Skip to content

शारीरिक संबंधांचा एकमेकांच्या नात्यांवर परिणाम होत असतो.

शारीरिक संबंधांचा एकमेकांच्या नात्यांवर परिणाम होत असतो.


अपर्णा कुलकर्णी-नानाजकर.


लग्नानंतर प्रत्येक जोडप्यांमध्ये वादाच कारण ठरणारा आणि तरीही बोलला न जाणारा मुद्दा म्हणजे शारीरिक संबंध. लग्नानंतर प्रत्येकाला या गोष्टीला सामोरी जावच लागतं. शारीरिक संबंध ही काही चुकीची,लाजीरवाणी,किळस वाटणारी गोष्ट नाही. ही अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक क्रिया आहे. एकमेकांच्या गुप्त अंगांची माहिती करून घेणे किंवा त्याबद्दल बोलणं यात गैर काहीच नाही.

लग्न ही एक जबाबदारी आहे पूर्ण आयुष्यभराची एकमेकांनी एकमेकांची घेतलेली. यामध्ये शारीरिक संबंध हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत एकमेकांसाठी घालवणार असतो,एकमेकांची सुख दुःख वाटून घेणार असतो,आयुष्यातील प्रत्येक क्षण एकमेकांसोबत घालवणार असतो मग तिथे शारिरक संबंध निर्माण होताना लाजायची काय गरज आहे.

मान्य आहे पहिल्यांदा भीती वाटणं,लाज वाटणं,अवघडल्या सारख होणं साहजिक आहे. पण जेव्हा ही गोष्ट वादाचं कारण बनते तेव्हा बोलून प्रश्न सोडवण गरजेचं ठरतं.

नेहमी काय होत नवऱ्याला वाटत की आपलं आता लग्न झालंय म्हणजे बायकोवर आपला पूर्ण अधिकार आहे.त्यामुळे तिची समती गृहीत धरली जाते आणि नवरा आपला अधिकार गाजवत राहतो. मान्य आहे की नवऱ्याचा बायकोवर अधिकार असतो.

जी व्यक्ती तुमचीच आहे तिथे अधिकार गाजवण्याची काय गरज ? शारीरिक संबंध सारखी नाजूक गोष्ट हाताळताना अधिकार दाखवून कसं चालेल ??अधिकाराने ही गोष्ट घेण्यापेक्षा प्रेमाने तिच्या कलेने सगळं हाताळता आल तर कोणताही प्रश्न निर्माणच होणार नाही.

संबंध प्रस्थापित करताना एकमेकांची आवड,इच्छा,मूड,मन जपण गरजेचं असतं. एकमेकांच्या नजरेतून कळायला हवं की आपल्या जोडीदाराला काय अपेक्षित आहे. शारीरिक संबंध ही एक प्रक्रिया आहे, पद्धत आहे त्यासाठी योग्य वेळ आणि वातावरण असणं गरजेचं आहे. कोणी कोणी शारीरिक संबंध ५ मिनिटात पण करून मोकळे होतात तर कोणा कोणाला अर्धा तास ही लागतो.प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.पण तुम्हाला काय आवडत या पेक्षा तुमच्या जोडीदाराला काय आवडत याचा विचार करा आणि मग कृती करा.

जेव्हा संबंध निर्माण होऊन दोघांनाही समाधान मिळतं तेव्हा दोघांचंही मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते,मन उत्साही राहते.त्या गोष्टी मधील ओढ वाढत जाते,भीती निघून जाते,एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाटायला लागते आणि पर्यायाने नातं घट्ट होत.

पण जर हे सगळं नीट होत नसेल कोणीतरी एक असमाधानी रहात असेल तर मनाची कुचंबणा होते. सतत काहीतरी सलत रहात मनात जे कोणालाही बोलता येत नाही त्यामुळे चिडचिड होत राहते आणि त्याचा नात्यावर परिणाम झाल्या शिवाय रहात नाही.

नवऱ्याने पाहिजे तसं काम भागवून निघून जायचं आणि बायको ने कर्तव्य पार पाडत असल्यासारखं पडून राहायचं याला संबंध म्हणत नाहीत.त्यामुळे घुसमट होते आणि ही घुसमट बायकोच्या च वाट्याला येते नेहमी.

यासाठी दोघांनी या बाबतीत बोलून आपले विचार मांडावे अगदी मोकळे पणाने आपला अहंकार मध्ये न आणता एकमेकांना न दुखवता आणि एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि नातं घट्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

या सगळ्या गोष्टींची माहिती इंटनेटवर उपलब्ध असते , पुस्तकांमध्ये असते.ती माहिती करून घ्यावी आणि योग्य निर्णय घ्यावा.एकमेकांवर दोष देत ,चुका काढत बसू नये.

मग नातं फुलेल आयुष्यभर.


 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!