Skip to content

रोमँटिक जगण्यासाठी जोडीदाराची गरज असतेच का ?

रोमँटिक जगण्यासाठी जोडीदाराची गरज असतेच का ?


अपर्णा अशोक कुलकर्णी


प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय जगण्याला अर्थ नाही. रोमँटिक आयुष्य घालवायला कोणाला आवडणार नाही?? पण खरंच रोमँटिक जगायला जोडीदाराची गरज असतेच का ??

प्रेम या शब्दामध्ये प्रचंड ताकद आणि जगायला लागणारं सामर्थ्य आहे. प्रेम या विषयावर खूप लोकांनी खूप काही लिहून ठेवलंय,कविता केल्यात.पण तरीही हा विषय न संपणारा आहे.

प्रेमाला शब्दाची,भाषेची,वयाची, जाती – धर्माची,काळ – वेळ ची कशाचीही मर्यादा नसते.प्रेम हे प्रेम आहे त्याला शब्दात बांधायचा प्रयत्न निरर्थक आहे.प्रेम मुक्त करतं,स्वच्छंदी करतं,बहरायला शिकवत, जगायला नवं बळ देतं,जगण्याची नवी परिभाषा शिकवत आयुष्यात आनंद देतं, अगदी निरपेक्षपणे,जीवाला जीव देत प्रेम.

प्रेम सगळ्यांच्या आयुष्यात असतेच असते.आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येकावर प्रेम करतो.कुटुंबावर,मित्रांवर, शेजाऱ्या वर सुद्धा.पण प्रेम फक्त माणसांवर केलं जातं का??प्रेम फक्त व्यक्ती पुरतेच मर्यादित आहे का ?? तर नाही.नक्कीच नाही.

प्रेम पुस्तकावर केलं जातं,निसर्गावर केलं जातं,आपल्या आवडी – निवडी वर केलं जातं,एखाद्या वस्तू वर केलं जातं.प्रेम अमर्याद आणि अथांग आहे.प्रेम पूर्ण आयुष्य जगायला दोन व्यक्तींची गरज असते का ?? जोडीदाराची गरज असते का??तर तसं अजिबात नाही.

काही लोकं आयुष्यभर अविवाहित राहतात,काही लोकांच्या आयुष्यात त्यांचे जोडीदार त्यांना सोडून गेलेले असतात ( या जगात नसतात ) , तर काही लोक स्वखुशीने वेगळं होण्याचा निर्णय घेऊन एकटे राहतात.मग या लोकांच्या आयुष्यात रोमँटिक असं काही नसतंच का ??

रोमँटिक आयुष्य जगायला सोबत जोडीदार असायलाच हवा असं अजिबात नाही.एकट्याने सुद्धा आयुष्य प्रेम पूर्ण बनवता येत आणि घालवता ही येतं.गरज असते ती फक्त वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघण्याची. शोधलं तर सापडतच मग प्रेम तर प्रत्येक गोष्टीत आहे.त्याकडे फक्त डोळसपणे बघण्याची गरज आहे.

एखाद्या अनाथ आश्रमाला भेट देऊन त्यांच्यासोबत वेळ घालवला किंवा त्यांच्यासाठी भेटवस्तू दिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू येईल ते म्हणजे रोमँटिक असणं. एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊन प्रेम देणं म्हणजे रोमँटिक असणं. दवाखान्यात रक्ताची गरज असलेल्या व्यक्तीला रक्तदान करून जीवदान देणं म्हणजे रोमँटिक असणं.

भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला पोटभर खायला देणं म्हणजे रोमँटिक असणं. आपल्या आवडी निवडी जपणं म्हणजे रोमँटिक असणं. आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ करून आपल्या हाताने खायला घालणं म्हणजे रोमँटिक असणं.

कोणाच्यातरी चेहऱ्यावर आपल्या मुळे हसू येणं म्हणेच रोमँटिक असणं. एखाद्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणणं म्हणजे रोमँटिक असणं. चिंब पावसाच्या सरी अंगावर घेत मनमुराद भिजणं म्हणजे रोमँटिक असणं.

आवडत्या गाण्यावर स्वच्छंद नचानम्हणजे रोमँटिक असणं. रस्ता कुठे जातोय हे माहीत नसताना आपल्या आवडीची गाणी ऐकत,गुणगुणत लांब कुठेतरी फेरफटका मारून येणं म्हणजे रोमँटिक असणं.

मावळत्या सूर्याकडे शांतपणे बघत राहणं,समुद्राच्या लटकडे बघणं,पक्ष्यांची गुज ऐकण म्हणजे रोमँटिक असणं. ज्यामधून स्वतःलाही आनंदी वाटेल आणि दुसऱ्यांनाही आनंद वेचायला शिकवता येईल असं काहीतरी करणं म्हणजे रोमँटिक असणं.

हे सगळं करताना कुठेही जोडीदार असायलाच हवा असं मला वाटत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे.अशा खूप गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद आणि समाधान मिळतं.प्रत्येक वेळी कोणीतरी हवंच असं अजिबात नाही.आधारासाठी खांदा हवाच असा अट्टाहास कशासाठी??

आपलं जगणं हे दुसऱ्यासाठी आदर्श ठरायला हवं. आपल्या आयुष्याचा इतरांना हेवा वाटायचा हवा इतकं मनमोकळ जगता यायला हवं.

कोणाचंच आयुष्य परिपूर्ण नसत आणि तेच योग्य आहे.कारण सगळ्यांना सगळ मिळालं तर कशाचीच किंमत उरणार नाही.जे नाही त्याकडे बघण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून कसं जगता येईल त्याचा विचार करून प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवं. हो ना??


 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “रोमँटिक जगण्यासाठी जोडीदाराची गरज असतेच का ?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!