शाळा नाही, मुलं घरीच ! त्याच्याशी कसं वागावं हेच कळात नाही.

अपर्णा अशोक कुलकर्णी


पालकत्व ही खूप म्हणजे खूपच महत्वाची जबाबदारी आहे. पालक होताना या गोष्टीच फार दडपण घेतलेलं नसतं पण जेव्हा प्रत्यक्षात जबाबदारी पार पाडावी लागते तेव्हा खूप धांदल उडते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मुळे याचा त्रास होत नसे पण सध्याच्या काळात कुटुंबे वेगळी रहात असल्यामुळे बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवायला लागल्या आहेत.

सध्याच्या मुलांची वागण्याची पद्धत,एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची पद्धत, त्यांच्या सवयी,राहणीमान,धावपळ हे सगळंच खूप मोठ्या प्रमाणात बदललेल आहे.म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हाच आमच वागणं, बोलणं आणि आता आमच्या मुलांचं वागणं, बोलणं यात नाही नाही ठरवल तरी तुलना होतेच.

आमच्या लहानपणी आम्हाला आमच्या आजी आजोबांचं,शेजाऱ्यांच, नातेवाईक या सगळ्यांचं प्रेम तर मिळालाच शिवाय भाऊ बहीण असल्यामुळे त्यांच्या सोबत मिळून मिसळून राहण्याची सवय लागली.आई पेक्षा बाबांचा खूप धाक वाटायचा आणि आज ही वाटतो.आणि हा धाक नजरेचा होता हे महत्त्वाचं.

पण आता जेव्हा आमची मुलं मोठी होतायेत तेव्हा हे सगळं ते त्यांच्या आयुष्यात नाही अस नेहमी जाणवतं.घरात मोजकीच माणसं (मोजकी म्हणण्यापेक्षा फक्त आई,बाबा) त्यात जर दोघंही नोकरी करत असतील त्यांचा सहवास ही मोजकाच. शेजारी नाहीत आणि नातेवाईकांची भेट फक्त समारंभ पुरतीच मर्यादित.त्यामुळे मुले एकलकोंडी राहायला आणि वाढायला लागली आहेत. त्यात अभियांत्रिकी मुळे मोबाईल, इंटरनेट, टेलिव्हिजन या गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे घरातील मोजक्या माणसांशी बोलणं,संवाद सुधा खूप कमी झाला आहे.

घरात भावंड असतील तर ते एकमेकांशी बोलतील, भांडतील तरी पण एकटेच असतील तर ते ही नाही. त्यामुळे मुलांना कसं घडवावं,कसे संस्कार करावेत,आपल्या गोष्टी त्यांनी ऐकाव्यात यासाठी नक्की काय करावं हे असे कित्येक प्रश्न समोर येतात आणि या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. मुलांना मारलं की ते डोक्यात राग घालून घेतात,रगवल तरी नको त्याच गोष्टी मुद्दाम करतात,उलट उत्तरं द्यायला लागतात आणि शेवटी पालक समुपदेशन हा पर्याय निवडतात.

अशा वेळी प्रश्न पडतो की आपल्या पालकांनी असं काय वेगळं केलं होत आपल्याला वाढवताना जे आपण आपल्या मुलांसाठी नाही करू शकलो??नक्की कुठे कमी पडलो?? समुपदेशन म्हणजे तरी काय?? तिथे जाऊन मुलांना समजावून सांगितलं जातं ना?? मग आपल्या समजावण्या चा मुलं का विचार करत नाहीत??

नक्की काय केलं पाहिजे??

१. मुलांशी मैत्री करा :

मी सांगितल्या प्रमाणे मुले एकलकोंडी बनत चालला आहेत कारण संवाद कमी पडत आहे.रोज त्यांच्याशी गप्पा मारा अगदी कोणत्याही विषयावर.पण त्यांच्याशी बोलत रहा आणि त्यांना बोलतं करा.अशाने मुलं सगळं काही तुमच्याशी बोलायला सुरुवात करतील.

२. मुलांना वेळ द्या :

आजकाल सर्वच आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतात.अशाने पाहिजे तितका वेळ मुलांना आणि कुटुंबाला देता येत नाही.मुलांना अस वाटू शकत की आई बाबा च आपल्याकडे लक्ष च नाही.त्यामुळे ऑफिस मधून घरी आल्यावर किमान दोन रात्रीच जेवण सगळे मिळून करत जा,दिवसभर काय काय झालं ते सांगत जा, मुलांच्या अडचणी असतील तर समजून घेण्याचा प्रयत्न करत जा,तुमच्यासाठी मुलं आणि कुटुंब किती महवाचे आहे याची जाणीव करून देत जा. मुलांना घेऊन फिरायला जात जा.अशाने तुम्ही पण ताजेतवाने होऊन जाल आणि मुलांसोबत छान वेळ पण जाईल.

३. कोणाशीही तुलना नको:

प्रत्येक मूल वेगळं असतं,खास असतं. त्यामुळे आपल्या मुलाची इतर कोणत्याही मुलासोबत तुलना करू नका.याची मुलांना प्रचंड चीड असते.तुमचं मूल तुमच्यासाठी कसं खास आहे,इतरांपेक्षा कस वेगळं आहे हे सतत त्याला सांगत रहा.

४. मुलांच्या चुका माफ करा:

मुलं ही मुलं च असतात.मोठ्या माणसांकडून चुका होतात आपणही चुकातोच की.मग मुलांवर रगवण्या ऐवजी तुमची मुलं कुठे आणि कशी चुकली हे प्रेमाने किंवा एखाद्या उदाहरणाने दाखवून द्या.

५. काळानुसार बदल करा:

आज ची पिढी ही खूप प्रगत आहे.जग बदलत चाललंय आपणही बदलायला हवं. आमच्या वेळी अस काही नव्हत हे सांगण्यापेक्षा आताच्या काळात काय आहे ते करण्याची तयारी दाखवा.

६. मुलांसमोर भांडू नका :

बऱ्याच वेळा अस होत की घरातल्या वातावरणाचा परिणाम मुलांवर होतोच. त्यामुळे पालकांमध्ये जर वाद असतील तर ते मुलांसमोर प्रयत्न पूर्वक टाळा.तुमचे वाद मुलांसमोर येऊ देऊ नका आणि मुलांची मने एकमेकांविषयी काही सांगून कलुशित करू नका.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

??

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.