Skip to content

रागात इतरांचं सोडा आपलंच किती नुकसान होतंय बघा…

रागात इतरांचं सोडा आपलंच किती नुकसान होतंय बघा…


मिनल वरपे


राग का आणि कशामुळे येतो याची कारण सांगायलाच नको. कारण त्याच एकच कारण नसते म्हणजेच रागाला लहानस कारण सुध्दा पुरेस ठरते. पण हा राग जर आपल्याला नेहमी येत असेल आणि तेही अगदी क्षुल्लक कारणावरून सुध्दा तर त्या रागाचा त्रास इतरांना तर होणारच पण त्याचे परिणाम आपल्या स्वतःवर सुद्धा होतील.

आपण स्वतः स्वतःसाठी कायम महत्त्वाचे असतो आणि असायलाच हवे कारण आधी आपण स्वतःवर प्रेम करू तरच आपल्यावर दुसर कोणी प्रेम करेल आणि आपण इतरांवर प्रेम करू.

पण हा राग असा असतो ज्यामुळे इतरांना तर त्याचा त्रास नक्कीच होतो पण त्याची सुरवात आपल्यापासून असते.
तर रागाने काय होते :

१) माणसं दुरावतात

आपण जर क्षुल्लक कारणावरून सुद्धा राग व्यक्त करत राहिलो तर आपण एकटे पडतो. कोणाला आपल्याशी बोलताना विचार करावा लागत असेल तर तिथेच आपला स्वभाव कसा आहे हे आपण ओळखावं. आणि मग अशाच स्वभावामुळे जवळची माणसं कधी दुरावतात हे खूप उशिरा आपल्या लक्षात येते.म्हणून आपल्या रागापेक्षा आपल्या जवळच्या माणसांना जास्त महत्त्व दिले तर नक्कीच आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण मिळवता येईल.

२) शारीरिक त्रास

जेव्हा आपला राग वाढत असतो..त्यामुळे आपल्या शरीरावर त्या रागाचा परिणाम होत असतो. डोकेदुखी, उच्च रक्तदाब (high BP) या सारखे आजार तसेच काहीवेळेस अटॅक सारखी भयंकर शारीरिक समस्या सुद्धा होऊ शकते.म्हणून आपल्या रागामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून आपण स्वतःसाठी तरी स्वतःचा राग शांत करणे गरजेचे असते.

३) मानसिक त्रास

ज्यावेळी आपल्याला राग येतो त्यावेळी आपला आपल्या मनावर अजिबात ताबा राहत नाही. त्यावेळी आपण जे जे वागतो , बोलतो ते सर्व आपला राग आपल्याकडून करून घेत असतो आणि त्यामुळे आपली मनस्थिती सुद्धा बिघडते. एकटेपणा, अस्वस्थता, दडपण, निराशा यासारख्या मानसिक समस्यांची सुरवात ही आपल्या रागामुळे होत असते.

म्हणून आपल्याला मानसिक आजार होऊ द्यायचे नसतील तर आपण ज्यावेळी राग येतो त्यावेळी काही न बोलता शांत राहून रागाचा प्रतिकार केला पाहिजे.कारण एखाद्या वेळी शारीरिक आजार तरी सहज दिसून येतात आणि बरे होतात पण मानसिक आजार ओळखणे आणि बरे होणे यासाठी जास्त लक्ष देण्याची गरज पडते.

४) महत्त्वाचे क्षण मुकतात

एखादा कार्यक्रम असेल, समारंभ असेल किंवा एखादी छोटीशी मित्र मैत्रिणींची भेट असेल तर अशावेळी आपल्याला कोणावर राग आला असेल किंवा एखाद्या परिस्थितीत आपण खूप रागात असू तर त्या क्षणाला आपण त्या रागाला इतके महत्त्व देतो ज्यामुळे त्या क्षणाचा आनंद आपल्याला अनुभवता येत नाही.

५) ध्येय साध्य करणे कठीण जाते

आपण जेव्हा सामान्य आयुष्य जगत असतो त्यावेळी आपण बरेचसे नियोजन करून ठेवतो. काही ध्येय ठरवतो. पण जर आपल्याला राग आला तर आपण ठरवलेली ध्येय विसरून ती सोडून भलतंच वागतो.आणि त्यामुळे आपण नंतर पश्चाताप करतो. म्हणून नंतर निराश होण्यापेक्षा आधीच स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं तर उत्तम.

राग आल्यावर आपण जास्तीत जास्त शांत राहावं ज्यामुळे आपल्यावर त्याचे परिणाम कमी होतील.

राग शांत करण्याचा संवाद हा एक उत्तम मार्ग आहे.कारण जर संवाद असेल तर गैरसमज कमी होतील, स्वभाव माहीत असतील तर राग निर्माण होण्याची वेळ येत नाही.

काही वेळेस राग गरजेचा असतो पण राग कुठे कधी आणि कसा व्यक्त करावा याची आपल्याला ओळख असावी.म्हणजे त्याचे परिणाम चुकीचे होणार नाही.

आपली माणसं तर महत्वाची असतातच पण सर्वात आधी मी महत्वाचा की माझा राग महत्वाचा हे आपल्याला लक्षात आले तर नक्कीच रागाची तीव्रता आणि कारण कमी होतील….



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!