Skip to content

नवरा-बायकोने नात्यांमधील विश्वासार्हता अशी टिकवून ठेवावी.

नातं नवरा-बायकोचं!!


अपर्णा अशोक कुलकर्णी


जगातील सगळ्या नात्यांपैकी खूप नाजूक नात जर कोणतं असेल तर ते नवरा बायको च नात आहे अस मला नेहमी वाटतं.प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वासावर अवलंबून असतो. जितका घट्ट विश्वास तितकंच घट्ट नात.पण हा विश्वास एका दिवसात मिळवता येतो का??

तर तस अजिबात होत नाही.प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ हा द्यावाच लागतो.सगळीच नाती ही विश्वासावर अवलंबून असतात पण नवरा – बायको च नात हे नाजूक अशासाठी कारण या नात्याची बांधिलकी ही आयुष्यभर जपावी लागते.एकमेकांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं असत यासाठी.प्रत्येकाला वाटत असत आपला जोडीदार उत्तम असायला हवा,आपली जोडी आदर्श असायला हवी.पण हे करताना पूर्ण आयुष्य निघून जात कधी कधी.

नात जपताना काही गोष्टी ठरवून लक्षात ठेवून करणं गरजेचं असतं. तरच ते नात फुलत, बहरत जात आणि त्यातील गोडवा टिकून राहतो.

१. एकमेकांचा आदर करा :

नात कोणतही असो आदर ठेवायलाच हवा.आदर करा एकमेकांच्या मतांचा,विचारांचा,व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि मनाचाही.हा आदर फक्त चार चौघात दाखवण्या पुरता मर्यादित नसून तो घरातही मिळायलाच हवा अगदी रोज.

२. नात्याला वेळ द्या :

नात फुलण्यासाठी वेळ देण्याची अतिशय गरज आहे.कितीही धावपळीचा दिवस असला तरी किमान रात्रीचा अर्धा तास हा नवरा – बायको ने एकमेकांसाठी ठेवायलाच हवा.यात दिवसभर घडलेल्या घटना सांगितल्या गेल्या पाहिजेत.

३. एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करा :

थोडे द्यावे थोडे घावे एकमेका प्रेम द्यावे जीवनाला रंग यावे अवघे आनंदाचे गंध उधलावे.अस म्हानलेलाच आहे.पण हे प्रेम अगदी मनापासून असायला हवं बरका.अपेक्षा न ठेवता.मग फक्त एकमेकांकडे बघून मनापासून हसलात तरी खूप आहे.

४. भेटवस्तू द्या :

आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू येईल अशी कोणतीही गोष्ट केलीत की ते कोणत्या भेटवस्तू पेक्षा कमी नसेल.एकमेकांचे वाढदिवस साजरे करा,अचानक बाहेर फिरायला घेऊन जा,तिच्या/त्याच्या जवळच्या लोकांना घरी बोलवा, गाणं म्हण अगदी काहीही ज्याने तुमच्या जोडीदाराला आनंद मिळेल आणि तुमचा जोडीदार खुश बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.

५. चुका माफ करा :

तुमचा जोडीदार चुकला तर त्याची चूक लगेच चिडून बोलून दाखवण्या पेक्षा जरा वेळ जाऊ द्या आणि मग प्रेमाने झालेली चूक लक्षात आणून द्या.अशामुळे रागात वाद होणार नाही आणि गोष्टी सामंजस्याने मिटतील.

६. संयम ठेवा :

आपल्या मनाप्रमाणे जर एखादी व्यक्ती वागत नसेल तर ती आपलं ऐकत नाही अस आपल्याला वाटायला लागते.यात चुकत कोणाचाच नसतं तर आपण आपल्या नात्याला गृहीत धरायला लागतो त्यामुळे अस वाटतं.पण तसं न करता समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.

७. ऐकुन घ्या :

नवरा – बायको म्हणल की भांडणं तर होणारच आणि व्हायलाच पाहिजेत.त्या शिवाय नात्याला मजा नाही.पण भांडण झाले तर दोघांनीही एकमेकांची बाजू शांतपणे ऐकून घ्या आणि इथून पुढे वाद होणार नाहीत यावर उपाय करा.ज्या गोष्टी आपल्या जोडीदाराला आवडत नाहीत त्या टाळायचा प्रयत्न करा.

८. विश्वास ठेवा :

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या माणसांवर,जोडीदारावर विश्वास ठेवा.इतका की कोणाच्याही काहीही बोलण्याने सांगण्याने तो विश्वास डळमळीत होता कामा नये.तुमच्या नात्याला तिसऱ्या व्यक्तीची गरज पडत उपयोगी नाही.

९. मित्र बना :

नवरा – बायको मध्ये खूप घट्ट मैत्री असायला हवी.सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत बोलायला हव्यात. ऑफिस मधल वातावरण,मित्र मैत्रिणी,नातेवाईक, मुलांच्या अडचणी अगदी सगळं सांगितलं गेलं पाहिजे.म्हणजे कोणताच आडपडदा राहणार नाही.

मग बघा नात्याची गोडी कशी वाढत जाते ती.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!