तुम्हाला जे हवंय ते मिळेल.
मिनल वरपे
मला जे हवं ते मिळवता येते पण हे तेव्हाच शक्य असेल जेव्हा माझ्या मनात त्याबद्दल भीती किंवा कोणतीही नकारात्मक भावना नसेल. हे समजायला अगदीच सहज आणि सोप आहे.
आपण रोजची ठरलेली काम कुठेच न चुकता ठरलेल्या वेळेत तसेच ठरल्याप्रमाणे चोख करतो. पण बहुतेक अशा गोष्टी आहेत ज्या करताना आपल्याकडून अनेकदा चुका झाल्या आहेत आणि मग त्या गोष्टी जेव्हापण आपण करायला घेतो तेव्हा मनात विचार ठेवतो की आता मला भीती वाटतेय ?? मला जमेल ना?? मागच्या वेळेस हे करताना मी चूक केली होती पुन्हा तीच चूक माझ्याकडुन होणार नाही ना?? आणि अशा नकारार्थी विचारांमुळे आपल्याकडून कळत न कळत चूक होतेच.
उदाहरणार्थ मला कामावर जायला रोज उशीर होतो आणि त्यामुळे माझे वरिष्ठ मला रोज ओरडतात.आणि माझं हे नेहमीच झालंय त्यामुळे मला त्यामधे बदल करायचा आहे अस आपण ठरवतो. आणि रोज सकाळी लवकर उठून आवरायचं आणि वेळेत कामावर पोहचायच ठरवतो पण तस कधी होत नाही.
याच कारण म्हणजे आपण रात्री झोपताना विचार करतो की मला लवकर उठायचं आहे नाहीतर मला कामावर जायला उशीर होईल, सकाळी उठल्यावर आपण घाईगडबीने आवरायचा प्रयत्न करतो पण मनात भिती असते की मला उशीर नको व्हायला आणि आपल्या मनात सतत उशीर होईल हेच चालू राहते आणि नेमकी तेच घडते.
एकतर आपण उशिरा उठतो कारण लवकर उठायच्या विचाराने आपल्याला लवकर झोप लागत नाही आणि उठल्यावर आपण इतकी घाई करतो की त्या घाईत आपली कामे चुकतात, गोंधळ होतो आणि नकळत उशीर होतोच. कारण आपण आपल्या मेंदूला नकारार्थी सूचना देत असतो.
पण तेच जर आपण रात्री झोपताना कोणतेही नकारात्मक विचार न करता ठरवलं की मला सकाळी लवकर उठायचं आहे.आणि सकाळी उठल्यावर घाईगडबड न करता तेव्हासुद्धा मला वेळेत कामावर जायचं आहे हा एकच सकारात्मक विचार ठेवून जर काम आवरली तर नक्कीच आपण सगळं वेळेत आवरून वेळेत कामावर पोहोचणार.
आपण आपल्या मेंदूला जशा सूचना देतो आपला मेंदू तेच फॉलो करतो त्यामुळे आपण एखादी गोष्ट सतत बोलत असू किंवा एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत असू तेव्हा आपला मेंदू तीच गोष्ट ऐकून आपल्याकडून तसे करून घेत असतो.
म्हणून आता आपणच ठरवावं की आपल्याला कोणते विचार करणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार असो किंवा नकारात्मक विचार आपला मेंदू आपल्याकडून सातत्याने होणाऱ्या विचारांना मार्गी लावण्याच काम करत असतो.

Online Counseling साठी !
लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.
तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


लेख खुप सुंदर आहे
खूप छान माहिती मिळाली ,मी नक्की सकारात्मक विचार करनार.