Skip to content

हा क्षण सुद्धा जुना होईल, आपण नव्यासाठी नवं असायला हवं !!

हा क्षण सुद्धा जुना होईल, आपण नव्यासाठी नवं असायला हवं !!


मिनल वरपे


आत्ताचा क्षण हा काही क्षणातच जुना होईल आपण नविन क्षणासाठी कायम नवं असायला हवं…

विचार केला तर कोणतीच वेळ आपली नसते आज आत्ता जे घडतेय ते उद्या पुन्हा घडेल याची शाश्वती कोणालाच नाही.. आपण एक वाक्य कायम ऐकून आहोत ते म्हणजे वेळ ही कधीच कुणाची वाट पाहत नाही आणि थांबत सुद्धा नाही. आणि खरच गेलेली वेळ हातात पुन्हा येत नाही.

आणि हे सगळं माहीत असताना, अनुभवत असताना सुद्धा आपण नेहमी त्याच त्या गोष्टींमध्ये इतके अडकतो की हातातून आलेले क्षण, समोर असलेली वेळ सहज गमावतो. कारण आपण जुन्या क्षणात रमत असतो.

आयुष्यात प्रत्येक क्षण जपायचा असेल तर त्या क्षणाला योग्य तो न्याय देणे गरजेचे आहे. आता कोणालाही असे वाटेल की न्याय देणे म्हणजे नक्की काय… तर बघाना कोणी जर चूक केली तर त्याला शिक्षा देण्या आधी नक्कीच एक संधी दिली जाते. कारण त्याने ती चूक पुन्हा करू नये म्हणून.

अगदी तसेच समोर असलेल्या क्षणात जर दुःख मिळालं तर येणाऱ्या क्षणाला एक संधी तर आपण नक्कीच द्यावी. पण आपण मात्र दुःख दिलेल्या क्षणाची आठवण काढत त्याचा विचार करत स्वतः दुःखी होतो आणि इतरांना सुद्धा दुःखी करतो.

खर तर येणारा प्रत्येक क्षण हा क्षणातच जुना होत असतो पण त्या क्षणाचा आनंद न घेता आपण त्याला असच सोडून देतो. जरी गेलेला क्षण आपल्याला दुःख देऊन गेला असेल म्हणून येणारा प्रत्येक क्षण दुःखच देईल असे नसतेना.

येणारा क्षण येताना आपल्यासाठी नवी संधी घेऊन येत असेल तर कधी प्रेरणा देणारा असेल. कस जगायचं आणि कस वागायचं हे येणारा क्षण आपल्याला शिकवून जाईल.दुःखाचा सामना करताना कस भक्कम राहायची ताकद आणि कोणत्याही क्षणी न घाबरता पुढे कस जायचं याची ओळख हे येणारा नविन क्षण आपल्याला देऊन जाईल.

येणारा क्षण सुख देऊन जाईल..आपल्याला आणि आपल्यामुळे इतरांना आनंद देत येणारा क्षण निघून जाईल पण हे तेव्हाच घडेल जेव्हा येणाऱ्या क्षणात आपण स्वतः नविन असू.. जेव्हा आपल्या मनात विचारांमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाची जाणीव असेल आणि येणाऱ्या क्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असेल…

चला तर मग जुन्या कटू आठवणींना सोडून देत, मिळालेल्या अनुभवांतून शिकवण घेऊन, चुकीच्या विचारांना, गेलेल्या जुन्या क्षणांना मागे सोडून येणाऱ्या प्रत्येक नविन क्षणांच स्वागत करत मिळालेला प्रत्येक नवीन क्षण नव्याने जगुयात…



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!