Skip to content

योग्य कामात स्वतः ला गुंतवून आयुष्य सुंदर बनवता यायला हवे.

केल्याने होत आहे रे….


मनिषा चौधरी | 9359960429


मानवाला लाभलेली उत्तम देणगी म्हणजे तो दुसऱ्यांची सेवा करु शकतो. त्यात स्वतः ला झोकून देवू शकतो. फक्त ही सेवा , मदत निस्वार्थी हवी म्हणजे त्यातुन मिळणारा आनंद हा जगण्याला मोठी उभारी देवू शकतो.

देण्यात, त्यागात मोठी ताकद असते. कुणालाहि केलेल्या मदतीच्या बदल्यात आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा न करता केलेली मदत हीच खरी सेवा ठरते.

करोना महामारीच्या या लाटांच्या विळख्यात माणूस माणसाला पारखा झालाय. प्रत्येकालाच आपले कुटुंब, स्वतः चा जीव महत्त्वाचा असला तरीहि शक्य ती सर्व मदत करणारे देवदूतहि आसपास बघायला मिळत आहेत. कर्म हीच पूजा मानत आपले कर्तव्य बजावत आहेत.

आपले आप्त गमावल्याचे दुःख खूप मोठे आहे. ही परिस्थिती नक्कीच एक दिवस संपेल परंतु तोवर स्वतःला खंबीर बनवत जमेल ती मदत करत रहायला हवी.

आज अनेक उच्चशिक्षित तरुण तरुणींना घरात बसाव लागलय. काहींच शिक्षण अपूर्ण राहिलय. मोठ मोठ्या स्वप्नांकडे उंच भरारी घेत असतानाच अचानक पंखच छाटले गेल्यासारखी अवस्था झालेली आहे. उच्चशिक्षणात वय वाढलेल्या तरुण तरुणींच्या लग्नाचा प्रश्न आ वासून पालकांपुढे उभा आहे.

अशात गिव्ह अप न करता स्वतः ला शांत ठेवणं, स्वतः ला गुंतवून ठेवंणं हे एक मोठ्ठ आव्हानच आहे. अशा वेळी दिड जिबी किंवा अनलिमिटेड डाटाच्या मोहमयी जाळ्यात स्वतः ला जखडून न घेता, आपले प्लस आणि ड्राँ बँक्स शोधून त्यावर फोकस करायला हवा.

ज्या क्षेत्रात पुढे करिअर करायच असेल त्याची तयारी करण्यासाठी सुसंधी समजून प्रयत्न करायला हवेत. स्वतः च्या स्किल डेव्हालमेंट साठी मार्ग शोधावे, घरातच असलो तरी स्वतः ला अपडेट ठेवण्याची सवय रुजवावी.

मानसिक आरोग्यासाठी, योगा, सुर्यनमस्कार, झुम्बा , प्राणायाम यांची मदत होऊ शकते. आवडत्या विषयांवरील पुस्तकांचे वाचन ही तुमचे मनोबल वाढवू शकते. हाताशी असलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे योग्य नियोजन करुन कृती केल्यास, आलेली मरगळ, निराशा कमी होण्यास मदत होईल.

काही काम नाही म्हणून सकाळी जास्त वेळ लोळत न पडता, लवकर निजे लवकर उठे, त्यासी आरोग्य संपत्ती लाभे, या उक्तीनुरुप अनुसरण करावे. नात्यातील, ओळखीतील लहान भावंडांना तुमच्या तील कला online शिकविण्याचा प्रयत्न करावा.

वेळ ही जाईन व सेवेचा आनंद ही मिळेल. आँनलाईन शाँपींगची प्रचंड आवड जडलेल्या तरुणाईने आपल्या गरजा व उपलब्धता ओळखायला हव्यात. उगाचच स्वस्त मिळतय म्हणून अनावश्यक वस्तूंचा कचरा वाढवू नये.

आपल्या कडील गरज नसलेल्या चांगल्या वस्तू, कपडे, पुस्तके, पेन, शैक्षणिक साहित्य कचर्यात न टाकता साँर्टिंग करुन एखाद्या गरजू पर्यंत पोहोचवावे.

टिंव्ही.वर अनेक चँनल्स असतात, व त्याचे रिमोट आपल्या हातात असते तेव्हा आपल्या आवडत्या चँनलवर आपण स्थिरावतो. तसेच आपल्या रोजच्या दिवसातही करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्याचा रिमोट हि आपल्या हातात आहे.

योग्य कामात स्वतः ला गुंतवून आयुष्य सुंदर बनवता यायला हवे. तरुण पिढी व त्यांचे पालक यांच्या तील हरवत चाललेला संवाद जरी ते या काळात कमावू शकले तरी ती खूप मोठी सेवा होईल. चिडणं, राग करण, त्रागा करणं खूप सोप्प असत. कठीण असत ते प्रत्येक परिस्थितीत स्वतः ला शांत ठेवणं.

आपण काय साध्य केलं यापेक्षा कस साध्य केलं यावर आपले भविष्य अवलंबून असते. म्हणून आपल्या वागण्याबोलण्यातील रिसस्पाँन्स वाढवून रिअँक्शन कंट्रोल करण्यावर भर द्यायला हवा. जमेल ती मदत स्वतः ला, कुटुंबाला, समाजाला करत रहायला हवी.

आपल्या धिराच्या शब्दांनी कुणाचे दुःख कमी होण्यास मदत होत असेन तर ती सुद्धा मोठी मदत ठरु शकते. म्हणून च केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!