Skip to content

आपले विचारच आपल्याला नव्या असंख्य संधी देऊ शकतात.

आपले विचारच आपल्याला नव्या असंख्य संधी देऊ शकतात.


हेमलता यादव-कदम I ७८७५५५०७८९


नवा दिवस येताना
तो नव्या संधी घेऊन येतो
आपण उगाचच कालच्या
आठवणीत झुरत राहतो .

रोज येणारा नवीन दिवस रोज नवीन संधी घेऊन येत असतो आपल्याला फक्त त्या संधींना ओळखता यायला पाहिजे. बऱ्याचदा आपण एखादे काम करण्यासाठी संधी ची वाट पाहत बसतो. याचे कारण म्हणजे आपल्या समोर क्षणाला क्षणाला येणाऱ्या संधी आपल्याला ओळखता येत नाहीत.

संधी चालून येते हे जितके खरे आहे ना तितकेच हे देखील खरे आहे कि आपल्याला ला हि संधी च्या दिशेने पाऊले उचलावी लागतात. संधीचा शोध घ्यावा लागतो. संधी शोधणाऱ्यालाच संधी मिळते . संधी आपल्या आजूबाजूलाच असतात. संधीची कधी वाट पहात बसू नका .. कायम संधीच्या शोधात राहा आणि जर संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करण्याची ताकत ठेवा .

कारण सर्व गोष्टी या तुमच्या विचारांवर अवलंबून असतात . तुमचे विचारच तुम्हाला असंख्य संधी उपलब्ध करून देऊ शकतात पण फक्त तुमची विचार करण्याची क्षमता तुम्ही वाढवायला पाहिजे तसेच केलेले विचार अमलात आणण्याची जिद्द तुमच्यात असणे आवश्यक आहे.

सर्व काही तुमच्या आजूबाजूला च आहे अगदी तुमच्या जवळ … पण आपल्या समोर जेव्हा एखादी संधी येते ना तेव्हा आपण ती संधी आजमावून पाहण्या आधीच आपल्याला हवे तसे सर्व हि संधी घेतल्याने होईल का ? असे विचार करायला लागतो.

आपल्याकडे एक जुनी म्हण आहे कि ” चांगली संधी फक्त एकदाच दार ठोठावते पण वाईट संधी वारंवार आपल्यासमोर येत राहते.” त्यामुळे आपल्याला संधी ओळखता येणे गरजेचे आहे आणि जर संधी ओळखता येत नसेल म्हणजे तुमचे वय आणि अनुभव कमी पडत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कृपया यात कोणताही कमीपणा समजू नका.

“या जगात असे कोणीच नाही ज्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची कधी गरजच पडत नाही” लक्षात ठेवा कि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या संधीबद्दल गोंधळात असाल निर्णय घेणे कठीण वाटत असेल तेव्हा चुकीचा निर्णय घेऊन कुठेतरी फसण्यापेक्षा घरातील किंवा ओळखीतील एखाद्या अशा व्यक्तीचा सल्ला घ्या.

ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे. कि , समोरील व्यक्ती कधीही तुमचे नुकसान होऊ देणार नाही. यात तर पहिला प्रेफरन्स तुम्ही तुमच्या आई – वडिलांना द्या. कारण आपल्या आयुष्यात हेच २ व्यक्ती असे असतात जे निस्वार्थी पणे आपल्या यशाकडे डोळे लावून बसलेले असतात त्यांना आपल्याकडून फक्त आपले आयुष्य आपण चांगले घडवावे इतकेच अपेक्षित त्यामुळे हे लोक कधीही तुमचं नुकसान होईल असा सल्ला देणार नाहीत .

त्यातून पण जर तुम्हाला असे वाटले कि , घरात माझ्या संकल्पनाना कोणी समजू शकणार नाही तर ज्या क्षेत्रातली संधी तुमच्यासमोर आहे त्या क्षेत्रातील तज्ञ् लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी सल्ला मसलत करा. तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे समोर असणाऱ्या संधीचा नीट अभ्यास करा. फायदा आणि नुकसान दोन्ही चा अंदाज घ्या. रिस्क घेतल्यानंतर किती नुकसान तुम्ही पेलू शकता ते पहा. आणि मग अगदी छोट्या छोट्या गुंतवणुकीपासून संधी आजमवायला सुरु करा.

झुकरबर्ग , स्टीव्ह जॉब्स , आपल्याकडचे राधाकृष्ण दमाणी (डी मार्ट), रतन टाटा, या आणि अशा अनेक यशस्वी उद्योजकांनी संधी निर्माण केल्या. यांच्या संघर्षावर /व्यवसायावर आधारित बाजारात खूप उत्कृष्ट दर्जाची पुस्तके आहेत पण ते वाचायला वेळ कोणाकडे आहे.

आपल्याकडील आताच्या तरुण पिढीला बऱ्याच गोष्टी कुटुंबाकडून सहज मिळाल्याने त्यांना संघर्ष नावाचा प्रकारच माहित नाही आहे. त्यामुळे करिअर मधील थोडेसे अपयश देखील या पिढीला अगदी नैराश्यात घेऊन जाते. lockdown मध्ये कितीतरी तरुणांनी आपले आयुष्य या नैराश्यातून संपवले आहे.

बाजारात असंख्य संधी उपलब्ध आहेत. जरा डोळसपणे पाहायला शिका. फक्त नोकरी वर अवलंबून राहू नका.
आणि मार्गदर्शन घेत राहा .. शिकण्याची वृत्ती ठेवा .. यात कोणताही कमीपणा समजू नका .. फक्त मनात विचार करा कि , जर खरचं तुम्हाला “सगळ्यातलं सगळं कळत असत” तर आता तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यापेक्षा कितीतरी छान तुमचे आयुष्य असते.

नेहमी तुम्ही शिकण्याच्या तयारीत असणे आवश्यक आहे. तर आणि तरच संधी तुम्हाला दिसायला लागतील आणि तुम्ही देखील योग्य वेळी संधी ला ओळखून त्या संधीचा फायदा करून घेऊ शकाल.

धन्यवाद.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!