तुम्हांला शून्यात मोजणाऱ्या लोकांशी कसं डील करायचं ?
अपर्णा अशोक कुलकर्णी
आपल्या आयुष्यात खूप लोकं असतात.मित्र – मैत्रिणी,नातेवाईक,माहेरचे लोक,सासरचे लोक, ऑफिस मधील लोक,शेजारी – पाजारी असे बरेच.प्रत्येकाच्या मनात आपलं अस वेगळं स्थान असतं आणि आपल्या मनात त्यांची एक वेगळी जागा असते.कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
पण आपल्या आजूबाजूला असेही लोक असतात ज्यांच्याशी आपलं कधीच पटत नाही ( पटवून घेण्याचा प्रयत्न केला तरी ) किंवा काही लोकांना आपण आवडतच नाहीत.यामध्ये आपल्या जवळच्या लोकांचा सुधा समावेश असतो.अशी लोकं असतात जे सतत आपला तिरस्कार करतात किंवा आपल्याला कधीच किँमत देत नाहीत.त्याला काही कारणं ही असतील,काही गैरसमज असतील.अशा वेळी त्यांच्याशी कसं वागायचं हे च समजत नाही.
मला वाटतं त्या लोकांचं तस वागण्याचं कारण समजून घेण्याची गरज आहे.आधी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की त्यांच्या दृष्टिकोनातून आपण कुठे चुकलो का?? आणि मग आपली बाजू स्पष्ट करून सांगितली गेली पाहिजे.थोडक्यात काय तर समोरासमोर बसून चर्चा केली पाहिजे आणि गैरसमज दूर केले पाहिजेत.अस करून जर अडचण संपली तर उत्तमच.
संवाद साधणं हा एक उत्तम मार्ग आहेच यात शंका नाही पण तरीही काही लोक आपल्याला किंमत देत नाहीत. मत्सर, द्वेष,तिरस्कार,वाईट वृत्ती ही काही त्या मागची कारणे आहेत.
अशा वेळी नक्की काय करावं??
१. दुर्लक्ष करा :
हा या वरचा एक मार्ग आहे.प्रयत्न करूनही जर समोरची व्यक्ती आपल्याला शून्य किंमत देत असेल तर अशा वेळी अस का होत याचा सतत विचार करत बसून त्रास वाढवण्यापेक्षा त्या व्यक्ती च्य वागण्या – बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले च उत्तम.
२. जशास तसं :
कधी कधी खूप सरळ आणि प्रामाणिक वागण्याचं लोकं गैरफायदा घेतात किंवा ही व्यक्ती आपल काहीच वाकड करू शकत नाही अस समजतात.अशा वेळी त्यांना कृतीतून किंवा बोलण्यातून दाखवून देणं गरजेचं ठरतं की आपणही त्यांच्या वागण्याचं उत्तर देऊ शकतो मग ते आपल्यासोबत वागताना १० वेळा विचार करतील.
३. स्वतः पेक्षा काहीही महत्वाच नाही :
बऱ्याचदा आपली आपली म्हणणारी माणसं च आपली शून्य किंमत ठरवून मोकळे होतात.अशा वेळी धक्का बसतो,मनस्ताप होतो आणि गोष्टी पूर्ववत होण्यासाठी खूप प्रयत्न करतो आपण.पण स्वतःच अस्तित्व, मान,स्वाभिमान आणि तुम्ही स्वतः या पेक्षा बाकी काहीच महत्त्वाचं नाही.अशा लोकांसाठी वेळ वाया घालवू नका ज्याला तुमची किंमत च नाही.
४. माणसं ओळखायला शिका :
कधी कधी एखाद्याला ओळखायला एक क्षण पुरेसा असतो तर कधी कधी एखाद्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य घालवलं तरीही तो कळत नाही एखाद्या कोड्यासारख.ज्या लोकांना तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी,तुमच्या असण्या – नसण्याने काहीच फरक पडत नाही त्या माणसाच्या वागण्याचं विचार करण्याची आपल्यालाही काहीच गरज नाही.
कधी कधी अस होत की या लोकांशी आपला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो पण तो तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवायचा त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही.
आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट,घटना आपल्या मनासारखी घडतेच अस नाही ना.तडजोड ही प्रत्येकालाच करावी लागते मग ती कधी कधी माणसांच्या वागण्याची पण असू शकते.आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला,प्रत्येक दिवसाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावीच लागते.
कोणी आपल्याशी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ते आपल्या मनाप्रमाणे,अपेक्षे प्रमाणे कसं असेल.तेव्हा त्यांचं वागणं त्यांच्या पाशी आणि आपलं आपल्या पाशी.जे जस आहे त्याचा स्वीकार करायचा आणि समाधानी राहायचं.
बरोबर ना??
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Nice story
लेख खूपच छान आहे