणि मग खूप वैताग आला आणि सगळं सोडून जीव देण्याचा निर्णय घेतला.

त्याचं ऐकून वडील बोलले बस इतकंच कारण जीव देण्याच. ..तेव्हा तो अवाक होऊन बघू लागला. तेव्हा वडील त्याला बोलले.. अरे यापेक्षा मोठे मोठे दुःख ज्यांना आहेत ते सुद्धा अजून आनंदात जगत आहेत आणि तू एवढ्याशा कारणाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलास.. इतकं स्वस्त आहेका आयुष्य…

जर घरात वाद होत होते तर कोणी काय करावं, कोणाशी कस वागावं यासाठी सर्वांना समोर घेऊन बसून बोलावं आणि ऐकतच नसतील तर काही ठिकाणी दुर्लक्ष केलेलं उत्तम.जर रोज तेच ऐकून वैताग येत असेल तर ऐकून सोड आणि फक्त तुला काय करायचं आहे यावर लक्ष दे. आज तुझी नोकरी गेली म्हणून दुसरी मिळणार नाहीका.. आणि नसेलच मिळत तर कर सुरवात एका नविन व्यवसायाची..लगेच यश तर नाही मिळणार पण प्रयत्न करत रहा अनुभवातून शिकशिल आणि नंतर उत्तम व्यावसायिक होशील..

संसार.. भांडण हे तर प्रत्येकालाच आहे.. रोज आनंद तर कुठेच मिळणार नाही. आणि प्रत्येक वेळी संकट आल म्हणजे दुःखच आहे असे थोडीना असते.. येणारे संकट आपली समस्यांना तोंड देण्याची क्षमता वाढवत असतात असे समजून पुढे जायचं.. त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आल आणि त्याने नव्याने उभ राहण्याचा निर्णय घेतला.

आपण जगण्याला घाबरतो कारण संकट दुःख सारखे येतात.. पण त्यांनां संकट का समजायचं आपण त्यांना एक नविन आव्हान समजुयात..

एखादी वस्तू किंवा पदार्थ बनवून बघा आणि न खाता तो फेका… जमेल का ??? नाहीना.. इथे आपण तो कसा झालाय हे तरी बघणार..त्याची चव बघणार.. मग इतके स्वप्न घेऊन लहानाचे मोठे होतो, शिक्षण घेतो.. सगळं काही करून जगण्याची चव न घेता..आयुष्य संपवण्याचे निर्णय का घेतो..

बघा जगून जे आहे त्यामधे.. कोणतेच असे प्रश्न नाहीत ज्यांना उत्तर नाहीत.. अशा कोणत्याच अडचणी नाहीत ज्यांना solution नाही.. मग आपण काहीच प्रयत्न न करता अर्ध्यातच सगळं सोडून जाण्याचे निर्णय का घेतो… इतरांना तर दुःख होईलच आपल्या या निर्णयाचा पण आपण जन्माला येऊन काय मिळवल याच उत्तर शोधून बघा..आणि नसेल मिळत तर ते उत्तर मिळवण्यासाठी तरी जगा…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!