Skip to content

ओझं नाही तर आनंद शोधायला हवा !!

ओझं नाही तर आनंद शोधायला हवा !!


सौ. वंदना मिलिंद प्रचल

(समुपदेशक)


माझ्या नात्यांच्या पोस्टवर बरेचदा मला विचारलं जात की “इतक सोप आहे का? एखाद्या नात्यातून वजा होणं किंवा एखाद्याला वजा करणं. अगदी जवळच नातं असल तर काय करायच ? अस जवळच नात, इतक्या वर्षांचं नात कोणी कस काय विसरू शकत? आणि हे चुकीचं आहे, समोरच्याने तोडलं तरीहि आपण नातं टिकवायचं.” अश्या पद्धतीची बरीचशी मतं मला पाहायला मिळाली.

आता एक लक्षात घ्यायला हव, की नातंं संपण्याची पण एक प्रोसेस असते. अचानक नातं कधीच संपत किंवा तुटत नाहि. त्याचा प्रवास हा टप्प्या टप्प्यांनी सुरूच असतो पण आपण तो लक्षात घेत नाहि आणि एक छोटासा प्रसंग घडतो आणि चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं.

ही नात तुटण्याची जी प्रोसेस असते ना, ती संवाद हरवण्यातून सुरवात झालेलीच असते. संवाद ठेवायचा म्हणजे सतत बोलत राहायच अस नाहि पण कायमच एक कनेक्टीव्हीटी असायला हवी,आपल्या जवळच्या माणसाच्या आयुष्यात काय चाललय, तो दुःखी आहे, आनंदी आहे हे आपल्याला जाणवण्याइतपत संवाद हवाच. आणि तो जर नसेल, जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्याला बाहेरून समजत असेल तर ही पहिली पायरी आहे नात संपायला लागण्याची, कारण नात्यातला विश्वास हा संपण्याच्या मार्गावर आहे.

मुळात आपण सगळेचजण कधीच थोड्या थोडक्या कारणांनी नातं तोडतच नाही,प्रयत्न असतो आपला नात जोडून ठेवायचा. पण वर म्हटल्याप्रमाणे हि एक प्रोसेस आहे.

आपण एखाद्याला त्याच्या आयुष्यात नकोच आहोत हे जाणवायला लागल्यानंतरच आपण नात्याला निरोप द्यायचा विचार करतो.

आणि आपण एखाद्याला का नको आहोत ह्याची कारणं त्याच्याजवळ असतीलच की आणि ती त्याच्यापरीने बरोबरही असतील. पण आपण नको आहोत हे सत्य असतं.

आता लोक अस कस काय विसरतात ? ह्या प्रश्नाला खरच काही अर्थ नसतो. कारण आपण, कोणी काय आणि कसा विचार करावा हे ठरवूच शकत नाही. पण आपण स्वतःला सावरू शकतो,सांभाळू शकतो.

एक सत्य आहे, की एखाद्याला जर तुम्हि त्याच्या आयुष्यात नकोच असाल तर तुम्हि कितीहि चांगले वागलात, नात टिकवायचा प्रयत्न केलात तरीहि ते नातं सांधलं जाणारच नाही. मुळातच नात्याकडे बघायचा असलेल्या दोन व्यक्तींचा दृष्टीकोनच अगदी विरूद्ध आहे. एका साठी एखादं नात आयुष्य असतं आणि एखाद्यासाठी आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग असतं. असे अगदी भिन्न दृष्टिकोन नात बांधून ठेवूच शकत नाहीत.

एकवेळ जबरदस्तीने नात बांधूनही ठेवता येईल पण त्याचे बंध कधीच निर्माण होत नाहीत.

आपण का निरोप घ्यायचा, तर स्वतःसाठी घ्यायचा. एखाद्यावर ओझं बनुन राहीलं, की आपल्याच मनाची मोडतोड कालांतराने सुरू होते आणि आपण स्वतःला सांभाळू शकत नाही.स्वाभिमान मोडुन पडतो आपला.

शेवटी माणूस नातं कश्यासाठी जोडत असतो, तर आनंदासाठी,प्रोत्साहनासाठी, काळजीसाठी, संवादासाठी. मग हे सगळच जर त्यातून मिळत नसेल तर नात हवच आहे कशाला? हा विचार करावा.

ओझं बाळगून स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा एकदा ते ओझं रिकामं करून दुसर काही चांगल मिळवता येतय का ह्याचा विचार करायला हवा.

आनंदी समाधानी असण ही माणसाची बेसिक गरज आहे, त्यासाठी तरी अस ओझं आपणच ठरवून रिकामं करायला हव. मान्य आहे एका क्षणात हे शक्य नसतं,पण प्रयत्नांची साथ घट्ट धरून ठेवायला हवी.

ओझं नाहि तर आनंद शोधायला हवा.

बस इतकच…



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!