तुमची मुलं तणावाखाली आहेत, हे कसं ओळखाल ??

तुमची मुलं तणावाखाली आहेत, हे कसं ओळखाल ??


टीम आपलं मानसशास्त्र


आपली मुलं तणावाखाली आहेत, हे कसं ओळखायचं, असा प्रश्न अनेक पालकांना पडत असतो. मुलांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात झालेले पुढील बदल समजून घेणे महत्वाचे आहे.

तुमची मुलं अचानक शांत झाली असतील, त्यांच्या बोलण्यात फरक जाणवत असेल, तर ती मानसिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या जाणून प्रयत्न करा.

त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांचं मन एखाद्या कामात रमेल यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण हलका होण्यास मदत होईल.

जर तुमची मुलं सतत काळजीत किंवा चिंतेत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण जर त्यांच्या मनात एखाद्या गोष्टींची भीती असेल तरच ते चिंतेत दिसतील. तुमची मुलं सतत प्रश्न विचारात असतील तर त्यांच्या मनावर ताण असू शकतो. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अवश्य द्या.

मात्र त्यामुळे त्यांच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या. मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये किंवा झोपण्याच्या सवयीत अचानक बदल झाला असेल, कधी ते जास्त वेळ झोपतील तर कधी त्यांना झोप लागत नाही.

अनेक वेळा मनावर ताण असलेल्या मुलांना वाईट स्वप्ने पडतात. ते एखाद्या गोष्टीचा विचार करत असतील तर त्यांना झोप लागत नाही. त्यामुळे मुलांच्या झोपण्याच्या जेवणाच्या सवयीचे निरीक्षण करा. या तुम्हाला मोठा बदल जाणवत असेल तर त्या सवयीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

तुमची त्यांच्यासाठी एक आरोग्यपूर्ण  दिनक्रम आखून द्या. लोकडाऊन सुरु झाल्यापासून सोशल मिडीयावर वेळ घालवण्याचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. तुमची मुलं घरातल्यांशी न बोलता सोशल मीडियावर खूप वेळ घालवत असतील तर त्यांच्या या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावरील आभासी गोष्टींची तुलना करण्याच्या सवयीमुळे मुलांच्या मनात असुरक्षितता किंवा चुकीच्या गोष्टींबाबत स्पर्धा करण्याची इच्छा निर्माण होते.

आक्रमकता आणि लहरीपणा हि मनावर ताण असण्याची लक्षणे आहेत. सांगितलेल्या गोष्टी न ऐकणे, किंवा हातातील गोष्टी अचानक फेकून मारणे, नको त्या वस्तू मागणे किंवा प्रश्न विचारणे इ.

हि लक्षणे जर मुलांमध्ये दिसत असतील तर त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी मुलांना सांगून जर ती ऐकत नसतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा मुलांचं समुपदेशन करून घ्या.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.