एकमेकांना, एकमेकांसाठी!!
टीम आपलं मानसशास्त्र
आज ती आहे तिने मला कायम समजून आणि सांभाळून घेतलं म्हणूनच आज मी तुम्हाला इतकी उच्च स्थानावर प्रगती करताना दिसतोय हे त्याचे वाक्य ऐकून कोणाला नवल नाही वाटलं कारण आपण एक वाक्य नेहमीच ऐकतो ते म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री चा हात असतो पण हे फक्त ऐकून बोलून उपयोग नसतो तर त्याची जाणीव असायला हवी.
आपण अनेक मुलाखती बघतो ज्यामधे यश मिळण्यामागे कस नियोजन केलं,कस ध्येय गाठलं हे ऐकायला मिळते. पण अस क्वचितच ऐकायला मिळते की हो माझ्या बायकोने मला खूप समजून घेतल, वेळ मिळत नाही म्हणून अजिबात तक्रार नाही केली,मला कायम साथ दिली, तिचे कर्तव्य सांभाळत तिने माझ्याही अनेक जबाबदाऱ्या नकळत सांभाळल्या.आणि अगदी हीच कमतरता बहुतेक यशस्वी स्त्रीयांच्या बाबतीत असते त्यांना सुद्धा आपल्या जोडीदाराच्या पाठिंब्याची
कुठेही आपल्याला यश मिळालं की त्या यशाच्या मागे फक्त आपलीच मेहनत आहे असे नसते तर आपल्या प्रत्येक प्रगतीमध्ये आपल्या जोडीदाराने दिलेली साथ त्याने दिलेला पाठिंबा आणि त्या सोबतच त्याच्या त्यागाचा सुद्धा समावेश असतो.
जर माझी बायको जॉब करतेय तर तीला घरातली काम आवरून, घरातील सर्व माणसांचं करून, सर्वांची मन सांभाळून तिला ऑफिस मधे सुद्धा तिच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्यां लागतात.याची प्रत्येक पुरुषाला जाणीव असेल तर तिच्याकडून तो निरर्थक अपेक्षा करणार नाही.
जस नवरा जॉब करतोय काम करतोय म्हणून प्रत्येक बायको त्याची काळजी घेते त्याला काय हवं काय नको ते बघते, कामावरून आल्यावर दिवसभराचा थकवा असेल याची जाणीव ठेवून त्याला वैताक येणार असे काहीच वागत बोलत नाही.
अगदी तसच नाही जमलं तरी चालेल पण जॉब करणाऱ्या बायको असो किंवा घरी राहणारी असो आपली बायको ही किती काम करते, किती जबाबदाऱ्या सांभाळते , ती सुद्धा थकत असेल, तीलासुद्धा कधी वैताग येत असेल याची जाणीव ठेवून तिला त्रास होणार नाही वाईट वाटणार नाही अस वागणं बोलणं सोडलं तर नक्कीच तीलासुद्धा एक वेगळच बळ मिळेल.
आपला जोडीदार त्याच्या कामात असेल तर त्याला समजून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण हल्ली तस् घडत नाही. आपल्या इच्छा अपेक्षा त्याचबरोबर आपली जीवनशैली जितकी बदलते तितकंच आपल्या गरजा वाढतात आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करतो. जर आपल्याला जास्त मिळवायचं असेल तर कष्ट सुद्धा तेवढेच करावे लागणार मग या सगळ्यात कुठेतरी आपण एकमेकांना हवा तसा वेळ देत नाही.आणि मग एकमेकांना दोष देत बसतो. इथे गरज आहे ती एकमेकांना समजून घेण्याची.
जिथे एकमेकांना समजून घेण्याची तयारी असते त्या नात्यात कधीच एकमेकांना डावलून एकमेकांना गृहीत धरून कोणतच वागणं नसते. एकमेकांच्या साथीची एकमेकांच्या त्यागाची जाणिव ठेवली तर कधीच वाद होणार नाहीत आणि नात्यातील विश्वास हा वाढत जाईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

