सकारात्मक विचारांच्या मित्र-मैत्रिणींमुळे आयुष्य आनंदी होते!!
टीम आपलं मानसशास्त्र
नकारात्मक विचार करणारे किंवा कोणत्याही कामांमध्ये अडचणींबद्दल बोलणारे किंवा चुकीचा सल्ला देणारे, अशा कोणत्याही मित्र-मैत्रिणींपासून नेहमी दूर राहायला हवे. त्यासोबतच, सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांना आयुष्यात भरपूर जागा दिली पाहिजे, कारण ते आपले आयुष्य अधिकाधिक चांगले बनावट असतात.
आपले मित्रमैत्रिणी जर सकारात्मक विचारांचे असतील, तर आयुष्य हे अधिक आनंदी होते, असे म्हणतात. म्हणजे, अर्धा भरलेला ग्लास समोर असेल, तर तो ग्लास अर्धा रिकामा आहे असे म्हणणाऱ्या व्यक्ती नकारात्मक विचार करत असतात, असे आपण ऐकले असेलच.
आपल्याला जर आयुष्यातही असाच विचार करणारे मित्र किंवा मैत्रीण मिळाले, तर तशीच नकारात्मकता आपल्या स्वभावात येणे हे देखील अत्यंत स्वाभाविक असते.
एखाद्या व्यक्तीकडे पाहून कोण चांगलं असेल किंवा कोण वाईट असेल, हे ठरवणे अवघड असते. पण, यात एक गोष्ट नक्की असते कि, अशा नकारात्मक विचार करणाऱ्यांना, अडीअडचणींबद्दल बोलणाऱ्या मित्रमंडळींना आपल्या आयुष्यात कधीही जागा देऊ नये. जे फक्त समस्या निर्माण करतात त्यांना तर मुळीच जागा देऊ नये.
ज्यांच्या आयुष्यात मित्रमंडळी नाहीत किंवा ते कमी असतात, त्यांच्या आयुष्यात आनंद कमी असतो, असेही दिसून येते. ऑस्ट्रेलियामध्ये ‘स्टडी ऑफ एजिंग’ नावाचा एक अभ्यास आला. त्याच्या निष्कर्षानुसार जर आपण आयुष्यात आनंद वाढवू इच्छित असू तर मित्रांची संख्या वाढवली पाहिजे.
संशोधकांना असे वाटते कि आनंद आणि मड किंवा आशा कायम ठेवायची असेल, तर मित्रांच्या सहयोगाची आवश्यकता असते. या संशोधकांच्या टीमचे प्रमुख अध्यापक लोफ फोर्ड यांचे म्हणणे असे आहे कि, कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसोबत असलेली निकटता, आपलेपणा याचा आयुष्यावर मोठा प्रभाव पडत असतो.
जास्तीत जास्त मित्रांची सोबत असेल तर आयुष्यात येणाऱ्या चढ-उत्तरांना सामोरे जाणे हे सोपे होत जाते. अशा लोकांमध्ये विश्वास आणि धाडस हे दोन्ही अधिक प्रमाणात असते.
संशोधकांनी या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास १० वर्षे सलग अभ्यास केला. यादरम्यान त्यांनी सुमारे पंधरा हजार लोकांचे निरीक्षण केले आहे. या अभ्यासामध्ये त्यांच्या असे लक्षात आले कि धनदौलत, राहणीमान, जीवनशैली यासारख्या गोष्टींसोबतच लोक आपले मित्रमंडळी आणि कुटुंब यांच्यासोबत अधिक आनंदी आणि विश्वासपूर्ण वातावरणात राहू शकतात.
मनोचिकित्सक डॉक्टर रिजवान वाही यांच्या म्हणण्यानुसार आपल्या मेंदूमध्ये मिरर न्यूट्रॉन्स असतात. ते आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव करून देण्यामध्ये मदत करत असतात.
सायकॅट्री रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार जर आपल्या आजूबाजूला नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची गर्दी असेल तर त्यांना तातडीने दूर करायला हवे, नाहीतर ते लोक आपल्याला देखील त्याच गर्दीचा एक भाग बनवू शकतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

