Skip to content

संयम ठेवला तर सवयी बदलतात, संयमाने आयुष्य सुद्धा बदलता येते.

संयम ठेवला तर सवयी बदलतात, संयमाने आयुष्य सुद्धा बदलता येते.


मिनल वरपे


आपण अनेकवेळा काही गोष्टी ठरवतो पण त्या पूर्ण करणे आपल्याला शक्य होत नाही कारण तिथे आपण मनापासून जरी प्रयत्न केले तरी जेवढी एकनिष्ठ राहण्याची गरज असते ती आपल्यात कमी असते. आणि आपल्याला एकनिष्ठ तेव्हाच राहता येईल जेव्हा आपल्यात संयम असेल.

सवयी सहज बदलत नाहीत कारण सवयींची आपल्याला सवय इतकी झालेली असते की ती सवय बदलायच mhantal तरी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हाच आपल्याला नविन सवय लावता येते.

उदाहरणार्थ,
मी उशिरा झोपण्याची आणि उठण्याची सवय सोडणार आणि सकाळी लवकर उठेन आणि रात्री लवकर झोपेन.
मी माझी काम वेळेत पूर्ण करणार टाळाटाळ करणार नाही.
मी नकोत्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणार नाही.
या किंवा यासारख्या अनेक सवयी ज्यांचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि सवयी बदलण्यासाठी आपण बरेच प्रयत्न सुद्धा करतो पण चांगल्या सवयी लवकर जात नाही.

खर तर वाईट सवयी आपण सोडत नाहीत. सकाळी लवकर उठायचं असे जरी ठरवल तरी त्यासाठी रात्री लवकर झोपल पाहिजे पण आपण रात्री मोबाईल टीव्ही गप्पा इ. यांना इतकं महत्त्व देतो की झोपताना उशीर होतो आणि मग सकाळी उठायची वेळ आली की आपण अजून जरावेळ झोपू अस म्हणत कधी उशीर होतो आपल्यालाच कळत नाही.

जर आपला स्वतःवर संयम असेल तर नक्कीच अशक्य असे काहीच नाही. म्हणतात ना ऊस गोड लागल म्हणून मुळासकट खात नाही कोणतीही गोष्ट करताना आणि कोणतीही सवय बदलायची असेल तर संयम ठेवला तर नक्कीच आपल्याला अवघड असे काहीच वाटणार नाही.

कितीही शांत राहायचं ठरवलं तरी आतले विचार मात्र गोंधळ करतात आणि वरवर जरी किती शांत दिसत असलो तरी आपण आतून किती शांत आहोत हे आपलं आपल्यालाच माहीत असते.अशावेळी जर आपण आपल्या विचारांवर संयम ठेवला तरी नक्कीच आपल्याला आतून सुद्धा शांत राहता येईल.

कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर त्याला अर्थ असतो. जेवताना जेवणात जर मीठ प्रमाणात नसेल तर नक्कीच जेवण जाणार नाही. सतत एकाच गोष्टीवर बोलत बसलो तर त्या विषयात रस राहणार नाही. कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर संयम असेल तर ते सोप होईल.

संयम असेल तर अवघड असे काहीच नाही. मग तो संयम विचारांवर असो किंवा आपल्या वागण्या – बोलण्यात असो पण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर नक्कीच होत असतो. संयम ठेवला तर सवयी बदलता येतात संयमाने आयुष्य सुद्धा बदलता येते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!