Skip to content

खूप दुःखी अनुभव आलेला असताना मनाला धीर कसा द्याल !

खूप दुःखी अनुभव आलेला असताना मनाला धीर कसा द्याल !


टीम आपलं मानसशास्त्र


आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी छोटी तर कधी मोठी दुःखे ही घडतंच असतात. कालांतराने आपण त्यातून तारूनही जातो. हळू हळू मनातल्या दुःखांची भावना हि कमी होते आणि आपण पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगू लागतो.

परंतु आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक असा प्रसंग नक्की येतो जो खूप दिवस, महिने आणि वर्ष होऊनही आपल्याला चिटकून राहतो. त्यामुळे आपल्याला त्याचा इतका मानसिक त्रास होतो कि आपले व्यक्तिगत जीवन संपूर्णतः कोलमडून पडते.

सामाजिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरण्याची सुद्धा भीती वाटते. किंबहुना पूर्वीसारखं सामान्यपणे इतरांमध्ये मिसळता येत नाही. कोणाशीही भरभरून बोलूशी वाटत नाही. कोणत्याही आवडीच्या कामांमध्ये आधीसारखं मग्न होता येत नाही.

एखादे काम पूर्ण करण्यासाठी हाती घेतले असता त्यामध्ये सुद्धा एकाग्रता हवी तितकी देता येत नाही. नेहमीपेक्षा लवकर कंटाळा येण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते.

आपलं प्रोफेशनल आयुष्य सुद्धा कोलमडलेलं असतं. अंगावर आलेल्या कोणत्याही कामाबद्दल आधी साशंकता दाटून येते. हे काम माझ्या हातून पूर्ण होईल का ? अशा तऱ्हेतऱ्हेच्या नकारात्मक विचार मनाला व्यापून टाकतात.

याठिकाणी एक महत्वाची गोष्ट नमूद करण्याची म्हणजे जर तुम्ही अशाच मानसिकतेत आणखीन काही महिने स्वतःला लोटत गेलात तर एक गंभीर मानसिक समस्या तुमच्या ठिकाणी निर्माण होईल आणि ती घट्ट होत जाईल.

त्यामुळे वेळीच तुम्हाला जडलेल्या निरर्थक सवयी मोडून काढायला हव्यात. आणि त्यांच्याजागी स्वतःमध्ये नवीन सवयी रुजवण्याची गरज आहे. सर्वात आधी आपण एका मानसिक समस्येच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, हि गोष्ट ओळखणे आणि ती मनापासून स्वीकारणे महत्वाचे आहे.

शांत झोप न लागणे, हवी तशी भूक न लागणे, अतिविचार, भिती, आळस-कंटाळा, एकाग्रतेचा अभाव, कोणतीही गोष्ट आनंद न देणे, प्रचंड चिडचिड, हळवी मानसिकता, जास्त भावनिक होणे, कोणाशीही न पटणे, जास्त कोणाशीही बोलू न वाटणे, घराबाहेर पडू न वाटणे, एकलकोंडा स्वभाव बनणे..इत्यादी.

वरील हि लक्षणे तुम्हाला तुमची सध्याची मानसिकता ओळखण्यामध्ये मदत करू शकतात. तुम्ही मानसिक समस्या अनुभवत आहात हे एकदा ओळखलं कि तुमचं इथे ५०% टक्के काम पूर्ण झालं असं समजावे.

आणि बाकीच्या ५०% टक्क्यांमद्ये तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीनिवडीसाठी, तुमच्या जबाबदाऱ्यांसाठी, भविष्याच्या नियोजनासाठी, करिअरच्या नियोजनासाठी किती आणि कसा वेळ काढताय, यानुसार तुम्ही तुमच्या समस्येमधून किती लवकर बाहेर येऊ शकता, हे ठरत असतं.

त्यामुळे आधी तुमच्या मनात चिंता आणि अतिविचार यांची तीव्रता किती प्रमाणात आहे, याचं मानसशास्त्रीय मूल्यमापन होणं गरजेचं आहे. तुम्ही यासाठी मानसशास्त्र तज्ज्ञ किंवा मानसशास्त्रीय समुपदेशकाची मदत घेऊ शकता.

एकदा का तुमची समस्या तीव्र होऊन जर ती जाणिवेच्या पातळीपासून हरवली तर तुम्हाला मनोविकारतज्ज्ञ कडे जाऊन गोळ्या घेण्यापलीकडे पर्याय उरत नाही.

म्हणून वेळीच मानसशास्त्र तज्ज्ञांचा घेतलेला सल्ला तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकतो. मानसशास्त्रीय समुपदेशनासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून केवळ एक साधा फॉर्म भरल्यास तुम्हाला संपर्क केला जाईल.

 



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “खूप दुःखी अनुभव आलेला असताना मनाला धीर कसा द्याल !”

  1. Harish पिसे

    कोरोना तुन बरा झालो पण आधीसारखी life जगवस वाटत नाही मनात अनेक विचार येतात भीती वाटते

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!