Skip to content

योग्य वेळेची वाट बघायची नसते प्रत्येक वेळ ही योग्यच असते.

योग्य वेळेची वाट बघायची नसते प्रत्येक वेळ ही योग्यच असते.


मिनल वरपे


योग्य वेळेची वाट बघायची नसते प्रत्येक वेळ ही योग्यच असते फक्त आपण कृती करण्याची गरज असते. कोणतीही गोष्ट करताना आपण योग्य वेळेची वाट बघतो पण आपल्याला हे कळत नाही की प्रत्येक वेळ ही योग्यच असते पण आपण कृती न करता हातात असलेली वेळ सहज वाया घालवतो पण तेच जर आपण त्यावेळेत सुरवात जरी केली तरी आपल्यातला विश्वास हा वाढत जातो.

कोणतीही नविन गोष्ट करताना आपल्यात असणारी नकारात्मक भावना:

हे करायला मला जमेल की नाही?? मी हे कधीच केलं नाही किंवा आधी कोणी केलं असेल आणि त्यांना ते जमलं नसेल तर अशा व्यक्तीकडून घेतलेली चुकीची माहिती यामुळे आपल्यातील नकारात्मक भावना वाढत जाते.

भिती:

कोणत्याही गोष्टीची सुरुवात न करताच अपयशाच्या कल्पनेने घाबरणे ही सर्वात मोठी भिती बाळगून आपण कृती करायला घाबरतो आणि ती गोष्ट न करण्याचं कारण मात्र योग्य वेळ हेच सर्वांना सांगतो.

आळस:

आळस हा आपल्यातील ऊर्जा चुकीच्या दिशेला घालवण्याचे काम करतो. आज नको उद्या करतो, उद्या नको परवा करणार अशी चालढकल करत आपण काम करण्याकडे दुर्लक्ष करतो.

इच्छा :

कोणतीही गोष्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे प्रबळ इच्छा मग ते कोणते काम असो नाहीतर अजून काही. जेव्हा आपल्याला एखादे काम करण्याची इच्छा नसेल तेव्हा आपण टाळाटाळ करतो आणि ते काम करत नाही.

वरील सर्व कारण आहेत ज्यामुळे आपण कोणतेही काम/कार्य करत नाहीत आणि कारण देताना फक्त एकच देतो ते म्हणजे योग्य वेळ.

म्हणून कोणतेही काम करताना त्याची सुरवात ही सकारात्मक विचारांनी करायची.कोणाचे कोणतेही अनुभव जरी असले तरी आपल्याला सुद्धा तसेच अनुभव येतील असे नसते.जमेल की नाही असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा जितकं जमेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेन असा निश्चय करायचा.

यश किंवा अपयश हे कायम आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते ना की वेळेवर. आणि कोणतेच प्रयत्न न करता आणि कशाची सुरवात न करता अपयशाची भिती बाळगली तर यशाच्या मार्गावर जाणे तर दूरच राहिलं.

आळस बाजूला ठेवून आपल्यातील ऊर्जा योग्य दिशेला कार्यरत ठेवली तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळेल.म्हणून जेव्हाच काम तेव्हा केलं तर वेळेचं योग्य नियोजन होणार.

जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करण्याची मनापासून इच्छा असेल तर ती गोष्ट करताना आपण स्वतःहून मार्ग शोधून काढतो.

यासाठी कधीच आपण योग्य वेळेची वाट बघायची नसते तर आपले प्रयत्न ,आपली इच्छा आणि आपल्यातील विचार जर योग्य असतील तर नक्कीच आपल्यातील नकारात्मक भावना, मनातील अपयशाची भिती,आपल्यातील आळस दूर होऊन आपलं काम आपण यशस्वी करू शकतो.

कोणतेही काम करण्यासाठी प्रयत्नांची आणि योग्य दिशेची गरज असते.जेव्हा आपण सुरवात करू तीच आपल्या कामाची योग्य वेळ असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!