“सध्या काय चाललंय तुझं??” स्वतःशी जरा बोलून बघा !
मिनल वरपे
बऱ्याच वर्षांपासून एका मैत्रिणीसोबत बोलणं झालं नव्हतं काल अचानक तिचा फोन आला .. मग काय बऱ्याच गोष्टी एकमेकींना सांगत बसलो आणि वेळ कसा गेला ते कळलच नाही…
तिच्यासोबत गप्पा मारताना अनेक विषय निघाले .एकमेकींच्या आयुष्यात काय काय घडलं.. काय अडचणी आहेत ..आलेले सुख दुःख यांच्याबद्दल बोलताना मन मोकळं वाटल…. खूप आनंद झाला.
आणि यातूनच एक विचार आला ती म्हणजे मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटली तरी इतका आनंद झाला मन मोकळं झालं पण ती तर तशीही लांब आहे.आपल्याला मित्र मैत्रीणीना भेटायचं mhntal की दोघांना वेळ मिळाला पाहिजे..मित्र मैत्रीणीना भेटणं बोलणं इतकं सोप्पं नाही जितकं सोप्पं आपण स्वतःशी संवाद साधणं आहे…….
हा हाच विचार आला.. आठवून बघा आपण स्वतः सोबत कधी आणि किती संवाद साधला आहे.. दुसऱ्यांना आपण सहज विचारतो कसा आहेस.. की काय चाललय आयुष्यात.. शिक्षण संसार नोकरी सुख दुःख आणि बरंच काही आपण इतरांना विचारतो. छान सल्ले सुद्धा देतो. इतरांसोबत बोलल्यावर आनंद मिळतो, मनमोकळ वाटते त्या क्षणाला का असेना पण खूप उत्साह जाणवतो.
पण मग आपण स्वतःशी का नाही बोलत.. कधीतरी बोलून बघा.. विचारा स्वतःला की तू कसा आहेस..तुझ्या आयुष्यात काय चाललं आहे.. तू आनंदी आहेस ना..काळजी घेतोस ना स्वतःची.. जे तुझ्याकडे आहे त्यामधे तू सुखी समाधानी आहेस ना… तुला काय हवं आहे.. तुझ्याकडे कसली कमी आहे…
आणि जेव्हा आपण स्वतःला हे प्रश्न विचारू तेव्हा अगदी खरी उत्तर आपल्याला मिळतील. आपण इतरांना जरी सगळ्याच गोष्टी सांगत नसलो तरी स्वतःशी मात्र कधी खोटं बोलणार नाही.. स्वतःला कधी टाळणार नाही.. आणि यातूनच आपल्याला जगण्याचा मार्ग मिळेल.
जर मी स्वतःला सांगितलं की मी आनंदी नाहीये तर का आनंदी नाहीये हे सुद्धा सांगणार आणि मग आनंदी होण्याचे मार्ग शोधणार.. मला जर अजून कोणत शिक्षण घ्यायचं.. कोणती नोकरी करायची हे कळत नाहीये तर मी स्वतःला विचारणार की मला काय आवडते आणि त्यामधे पुढे जाणार..
आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं ही आपल्या स्वतःकडेच असतात. फक्त ते स्वतःला विचारण्यासाठी स्वतःशी संवाद साधणे गरजेचे असते. आपण इतरांना सहज वेळ देतो पण दिवसातून किमान थोडावेळ तरी स्वतःला दिला तर नक्कीच आपल्याला इतरांना आपल्या आयुष्यातील अडचणी सुख दुःख यांच्याबद्दल चर्चा करण्याची गरज कमीच जाणवेल. कारण आपल्याकडेच सर्व उत्तर आहेत फक्त ती स्वतःशी बोलून शोधायला हवीत.
बऱ्याच दिवसांनी इतरांशी बोलून जो आनंद आपल्याला मिळतो त्यापेक्षा नक्कीच थोडा जास्त आनंद आपल्याला स्वतःशी संवाद साधल्याने मिळेल आणि तो सुद्धा रोज…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

