Skip to content

“तू अशी वागणार असशील तर मी सुद्धा असाच वागेन !!”

मिनल वरपे


अरे ती अस वागते म्हणून मीपण तिच्याशी तसच वागतो… अरे काही नाही तेच तेच रोजच ऐकून बोलून कंटाळा आलाय…अरे हे नेहमीच झालंय काही बोलायला गेलं की वाद कधी होईल काहीच सांगता येत नाही…

अरे मोकळं जगायची संधीच मिळत नाहीये. काही कोणाशी दोन शब्द बोललं तरी संशय येतो आणि रुसवे फुगवे सुरू झालेचं समजा…अरे मलातर आता आयुष्याचा खूप कंटाळा आला आहे असं झालंय उगाच या नात्याच्या बंधनात अडकलो…

आधीच जग मस्त होत ना कोणती बंधन नाही आणि नाही कसलं टेन्शन..आता म्हणजे काही बोलताना आणि वागताना विचार करावा लागतो…
अशा एक ना अनेक तक्रारी हल्ली खूप ऐकायला मिळत आहेत. आणि त्यात अजून भर म्हणजे बहुतेक लोक lockdown मुळे घरातून काम करतात त्यामूळे अजूनच एकमेकांना दोष देण्याची संधी मिळतेय.

खरं सांगायचं झालं तर सतत तोचतोपणा असेल तर आयुष्यात सुद्धा वेगवेगळ्या तक्रारी निर्माण होतात मग तर हे नात आहे.

नात हे कायम जपावं लागते, एकमेकांची मन सांभाळावी लागतात, एकमेकांना समजून उमजून एकमेकांची काळजी घेत, दोघांनी एकमेकांना साथ देत..नात्याचा आणि जोडीदाराचा आदर करत त्या नात्याला टीकवाव लागते.मुळात आपलं आपल्या जोडीदारासोबत अस नात असावं जे टिकवायची गरज पडू नये, ते नात आपण जगल पाहिजे.

पण तोचतोपणा, संशयी वृत्ती, स्वभाव, अविश्वास ,नात्याचा अनादर, अपेक्षांचं ओझं या आपल्या नेहमी सुरू राहणाऱ्या तक्रारींमुळे नात हे बेरंगी होत जाते.

म्हणून नात्याला कायम ताजेपणा ठेवायचा असेल तर आपले विचार आपल वागणं यामधे आपण बदल करायला हवा. सतत तक्रारी करत तसेच एकमेकांना दोष देत जगण्यापेक्षा एकमेकांना आवडेल असे वागल तर नात्यात प्रेम वाढेल.

आपण जितकं ताणू तेवढं तुटते हे आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण एका शब्दाचा वेगळा अर्थ काढून वाद निर्माण करतो त्यापेक्षा समजून घेऊन किंवा एकमेकांच्या चुका जरी होत असल्या तरी त्या समजून घेऊन आणि समजावून नात्यात असलेला आदर वाढवायचा.

जस एखाद्या विनोदावर आपल्याला सतत हसायला कंटाळा येतो अगदी तसाच जोडीदाराकडून एखादी चूक झाली तर तीच सारखी रेटत राहायचा सुद्धा आपल्याला कंटाळा आला तर खूपच छान कारण त्यामुळे एकमेकांबद्दल मनात चुकीच्या भावना निर्माण होणार नाहीत.

एखादी भाजी आपल्याला रोज खायला सांगितली तर नक्कीच आपल्याला त्या भाजी बद्दल गोडी राहणार नाही अगदी हेच आपल्या आयुष्यात आपण लक्षात घ्यावं कारण रोज तेच तेच वागून बोलून , सतत वाद करून नात्यातील गोडवा कमी करतो.

आपल्याला आपल्या मित्रांचा कधीच कंटाळा येत नाही. त्यांना भेटायला त्यांच्याशी बोलायला कायम आवडते कारण मित्र भेटतील तेव्हा किंवा जेव्हापण आपलं बोलणं होते तेव्हा नवनविन विषय असतात सतत एकच विषय घेऊन आपलं बोलणं नसते, वेगवेगळे विषय, उत्तम संवाद असतो.

प्रेम, आदर , काळजी, संवाद या रंगांनी नात फुलवाव. जर नात्यात हे रंग असतील तर तक्रारी कमी होतील. नात्याच बंधन वाटणार नाही आणि नात जगण्याचा त्यासोबतच आयुष्य जगण्याचा आनंद घेता येईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!