एखादी अडचण समोर येऊन उभी राहिली, तर ती कशी हाताळावी ?
मिनल वरपे
येणारी प्रत्येक वेळ आणि परिस्थिती ही आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देऊन जाते. पण येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाताना बहुतेक वेळी आपल्याला काहीच सुचत नाही.
प्रसंग काही सांगून येत नाहीत हा काही परिस्थिती आपण स्वतःच ओढवून घेत असतो ती अपवाद असते. पण अचानक एखादी समस्या किंवा अडचण आपल्यासमोर येऊन उभी राहिली तर ती परिस्थिती कशापद्धतीने हाताळावी याबद्दल आपण गडबडून जातो.
अनेकदा आपण आलेल्या परिस्थितीत गोंधळतो तर कधी अस्वस्थ होतो. मग अशावेळी आपण काय करावं हे आपण जाणून घेऊयात:
१) शांत राहावे
सुख असो वा दुःख माणसाने प्रत्येक परिस्थितीत शांत राहिलेलं उत्तम. कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे हे बहुधा अवघड असते पण तरीसुद्धा त्वरित प्रतिक्रिया देण्याअगोदर शांत राहून परिस्थिती जाणून घ्यावी,कारण आपण जितके जास्त विचार करू तितके आपण जास्त गोंधळून जाणार.
२) घाईघाईने निर्णय घेणे टाळावे
आपल्यासमोर जी परिस्थिती असेल ती हाताळण्यासाठी आपण पुरेसा वेळ घ्यावा कारण आपण घाईगडबीने चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पछाताप करतो.म्हणून घाई न करता योग्य वेळ घेऊन निर्णय घेणे केव्हाही चांगल.
३) भावनिक होणे टाळावे
समोर आलेल्या परिस्थितीत जास्तीत जास्त practical विचार करणे गरजेचे असते पण आपण त्यावेळी भावनिक होऊन जास्त कमजोर पडतो. समोर असलेल्या वेळेला काय करणे गरजेचे आहे ते महत्त्वाचे त्यावेळी घाबरणे किंवा रडणे अशा आपल्या वागण्याने आपल्याला त्यावेळी काय करावे हे सुचणार नाही.
४) वेळ बदलते
प्रत्येक परिस्थिती ही कायम तशीच राहत नाही यावर आपण पूर्ण विश्वास ठेवायचा.आपले प्रयत्न सुरूच ठेवले की मार्ग आपोआप मिळत जातो आणि नक्कीच परिस्थिती बदलते.
५) खंबीर राहणे
मनातील नकारात्मक विचार पूर्णपणे थांबवून मी ही परिस्थिती बदलू शकतो असा ठाम विश्वास स्वतःवर ठेवला तर नक्कीच आपल्यातील ऊर्जा आपल्या सकारात्मक विचारांना साथ देईल. म्हणून कुठेच न थांबता आणि अजिबात न घाबरता आलेल्या वेळेला तोंड देताना स्वतःला भक्कम विचारांनी धीर देत पुढे जायचं.
६) विचारांना थांबवायचं
एखादे संकट आले तर आपल्या डोक्यात हजारो विचार सुरू राहतात आणि हे विचार आपलं डोकं शांत राहू देत नाहीत म्हणून त्यावेळी विचारांना अजिबात थारा द्यायचा नाही. कारण फक्त विचार केल्याने वेळ बदलत नसते तर त्याला कृतीची गरज0 असते.
आपल्यासमोर असलेली वाईट वेळ असो किंवा परिस्थिती ती नक्कीच बदलेल फक्त त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आलेली प्रत्येक परिस्थिती आपल्यात असलेली क्षमता आणि ताकद याची आपल्याला ओळख करून देत असते.

Online Counseling साठी !
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

