Skip to content

प्रत्येक बायकोची इच्छा असते की आपला नवरा असा असावा !!!

जोरू का गुलाम…की खरा जीवनसाथी…?


संजना इंगळे


गिरीश सोसायटी मध्ये सर्वांचा टारगेट बनला होता. बायकोचा बैल, जोरू का गुलाम म्हणून लोकं त्याला हिनवायचे… गिरीश ने प्रचंड दुर्लक्ष केलं, त्याला या बिरुदांच काहीही वाटत नव्हतं… गिरीश अंगणाला झाडू मारायचा, कचरा टाकायला जायचा, कपडे वळत टाकायला जायचा…शेजारच्या स्त्रियांना हेवा वाटायचा, त्या आपल्या नवऱ्या जवळ बोलायच्या…

“पहा तो गिरीश त्याचा बायकोला किती मदत करतो ते, शिका जरा तुम्हीपण…” मग त्यांचे नवरे तुसड्यात सांगत….”आहे तो जोरुचा गुलाम, बायकोचा बैल…..मी पण असा बैल बनू का??” कामं केल्याने आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थाला ठेस लागेल अशी समजूत स्त्रिया करायच्या….मग त्याही गिरीश लाच बैल म्हणायला मागे पुढे पहायच्या नाही…. एकदा सोसायटी चा कार्यक्रम होता…जेवण चालू होती, गिरीश आपल्या बायकोला पाणी आणण्यासाठी उठला तोच कुजबुज ऐकू आली….”पहा तो बैल, बायकोचा बैल….”

आता मात्र गिरीश ला सहन झाले नाही, तो तडक स्टेज वर गेला, माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली…

“नमस्कार, मी बैल….बायकोचा बैल….म्हणजे माझं हे बारसं तुम्हीच केलंय ना… तुमच्या सारख्या संकुचित प्रवुत्तीच्या माणसांना मी शक्यतो टाळतो, पण या देशात स्त्रियांची स्थिती पाहता तुम्हा पुरुषांमुळे जो कचरा भरलाय तो आज जरा काढावा म्हणतोय… मी माझ्या बायकोला कामात मदत करतो, तिला साथ देतो, दोन्ही मिळून आम्ही कामं करतो…यात तुम्हाला कसला त्रास होतोय?? माझ्या बायकोच्या जागी माझी आई अथवा बहीण असती आणि मी तिला अशी मदत केली असती तर किती कौतुक लागलं असतं ना तुम्हाला?? किती प्रेमळ आहे, किती चांगला आहे वगैरे?? तेव्हा “आईचा बैल”,”बहिणीचा बैल” असंच म्हटला असता काय?? माझ्या आईला आणि बहिणीलाही मी मदत करायचो, नंतर माझी बदली झाली आणि मी बायकोला घेऊन इथे आलो… मदत मी तेव्हाही करायचो आणि आत्ताही, फक्त स्त्री बदलली, आधी आई आणि बहीण होती, आता बायको आहे..मग बायको म्हटल्यावर तुमचा दृष्टिकोन का बदलला?? बायको स्त्री नाही?? माणूस नाही?? की बायको ला गुलाम बनवून आपल्या इशाऱ्यावर नाचतं ठेवायची विचारसरणी तुमच्या मनात खोलवर दबा धरून आहे?? बायकोला मदत केली, तिला कधी आयते जेवण बनवून दिले, आयते पाणी दिले…पण मला नाही वाटत त्याचमुळे माझ्या पुरुषार्थाला धक्का बसला असेल… निकम साहेब, तुम्ही मला बैल म्हणण्यात अग्रेसर…तुम्ही आपल्या बायकोला कश्या पद्धतीने शिवीगाळ करतात हे सगळ्या सोसायटीला माहीत आहे, आणि तुम्हाला मात्र त्याचा फार अभिमान वाटतो…. नाही का??? हाच का तुमचा पुरुषार्थ??

गेली 4 वर्षे तुम्ही कामधंदा न करता घरी बसून आहात… वडिलांच्या कमाईवर जगत आहात….तिथे कुठे गेला तुमचा पुरुषार्थ??? एकीकडे स्त्री सक्षमीकरणाच्या बाता बडवायच्या आणि दुसरीकडे स्त्री ला आपल्याच घरात गुलाम बनवून ठेवायचं… हाच तुमचा पुरुषार्थ… बायकोला अर्धांगिनी म्हटले जाते, मी माझ्या बायकोला तिच्या सर्व कामात, अगदी झाडलोट पासून कपडे वाळत घळण्यापर्यंत मदत करतो, यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. माझी बायको सुद्धा माझा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून 4 पैसे कमावते, घरातली इलेक्ट्रिक ची कामही करते…जशी मी तिचा भार कमी करतो तसाच तीही माझा भार कमी करते…त्यामुळे आमचा संसार अगदी सुखाचा चाललाय… उगाच लोकं काय म्हणतील याचा विचार करून माझ्या बायकोलाही गुलामगिरीच्या त्याच मार्गावर न्यायला माझ्या बुद्धीला पटणारे नाही…माझ्या बायकोचे सल्ले, तिचे विचार मी ऐकून घेतो, कुठल्याही स्त्री ला व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे तंत्र मुळातच अवगत असते…त्या बाबतीत मी तीचंच ऐकतो…माफ करा पण त्यामुळेच माझी आर्थिक परिस्थिती तुम्हा सर्वांहून फार चांगली आहे…तुमच्या सारखं बायकोचे विचार डावलत, नुकसान झालं तरी चालेल पण बायकोचं ऐकणार नाही या विचारांचा मी नाही…. मी माझ्या बायकोला अशीच साथ देत राहणार, भलेही मला कोणी जोरुचा गुलाम म्हणो वा बायकोचा बैल… धन्यवाद…

गिरीश एवढं बोलला आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यात आनंदाश्रू आले…असा रोखठोक, सत्याची कास धरणारा आणि सत्यापुढे लोकांच्या टिकेचीही पर्वा न करणारा एक महान पुरुषार्थी तिला नवरा म्हणून मिळाला होता… सोसायटीतलीे लोकं अंतर्मुख झाली, बायकांना सार्थ कौतुक वाटले आणि माणसांची नजर शरमेने झुकली.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

18 thoughts on “प्रत्येक बायकोची इच्छा असते की आपला नवरा असा असावा !!!”

  1. Khup khup Chan ahe प्रत्येकाचे असे विचार असतील तर आपल्या सारखे सर्वच जन एक उत्कृष्ट कार्य करतील यात काही शंका नाही त्यामुळे लोक काय बोलतील याकडे लक्ष न देता एक चांगले कार्य करत राहणे गरजेचे आहे आपल्याला आपल्या पत्नी बरोबर आयुष्य व्यतीत कार्याचे आहे त्यामुळे एकमेकांनी एकमेकांचा आधार जाले पाहिजे आपली पत्नी ही एक आपला आधार स्तंभ आहे आणि तोच जर आपल्याकडे मजबूत नसेल तर आपले संसार खूप विस्कळीत होईल यात काही शंका नाही त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचे आहे .

  2. Lockdown काळात आपल्या घरातील स्त्री सदस्यांची झालेली त्रेधा तिरपिठ आणि प्राकृतिक हेळसांड , ज्या पुरुष वर्गाने बारकाईने पाहिली असेल , ते या पुढे आपले घरातील वर्तन आणि कार्य पद्धतीत नक्कीच बदल केला असेल,
    म्हणजेच घर कामात जास्तीत जास्त लक्ष देत, हातभार लावत असतील ,

  3. Kharach khup sunder ahe..pratek पुरुषाने असा वेगळा विचार करणे गरजेचे आहे…तरच स्त्री मानसिक अर्थाने सुखी होईल,…

  4. Agdi barobar aahai madat Karn khup chagl aahai . Tay jagi bayko aso kiwa aajun koni pan madat Kara pan aapn jayla madat karto aahai tayla pan tayche janiv pahijel saglch navre kiwa saglaych bayka samjun ganaray nastat as mala watat

  5. Baiko jr fqt housewife asel tr tine gharatli sagli kame karyayalla ky harkat ahe.navra job karto bahercha pn khup tension astat ani ajun tyachya kadun apeksha karne mhanje he selfish pana Kala.

  6. BHIKULAL JADHAV

    मला वरील लेख 100 टके भारी वाटत कारण संसार हा दोगाचा असतो.घरात लहान मुले आपले आई वडील भाऊ भाहिन आसतात.आपली पत्नी पैसे कमावत आसो किंवा नसो आपण त्यांना मदत केली पाहिजे मी स्वतः ऑफिस चे काम करून पत्नीस पुर्ण मदत करतो.व तिच्या भावना जाणून घेतो….पत्नीला मदत करणे महनजे बैलोबा नव्हे……

  7. खरच खूप छान .आजकाल आईने च आपल्या मुलांना थोडी फार घरकाम शिकवायला पाहिजे तरच त्याचा पुढे संसार सुखाचा होईल

  8. खुपच छान सुंदर लेख आहे सर्व पुरुष वर्गाने याचा विचार करावा. असे वाटत आहे.
    धन्यवाद

  9. छान
    पण
    काही बायकाच त्याला विरोध करतात
    काही आयाच लहान पणापासून मुलगा – मुलगी असा भेद करतात व मुलाने काही ही केले तरी चालते . मुलिने मात्र हे केले पाहिजे ते नको तिला घराच्या बाहेर पडू देत नाही पर पुरुषाशी बोलू पण देत नाही व नंतर परक्या पुरुषाशी लग्न करून जावे अशी ईच्छा बाळगते.

  10. खरच खूप छान वाटले वाचून की.एक माणूस म्हणून एखाद्या आईला,बहिनीला मदत करतोच तसच बायको ला का करायची मदत हा काही गुन्हा आणि कुठले काम छोट मोठ नसते आणि हे घरातूनच संस्कार घडतात म्हणून माणूस घडतो hat’s of you yours thinking……..

  11. Sandhya Patangrao

    आघीतुमचे आभार तूम्ही या झोपलेल्या लेकानाजागे केले मी एक आईआहे मला पण माझ्या मुलाणी आसेवागावे आसेचवाटते तो माझी ताईची आजीची काळजी करतो तसेच तीचिपण तेवढाच काळजी घ्यावी तर च संसार सुखाचा आणि आनंदी हो ईल खूप खूप धन्यवाद सुखी रहा एक आई

  12. खूप छान वाटले खरे आहे हे समजत वावरताना सोसायटीत काय घरातले पण असे बोलतात ताटाखलचे मांजर …. असेपण संबोधतात…..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!