Skip to content

आपलं काम बोललं पाहिजे, तोंड नाही !!

आपलं काम बोललं पाहिजे, तोंड नाही !!


मिनल वरपे


जे आपण बोलतो ते केलं पाहिजे आणि जे आपण करतोय ते शेवटपर्यंत पूर्ण केलं पाहिजे. अनेकांना सवय असते फक्त बोलण्याची आणि ते जे काही बोलतात त्याला पूर्ण करणे तर सोडाच पण त्याची सुरवात सुद्धा करत नाही.

आजूबाजूला असे अनेक माणसं दिसतील किंवा आपण ओळखत असू आणि त्यांच्याबद्दल बोलत सुद्धा असू ही व्यक्ती फक्त बोल बच्चन आहे. त्यांना हसणे सोप्पे वाटते पण कधी स्वतःलाच विचारून बघा असे अनेक उदाहरण भेटतील ज्यामधून आपल्याला कळेल की आपण जे इतरांना आणि स्वतःला जे बोलतोय ते पूर्ण करतो का?? इतरांना हसणे बोलणे सोप्पं असते पण जेव्हा आपल्याला यावरून कोणी हसले तर कसे वाटेल??

जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण प्रयत्न तर केलेच पाहिजेत पण बरेचसे लोक आहेत जे फक्त एखाद काम एखादी गोष्ट करण्याचं नक्कीच बोलतात पण त्याचा विचार करतात, चर्चा करतात, नकोत्या व्यक्तींकडून सल्ला घेऊन नकारार्थी विचारांना थारा देतात आणि शेवटी तो विषय सोडून भलतेच विचार करत बसतात.

मुळात जर आपण आपला एक स्वभाव तयार केला की मी जे बोलतोय ते पूर्ण करणारच तर नक्कीच आपल्याला स्वतःला त्याचा खूप फायदा होईल. मी जे काही बोलतोय ते जर मी पूर्ण केलं नाही तर लोकं काय म्हणतील हा विचार बाजूला सारून मी मला स्वतःला जे सांगेन ते मी पूर्ण केलच पाहिजे असा अट्टाहास आपल्याकडे असायला हवा.

आपण नको तिथे नको त्या ठिकाणी नको ती जिद्द करतो..पण आपला हा हट्टीपणा जर आपण आपल्या कामात वापरला तर आपलं काम सुद्धा पूर्ण होईल आणि आपल्याला स्वतःकडून दिलेला शब्द पूर्ण करण्याची सवय सुद्धा लागेल.

आपल्यासमोर असे व्यक्तिमत्व ठेवावे ज्यांनी कष्ट करून स्वतःच नाव कमावलं आहे आणि त्यांनी केलेली मेहनत ही त्यांच्या यशाचं कारण तर आहेच पण त्यासोबत एक उत्तम नियोजन एक आपल्यातील ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्याचं कार्य करत असते. आणि उत्तम नियोजन तेव्हाच करता येईल जेव्हा आपण जे काही बोलतोय ते वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील असू.

ध्येय ठेवलं तर ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात निर्माण होते. आणि मी स्वतःला जे काही सांगेन बोलेन, मी जे काही ठरवेन ते शक्य तेवढे प्रयत्न करून पूर्ण करेल असे ध्येय ठेवून स्वतःलाच आपण वेगवेगळे आवाहन दिले तर आपलं यश तर आपल्याला सोडून कुठेच जाणार नाहीच पण त्यासोबतच आपल्याला स्वतःशी नम्र राहून एका योग्य मार्गावर वाटचाल करता येईल.

म्हणून कायम लक्षात ठेवावं की आपल काम बोललं पाहुणे फक्त तोंड चालवून आपलीच ऊर्जा वाया जाईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!