लग्न होऊन ती जेव्हा सासरी गेली, तिची भिती गेली.
टीम आपलं मानसशास्त्र
नविनच लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला सासरी थोड अवघडल्यासारखे वाटते मग ते अरेंज मॅरेज असो नाहीतर लव मॅरेज.. कारण घर बदलते.. आजूबाजूची माणसं नविन असतात.. कोणाचा स्वभाव कसा आहे याबद्दल जास्त कल्पना नसते.. घरातील माणसांना काय आवडते काय आवडत नाही हेसुद्धा माहीत नसते…
मुली माहेरी परिस्थिती कशीही असली तरी मोकळेपणाने वागातात. आई वडील भाऊ बहिण यांची सवय झालेली असते. जबाबदाऱ्या सांभाळायची जास्त गरज पडत नाही आणि जरी जबाबदाऱ्या असल्या तरी आई वडील आहेत म्हणून बिनधास्त जगण्याची सवय असते.
पण तेच सासरी मोकळेपणाने वागणं आणि बिनधास्त राहायला नाही जमणार. थोड उशिरा उठलं तरी सासरचे काय म्हणतील.. स्वयंपाक नीट जमला पाहिजे. माहेरी जस मनमोकळ बोलता यायचं तस सासरी नाही जमणार यासारख्या असंख्य विचारांनी मुली खूप घाबरतात.
स्मिता च सुद्धा तसेच झाले. लग्न झालं ..पाहुणे घरी होते त्यामुळे काही दिवस गडबडीत गेले पण आता मला सर्व जमेल का.. मी माझ्या जबाबदाऱ्या नीट सांभाळू शकेल का असे अनेक प्रश्न तिच्यासमोर होते.
पण तिच्या मनातील भिती आणि विचार अगदी सहज थांबले कारण तिला वातावरण तेवढं उत्तम मिळालं.
सकाळी उठल्यावर आई( सासूबाई ) म्हंटल्या अग झोपायच होतास थोड इतक्या दिवसांची दगदग तुझी…
नंतर त्यांनी स्वतःच चहा केला आणि सर्वांसोबत चहा प्यायला बसल्यावर आई बोलल्या बघ तू या घरात नविन आहेस त्यामुळे तुला थोड दडपण वाटेल पण जास्त विचार करू नकोस मला तुझी आई समज आणि बिनधास्त रहा.
सुरवातीचे जे दिवस खूप चिंतेचे असतात अगदी त्याचवेळी तिला तिच्या सासरच्या सर्व सदस्यांनी खूप दिलासा दिला धीर दिला..त्यांची सर्वांची काळजी त्यांचं प्रेम यामुळे स्मिताच्या मनातील सर्व विचार आणि काळजी अगदी सहज निघून गेली.
नंतर तीने तिच्या सर्व जबाबदाऱ्या ओळखून त्या व्यवस्थित सांभाळायची सुरवात केली. जी माया आणि जे प्रेम तिला मिळालं त्यामुळे तिच्याही मनात सर्वांविषयी आदर आणि आपुलकी निर्माण झाली. आणि त्यामुळेच ती सुद्धा कायम एक उत्तम सुनेची सर्व कर्तव्ये पार पाडतेय.
जस स्मिताच्या सासरी सुरवातीच्या दिवसात प्रेम आणि काळजी मिळाली ज्याची तिला गरज होती आणि त्यामुळेच ती आज तिचे सर्व कर्तव्य आवडीने पार पाडत आहे तशीच माया आणि प्रेम जर प्रत्येक मुलीला मिळालं तर नक्कीच सासर बद्दल वाटणारी भिती आणि माहेरी तक्रार करण्याचं प्रमाण कमी होईल.
नात कोणतंही असो सासू सुनेचे किंवा मैत्रीचं जेव्हा त्या नात्याची सुरुवात असते त्यावेळी जर त्या नात्यात आपण एकमेकांना प्रेमाने जिंकल तर पुढे नात्यात कटुता निर्माण होण्याची तसेच ते नात तुटण्याची वेळ येणार नाही. एकमेकांवर जबाबदाऱ्या लादून, सतत एकमेकांना नकोते बोलून किंवा दुसऱ्याचं उदाहरण देऊन नाती चांगली होत नसतात तर नात हे प्रेमाने मायेने घट्ट बनवायचं असते.


