Skip to content

शारीरिक संबंध ठेवताना एकमेकांचा विचार होतोय का ???

नवरा-बायको, एकमेकांची ओढ आणि शारीरिक संबंध !!


अपर्णा नानाजकर-कुलकर्णी


लग्न जमल्यापासून प्रत्येक मुलीच्या मनात सतावणारा प्रश्न म्हणजे लैंगिक संबंध. या गोष्टीची भीती का वाटते तर आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेल्या स्त्री ला या विषयावर बोलायला वावच मिळत नाही आणि चुकून कोणी बोलल तर त्या स्त्रीच्या संस्करावर बोट ठेवले जाते.

आपण सगळे म्हणायला २१ व्या शतकात आणि स्त्री पुरुष समानता असणाऱ्या जगात जगत आहोत पण वास्तवात आजही स्त्रियांवर तितकेच अत्याचार होतात या बाबतीत ही खूप दुर्दैवाची बाब आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं.

लैंगिक संबंध हा खूप नाजूक पण खूप च महत्वाचा मुद्दा आहे. नवरा बायको ने तसच होणाऱ्या नवरा बायको ने ही यावर विचार करायला हवा, चर्चा करायला हवी, एखाद्या तज्ज्ञ वक्त्यिकडून समजावून घ्यायला हव्या या गोष्टी. लग्नानंतर चे दोघांच्याही आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे.

मुलं सतत मुलींशी प्रेमाच्या गोष्टी बोलत असतात. टीव्ही वर हे सगळं बघतेस का अस विचारतात पण प्रत्यक्षात जेव्हा करायची वेळ येते तेव्हा दोघांची ही धांदल उडते. कधी कधी नवऱ्याला वाटत की आपली बायको काहीच प्रतिसाद देत नाही कीवा काहीच करू देत नाही. मग नवरे शिवीगाळ करत रूम बाहेर निघून जातात. कित्येक जोडप्याचे हे अनुभव मी ऐकलेत आणि वाचलेत सुद्धा. अशा वेळी त्या बिचाऱ्या बायका रडत एकटेपणा घाबरत रात्र घालवतात.

हे सगळं जर टाळायचं असेल तर या गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा व्हायलाच पाहिजे. कारण आपण नेहमी ऐकतो की अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर बोलून उत्तर मिळत नाही आणि उत्तर नाही असा प्रश्न च नाही. लैंगिक संबंध ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जशी याची पुरुषांना गरज असते तशीच ती स्त्रियांनाही असते.

मुळात पुरुषांनी हे समजून घेणे गरजेचे आहे. भावना इच्छा काय फक्त पुरुषांनाच असतात का या बाबतीत स्त्रियांनाही असतातच. पण आपल्याकडे काय होत बायको ही एक हक्काची उपभोगाची वस्तू मानली जाते या बाबतीत. पुरुष(नवरा) वाट्टेल तेव्हा वाट्टेल तसा हक्क गाजवतो बायको वर आणि तिने नाराजी व्यक्त केली तिच्या हालचालीत किंवा नवऱ्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळाला तर त्यांना अस वाटत की आपला पुरुषी अहंकार दुखावला गेला आणि ते जबरदस्तीने हवं ते ओरबाडून घेतात.

मी तर याला सरळ सरळ बलात्कार म्हणेन इथे फरक फक्त इतकाच आहे की तो समाजमान्य असतो ज्याची दखल पोलिस पण घेत नाहीत. ही अत्यंत चुकीची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. स्वतःच्या पुरुषी असण्याचा उपयोग तुम्ही अशा गोष्टीसाठी करत असाल तर त्या स्त्रीच्या मनातून तुम्ही कायमचे उतरुन जाल.

शारीरिक संबंध हे त्या दोन व्यक्तींच्या मनातून निर्माण व्हायला हवेत. दोघांची इच्छा आणि भावना गुंतली पाहिजे अशा वेळी ते संबंध अत्युच्च आनंद देतात दोघांनाही.

शारीरिक संबंध जुळून येण्यासाठी मन जुळन येणे खूप गरजेचं आहे. एकदा का मन जुळली की शरीर जुळायला वेळ लागत नाही.लैंगिक संबंध प्रस्थपित करताना बायको च मूड नीट हवा. संबंध चे वेळी काय होत की पुरुषांना पटकन इच्छा निर्माण होते आणि लवकर शांत पण होते पण बायकांचं नेमक या उलट होत. त्यांना इच्छा निर्माण होण्याचा वेळ लागतो आणि शांत होण्यासाठी पण वेळ लागतो.

म्हणून नवऱ्याने संबंध ठेवताना बायकोच्या मनाचा कल विचारात घ्यायला हवा. दोघांमधील संबंध ही सुंदर आणि नाजूक विषय आहे.तो हाताळताना खोलीतील वातावरण शांत हवं,एकमेकांची एकमेकांना सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हवी आणि योग्य तो संयम हवा.तेव्हाच हे नातं पूर्णपणे फुलून येतं आणि याची गोडी वाढत जाते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “शारीरिक संबंध ठेवताना एकमेकांचा विचार होतोय का ???”

  1. Mazy baykochi sex ichha Ch khtm zali sex Ch nav ghetach.tila child nirman hote , child child krte..hat lavla tri Tila rag yete aata tya goshticha..
    Kay karn asel

  2. छान आणि १००% बरोबर माहिती दिली. 9881376151

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!