नकारात्मक बातम्यांचा मनावर परिणाम होऊ देऊ नका !!
गिरीशकुमार तुकाराम कांबळे
गेल्या वर्षभरापासून आपल्या कानावर अनेक चर्चा , समाजमाध्यम , सोशल मिडिया ऐकायला व बघायला मिळतात त्या म्हणजे कोरोना, लॉकडाऊन , महामारी, सकाळी वर्तमानपत्र वाचले तर सगळ्या बातम्या या कोरोना संदर्भातील असतात. पॉझिटीव्ह शब्द सुद्धा भयावह वाटत आहे .
या कोरोना च्या सध्याचा घडामोडी वर अनेक विनोद सोशल मीडियाचा माध्यमातून प्रसारित होत असतात त्यापैकी एक म्हणजे चिनीची साधी लायटिंग ची माळ एक दिवाळी टिकत नाही पण, कोरोना 2 दिवाळी झाले टिकला आहे .विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सगळा वेळ हा कोरोना च्या चर्चा मध्ये जातो .
क्रिकेट चा सामना चालू असतो जेव्हा उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजी करत असतो तेव्हा फलंदाज आपली विकेट टिकवुन खेळत असतो.त्या फलंदाजाला माहित असते दुसरा गोलंदाज आला की आपण त्याला उत्कृष्ट पद्धतीने खेळून धावा वसूल करू शकतो.या गोलंदाजचे षटक पूर्ण होईपर्यंत खेळून काढणे व विकेट टिकवून ठेवणे हे महत्वाचे आहे .
संयम व काळजी घेतले नाही तर बळी जायचे शक्यता असते .कोरोना सुद्धा हा थोड्याच काळासाठी आला आहे आपण फक्त खेळपट्टीवर टिकून राहायचे आहे .आपण पुन्हा मास्क न घालता फिरायचे आहे, अनेक सण ,उत्सव त्याच उत्साहाने साजरे करायचे आहेत , पुन्हा विद्यार्थी शाळेत व कॉलेज मध्ये त्याच आतुरतेने जाणार आहेत , पण त्या आधी आपण थोडा संयम बाळगणे गरजेचे आहे हा काळ थोडा संघर्षाचा आहे पण त्या काळाला त्या वेळेला सुद्धा सांगा वारसा संघर्षाचा आहे .या संघर्षाला संयमाची जोड दिले तर आपण लवकरच यातून बाहेर पडू .
कोरोना काळात सर्व बातमी , चर्चा याचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो .तुम्ही केलाला एक नकारात्मक विचार तुम्हाला नैराश्यच्या गर्तेत ढकलतो. लहान मुलांना घरचे सांगतात तिकडे जाऊ नको बाऊ येतो . त्यामुळ मनाते भीती निर्माण होते.आपले विचार आपल्या भावना याचे अप्रत्यक्ष नाते आहे .
विचार बदलला की भावना बदलतात आणि भावना बदलल्या कि वर्तन बदलते .दिवसभरात घडणाऱ्या अगणित घटना अणि प्रसंग तुम्हाला विचार करायला भाग पडतात.आयुष्य निर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये चांगल्या किंवा वाईट घटनाचा मनावर होणारा परिणाम तेवढाच घातक किंवा चांगला असतो.
आयुष्यात स्वतःचा असणारा आपल्या ध्येयाबाबत फोकस या घडणाऱ्या घटनामुळे हालता कामा नये. कठीण प्रसंगात ठेवलेला संयम भावी आयुष्यात अनुभव म्हणून कामी येतो .घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटना या तुमची परीक्षा बघण्यासाठी येत असतात.कॅमेरा मध्ये फोटो काढताना जसा फोकस हलला की फोटो नीट येत नाही तसेच आपल्या ध्येयाचा फोकस सुद्धा हलाता कामा नये.
एक रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे आपले आयुष्य संपत नाही .आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका. कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे.पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही.या कोरोनाच्या संकटाकडे आपण जुन्या नकारामक विचारांनी बघितले तर परिणाम सुद्धा नकारात्मक होतो.
नकारात्मक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघितले तर गोष्टी सकारात्मक होतात.भारतीय योगशास्त्रात कोणत्याही आव्हानाला सामोरे जाताना आपल्या श्रद्धा , निष्ठा , क्षमता , बळकट करणारा प्रभावी शब्द स्वतः शी नेहमी बोलत राहायचे ते म्हणजे मी या अवघड काळात निरोगी राहू शकतो व त्याला तोंड देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे .स्वतः स्वयं संवाद या काळामध्ये नक्कीच उपयोगी येईल.
स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून व त्याला संयमाची जोड दिली कि आपण यातुन लवकरच बाहेर पडू आणि तो दिवस दिवाळीसारखा उत्साहवर्धक असेल हे नक्कीच .
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

