Skip to content

रागाने त्रासलेला चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाची वाट लावतो.

राग आणि नियोजन


श्रीकांत कुलांगे

(मानसोपचार तज्ज्ञ)


करणला प्रचंड राग येतो आणि जातो व याबाबत त्याला या येणाऱ्या रागाचा राग येतोय म्हणून त्याने वैतागून समुपदेशन घेण्यासाठी संपर्क केला. रागावर नियंत्रण कसे ठेवले पाहिजे याबाबत कालानुरूप काही बदल होत गेले.

परंतु नियंत्रण ही नंतरची स्टेज असते व त्या अगोदर राग का येतो आणि त्यांचे मूळ कुठे हे ध्यानात घेणे जरुरी आहे. कारण राग ही एक समस्या आणि मानसिक डिसऑर्डर आहे.

आपण सर्वजण अप्रिय परिस्थितीशी, त्रासदायक किंवा कठीण लोकांचा सामना करतो. जर परिस्थिती आणि लोकांबद्दल आपली रागावण्याची प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची झाली तर आपण एक व्याधीला आमंत्रित करत असतो. रागाचे काही तथ्ये इथे समजून घेणे जरुरी आहे.

१. सहज रागावलेली व्यक्ती सामान्यत: लक्षणीय त्रास अनुभवतात किंवा त्यांच्या सामाजिक संबंधांमध्ये, कामाच्या ठिकाणी, गृहिणी किंवा विद्यार्थी म्हणून लक्षणीय कमजोरी येते.
२. रागाच्या भावना सहसा चिंता किंवा नैराश्यापेक्षा जास्त वैयक्तिक त्रास देतात.

३. उच्च पातळीवरील क्रोधामुळे सामान्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता (प्रॉब्लेम सोल्विंग) कमी होणं, आवेगपूर्ण निर्णय आणि मूर्ख कृती होऊ शकतात.
४. यामुळे इतरांच्या भावना आणि विचारांबद्दल काही वाटेनासे होते.

५. क्रोधाची समस्या किंवा डिसऑर्डर असलेले लोक, सहसा मदत घेण्यास किंवा त्यांना समस्या असल्याचे कबूल करण्यास नाखूष असतात.
६. सहज रागावलेला माणूस स्वत:मध्ये रागाचे कारण पाहत नाही; तो आपल्या रागाचे श्रेय इतरांच्या वागण्याला देतो.

७. सतत, तीव्र रागाने ग्रस्त लोक क्वचितच कबूल करतात की त्यांना भावनिक समस्या आहे. त्यांना वाटते की ही समस्या केवळ बाह्य घटना, परिस्थिती किंवा एखाद्या व्यक्तीची आहे ज्याने त्यांचा राग निर्माण केला.
८. या लोकांचा असा विश्वास असतो की त्यांच्या क्रोधावर त्यांचे नियंत्रण नाही.

९. सभोवतालची परिस्थिती अनुकूल नसेल तर वारंवार राग निर्माण करते. अर्थात प्रत्येकाच्या नियंत्रण शक्तीवर हे अवलंबून आहे.
१०. स्वतः किंवा प्रिय व्यक्तींबरोबर काही अप्रिय घटना घडल्यास मनावर परिणाम करतात व राग उत्पन्न होतो.

११. काही घटना आपण स्वीकारत नाहीत व त्याचा परिणाम रागात होतो.
१२. रागामुळे तुमचे काम होते हा अनेकांचा (गैर) समज असतो.
१३. अपेक्षाभंग कित्येकदा रागाला आमंत्रित करतो.

खूप तथ्ये आपल्याला पाहायला मिळतील किंवा अनुभवले असतील. व्यक्ती प्रती असणाऱ्या रोषामुळे कित्येकजण आपल्या कुटुंबाचा, देशाचा घात करतात. परिस्थितीजन्य राग हानिकारक आहेच. Covid मुळे झालेली परिस्थिती आपण निर्माण केलेली असून सुद्धा दुसऱ्याकडे दाखवले जाणारे बोट ही पद्धत सुद्धा मानसिक अस्वास्थ्य दर्शवते. आपणच आपल्या रागाला जबाबदार असतो. कारण आपण रागाचे नियंत्रण करत नाहीत. मग राग आपल्याला नियंत्रित करतो. या रागाचे नियंत्रण कसे करायचे?

१. राग येणं ही व्याधी आहे हे मान्य करावं.
२. आपल्याला शारीरिक आजार आहेत का त्याचे चेक अप केले पाहिजे. उच्च रक्तदाब, मानसिक अस्वास्थ्य, पोटाचे विकार इत्यादि गोष्टींना आळा घालावा लागेल.

३. काही व्यक्ती तुम्हाला काहीं कारणास्तव टोचत असतात. त्याचे कारण शोधा. उगीच इगोचा प्रश्न उभा करु नये.
४. बोलण्याची पद्धत सौम्य हवी. इतरांच्या चुका दाखवताना सावधगिरी बाळगावी. आपणही त्याच चुका करतोय का ते पाहिले तपासा.

५. आपला राग व्यक्त करण्याऐवजी किंवा धरून ठेवण्याऐवजी त्याला कमी करा. आपला विश्वास आणि स्वत: शी बोलण्यानं (self talk) आपला राग कमी करण्याचा सराव करा.
६. राग व्यक्त करणं म्हणजे आपण रागाची practice करत असतो. तो कंट्रोल मध्येच व्यक्त व्हायला पाहिजे. विस्फोटक नको. तुमच्या रागवण्याची समोरच्याने स्तुती केली पाहिजे.

७. जेंव्हा राग व्यक्त करतो तेंव्हा आपण आपला मूर्खपणा दर्शवत असतो. म्हणुन एकदा राग आल्यास आरशात पहा.
८. मुलांवर संस्कार आरडाओरडा करून होत नसतात तर तुमच्या कृतीतून दाखवून द्या. योग्य पद्धत आपली असायला हवी.

९. निराशा आणि रागाच्या तीव्र भावनांनी आपला संयम कमकुवत होतो. म्हणून संयम वाढवणे गरजेचे.
१०. समुपदेशन घेण्यासाठी प्रयत्न करणं. ध्यान धारणा, योग्य संगत, योगा, व्यायाम नक्कीच मदत करतात.

११. राग आणणाऱ्या गोष्टींना ओळखून त्यावर उपाय करणे.
१२. आपल्या भावना समजून घेण्यासाठी दररोज मूड रेकॉर्ड ठेवा.
१३. राग आणणाऱ्या गोष्टी टाळणे, सोशल मीडिया आजकाल जास्त कारणीभूत ठरते.

घडणाऱ्या घटना या घडणारच परंतु त्यांना सद्सद्विवेक बुध्दी वापरून परिस्थितीला सामोरे जाणे चांगले. रागामुळे होणारे मानसिक त्रास सर्वांनाच होतात. शांत स्वभावाची माणसे कुणाला नाही आवडत?

रागाने त्रासलेला चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाची वाट लावतो. सभोवतालच्या वातावरणाला ढवळून काढतो. आनंदी राहण्यासाठी रागाला सोडा व त्याचे मॅनेजमेंट करा. त्यातच तुमचे व समाजाचे हित आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!