शरीरसंबंधासाठी लग्नाचं वचन दिलं, नंतर फसवणूक केली!!
टीम आपलं मानसशास्त्र
भुषण आणि मेघना..कॉलेजमधे असताना ओळख झाली त्या दोघांची.. ती दिसायला खूप सुंदर अभ्यासात हुशार आणि तो सुद्धा कोणालाही वागण्या – बोलण्यातून आकर्षित करून घेईल असाच होता.
ओळख झाल्यानंतर रोज एकमेकांशी बोलता बोलता कधी ती त्याच्या प्रेमात पडली तिलासुद्धा कळलं नाही. एकमेकांना बोलणं भेटणं हे तर रोज चालूच असायच. तो तिला वेगवेगळे गिफ्टस द्यायचा वरवर का असेना तिला दाखवण्यासाठी तिची काळजी करायचा आणि तिला मात्र ते खर वाटायचं.
त्याच्यावर तीच इतकं प्रेम होत की तिला त्याच्याशिवाय दुसर काहीच सुचत नसे. असे करता करता चार वर्ष सहज उलटली. परीक्षा झाल्या.. तिला स्थळ सुरू झाले आणि मग तिने त्याला लग्नाबद्दल विचारलं.. त्यावेळी हा लग्न करूयात ग पहिले नोकरी तर मिळूदेत अस म्हणत त्याने तिला उत्तर देणं टाळलं..
पण लग्नाच्या आशेने ती मात्र त्याच्यावर पूर्ण अवलंबून होती. आणि त्याने लग्नाची वचन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.आणि ती भोळ्या मनाने हाच विचार करत त्याला नाकारत नव्हती की जर नाही संबंध ठेवले तर हा नाराज होईल आणि मला सोडून जाईल.
तिला तिच्या मैत्रिणींनी खूप समजावलं पण तिच्या मनात हा एकच विचार होता की इतके वर्ष झाले याच्याशी प्रेमाचं नातं ठेवलं आहे आणि आता तर शरीर संबंध सुद्धा झालेत आणि मी याला सोडून दुसर कोणाचा विचार तरी कसा करू शकते..आणि मी दुसर कोणाची फसवणूक करूच शकत नाही. प्रेम शरीरसंबंध जर हे एकसोबत झाले असतील मी दुसर कोणासोबत कस लग्न करू शकते.. मी खऱ्या मनाने याच्यावर प्रेम करते तो सुद्धा एक दिवस माझ्याशी लग्न करेल ..
पण तिचा हा विश्वास कायमचा तुटला जेव्हा तो तिला सोडून निघून गेला.. तिचे फोन उचलत नव्हता ना कोणत्या मेसेज चे उत्तर देत होता .. ती खूप रडली.. आतून तुटली कोलमडली…पण त्याला तिची काळजी नव्हती ना कसली जाणीव कारण त्याला हवं होत ते फक्त शरीरसुख…
आज ती जून सर्व विसरून नव्याने जगण्याचा प्रयत्न करतेय.. खूप कठीण आहे तिच्यासाठी सगळं पण तिने जगणं सोडलं नाही. पण असा नंतर त्रास होणार असेल तर आधीच सावध असलेलं बरं. आणि जरी या गोष्टी प्रेमात असलेल्यांना आधी कळत नसल्या तरी सर्व लवकर अर्पण करायला नको.
ती जरी खरी असली तरी तिला खर ओळखता आल नाही.. प्रेम आंधळ असते अस म्हणतात पण आपण करतोय ते प्रेम आहेना की आपल्याला कोणी फसवतेय हे नक्कीच जाणून घ्या.. प्रेम हे निस्वार्थी जर असते तर ते दोन्हीकडून असेल तर खर नाहीतर कोणता स्वार्थ मनात ठेवून वरवर प्रेम दाखवणे म्हणजे नक्कीच फसवणूक असते….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

