Skip to content

इतरांना आनंदी पाहून तुम्ही आनंदी होत असाल तर तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्व आहात.

इतरांच्या आनंदातही आपला आनंद शोधूया..


मिनल वरपे


इतरांना आनंदी पाहून तुम्ही आनंदी होत असाल तर हमखास तुम्ही एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहात..

सुख समाधान आणि आनंद हे शोधून सापडत नाही तर ते जगण्यात असाव…आपण जे आयुष्य जगतोय त्या आयुष्याला अर्थ असावा फक्त जन्माला आलोत म्हणून बालपण तरुणपण म्हातारपण या तिन्ही अवस्थेतून जात.. खेळ शिक्षण करिअर आणि निवृत्ती या सर्वात ध्येय बाळगून पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. जगण्याला अर्थ तेव्हाच येईल जेव्हा आपल्यामुळे आपण स्वतः आणि आपल्या सोबत असणारे, आपल्याला भेटणारे व्यक्ती आनंदी असतील.

आपण जेव्हा खूप नाराज असतो त्यावेळी एखाद लहान मूल आपल्याजवळ आले आणि काहीतरी खट्याळपणा केला तर आपण क्षणातच हसू लागतो. कारण लहान मुल हे आनंद वाटण्याचं काम नकळत करत असतात आणि त्यामुळेच ते स्वतः खूप दुःखी दिसत नाही. जितके लवकर रडतात तेवढ्याच लवकर ते हसतात सुद्धा.

कोणी जर दुःखी असेल तर त्यावेळी आपण त्या व्यक्तीचा राग करत नाहीत तर त्यावेळी त्यांना धीर देण्याच काम आपण करत असतो आणि ते जर मनापासून असेल तर नक्कीच धीर देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आत्मिक समाधान जाणवेल.

पण जर कोणी खूप आनंदी असेल तर त्याचा आनंद बघून आपल्याला त्रास होत असेल तर नक्कीच आपलं विचार करणं आणि वागणं हे साफ चुकीचं असेल.कारण सुख असो वा दुःख हे ज्याला मिळायच त्याला मिळतेच आणि आपल्या वागण्याबोलण्यामुळे त्यामधे काही बदल होत नाही.

जर कोणी खूप आनंदी असेल तर त्याच्याकडे बघून आपल्याला आनंद मिळत असेल तर नक्कीच आपण योग्य दिशेने जिवन जगत आहोत.म्हणतात ना आपल्यामुळे कोणाला सुख मिळालं नाही तरी चालेल पण कोणाच्या दुःखाचे कारण आपण असू नये. अगदी असेच जर कोणी आनंदी असेल तर आपल्याला सुद्धा खूप आनंद वाटला पाहिजे.

जो तो त्याच्या कर्तृत्वामुळे यश मिळवत असेल, पुढे जात असेल, जे आहे त्यामधे समाधान मानून आनंदी राहत असेल तर या सगळ्यात त्याचे विचार आणि त्याच वागणं त्याच्या आनंदाचं कारण असते.

पण बहुतेक वेळा आपण कोणाचा आनंद बघितल्यावर दुःखी होतो याच कारण म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत ते त्याने केलेल्या असतात, आपण जिथे हार मानतो तिथे त्या व्यक्तीने प्रयत्न करून यश मिळवलेले असते, जे करताना आपण फक्त तुलना करत असतो तेच करताना ती व्यक्ती मात्र स्वतःचे ध्येय गाठण्याकडे लक्ष केंद्रित करते.

म्हणूनच आपण सुद्धा कोणाच्याही आनंदात आनंदी व्हायचं.. जर कोणी आनंदी असेल तर त्याच्या वागण्या बोलण्यातून आपण शिकवण घेत पुढे जायचं.. आणि फक्त ध्येय गाठले, यश मिळवलं म्हणजे आनंद मिळतो असे नाही तर दुसऱ्याच्या यशात,दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानलं तरी आपल्याला आनंद मिळतो..



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!