Skip to content

अपेक्षाभंग झाला म्हणजे आयुष्य संपत नाही !!

अपेक्षाभंग झाला म्हणजे आयुष्य संपते का ?


हेमा यादव-कदम I ७८७५५५०७८९


मानवप्राणी म्हंटले कि वयानुसार अपेक्षा वाढत जातात आणि या अपेक्षा स्वतःपुरत्या मर्यादित नसून त्या इतरांकडून हि केल्या जातात . अपेक्षा करणे हे अजिबात चूक नाही पण अपेक्षा कोणाकडून करायला पाहिजे हे कळायला पाहिजे. जर आपण अपेक्षा केल्या तरच आपण वास्तवात काहीतरी मिळवू शकतो हे १००% खरे आहे .,

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाकडून काही अपेक्षा असतात आणि त्याच बरोबर आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांकडून हि आपण अपेक्षा करत असतो. हा लेख वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला एका प्रश्नाचे मनापासून उत्तर द्या तुम्ही स्वतः स्वतःकडून जितक्या काही अपेक्षा केल्या त्या सर्व तुम्ही पूर्ण करू शकलात का ?

जर तुमचे उत्तर नाही असेल तर मग जर तुम्ही स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसाल तर तुमच्या अपेक्षा इतरांनी पूर्ण कराव्या असा अट्टाहास का असतो तुमचा ? तुम्ही तुमच्या अपेक्षांची ओझी इतरांवर का लादता ? कशासाठी ? जी गोष्ट तुम्ही स्वतःसाठी करू शकत नाही ती गोष्ट इतर कोणीतरी तुमच्यासाठी करावी असे तुम्हाला का वाटत राहते …

आणि यात तुम्हाला काही गैर वाटत नाही खरं हि आश्चर्याची गोष्ट आहे. अपेक्षा करा पण स्वतःकडून करा लोकांकडून नाही … कारण जेव्हा लोक तुमचा अपेक्षा भंग करतात तेव्हा मानसिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत होता आणि जे आयुष्य तुमचे आहे आणि जे तुम्ही आनंदाने जगायला पाहिजे ते लोकांमुळे निराशेच्या गर्तेत नकळत ढकलले जाते .

आपण फक्त स्वतःकडून अपेक्षा करायला पाहिजे कालपर्यंत मी काय होतो/होते आणि उद्या मी कोण असणार आहे बस इतकाच विचार करायचा . स्पर्धा स्वतःशी करायची लोकांशी नाही .. २ दिवस सर्व कामांमधून सुट्टी घ्या . आणि शांत पणे विचार करा. तुमचे पुढील आयुष्य तुम्हाला कसे पाहिजे आहे याचा विचार करा तुमच्या आयुष्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याची यादी करा ..

त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय -काय प्रयत्न करावे लागतील त्याची यादी करा .. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा. स्वतःच्या स्वभाव मधील कमतरता ओळखा. तुमच्या स्वभावातील कोण – कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतील त्याचा विचार करा .. सर्वात आधी स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर द्या.

जो पर्यंत तुम्हाला हे कळणार नाही कि , स्वतःच्या अपेक्षा पूर्ण कशा करायच्या तो पर्यंत तुम्ही इतरांकडून च मदतीची अपेक्षा करत राहणार आणि अपयश आले कि हिरमुसून बसणार  किंवा निराश होणार .. कायम लक्षात ठेवा कि तुमचे यश अपयश हे ८०% तुमच्या विचारांवर अवलंबून असते आणि बाकी २०% म्हणजे तुम्हाला करावे लागणारे प्रयत्न असतात .

आपण कधीही जेव्हा कोणाकडून अपेक्षा करू लागतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मर्यादा आपण कधीही जाणून घेत नाही पण त्या व्यक्तीने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून त्याचा राग – राग  आपण नेहमी करतो.  माझी सर्व मित्र –  मैत्रिणींना विनंती आहे कृपया विनाकारण आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नका ..

तटस्थ पणे जगायला शिका  .. जर कोणी तुमची अपेक्षा पूर्ण नाही करू शकत असेल तर त्यावर रागवण्याआधी हा विचार करा कि माझ्याकडून पण लोक अपेक्षा करत असतील मी किती लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या..? बर लोकांच्या सोडा मी स्वतःच्या तरी अपेक्षा केल्या का पूर्ण ?

जर याचे उत्तर नाही असे मिळाले तर यापुढे कृपया कोणी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही म्हणून त्यावर रागावू नका.  त्यांची भूमिका समजून घ्या. या जगात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचारधारेची असते. फक्त तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणी जन्म नाही घेतला.. म्हणून अपेक्षा फक्त स्वतःकडूनकरायच्या . आणि योग्य नियोजन करून स्वतःची  स्वप्न पूर्ण करा .

धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!