Skip to content

सासरी त्रास होणाऱ्या आपल्या मुलीला आईची एक छानशी शिकवण !!!

आईची शिकवण……


नवीनच लग्न झालेली एक मुलगी दर वेळेला माहेरी आलं की आई जवळ नवऱ्याची तक्रार करीत असे– तो रागीट आहे, मला समजावून घेत नाही, लहरी आहे, त्याला माझ्या भावना कळत नाहीत वगैरे आईला सांगत असे.
आईने चार पाच वेळेस तिचे ऐकले आणि मग ती मुलीला म्हणाली—
” बाळे, माझं नवीन लग्न झालं, तेव्हा मी देखील या प्रसंगातून गेले, फक्त मी माझ्या आईला असं कधी सांगत नव्हते. मी स्वतः माझी विचार शक्ती वापरली आणि आपोआप परिस्थिती बदलली बघ.”

” म्हणजे कसं “? मुलीने विचारले.

आई हसून म्हणाली—

” मुली, स्त्रीचं खरं चातुर्य नवऱ्याला आपलं करून घेण्यात आहे. मी तुला सल्ला देईन, पण किती दिवस ? लक्षात ठेव, ज्या घरात आपल्याला दिलं आहे, तिथंच आपण रहाणार आणि तिथंच जाणार. तू तुझ्या नवऱ्याचा स्वभाव आधी ओळख, तो कुठे दुःखी आहे हे पहा, त्याचा अहंकार सांभाळ, पुरुष प्रेमाचा भुकेला असतो. तू त्याला थोडासा मान दे, त्याला थोडं स्वातंत्र्य दे, नमतं घ्यायला शिक आणि मग पहा काय चमत्कार होतो ! पुढचे वेळी आल्यानंतर मला मग सांग .”

चार महिन्या नंतर मुलगी पुन्हा माहेरी आली, आल्या बरोबर तिने आईला मिठी मारली, मग ती आईला म्हणाली—

” खरंच ग आई, तुझी शिकवण माझ्या कामी आली. मी स्वतः चा स्वभाव थोडा बदलून घेतला. आता माझ्या नवऱ्या मधे इतका बदल झाला आहे काय सांगू ! मला सोडून तो एक क्षणही रहात नाही, मला मान सन्मान देतो. आणि आई, आणखी एक गोष्ट मी शिकले बघ ”

” कोणती बाळ “?

” हेच,? की आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजेत, थोडी स्वतः ची बुद्धी वापरली पाहिजे. दर वेळी आई वडील तरी काय सांगणार ? शेवटी संसार आपल्याला करायचा आहे.”

मुलीचे ते बोलणे ऐकून आईला खूप कौतुक वाटले आणि तिने मायेने लेकीला जवळ घेऊन कुरवाळले .

आज तिच्या मुली मधे आत्मविश्वास निर्माण झाला होता. मुलगी परत निघाली, तेव्हा ती आई म्हणाली—

” बाळे, ?सगळ्याच मुलींनी जर आपल्या स्वतः च्या बुद्धीने असे घरगुती सोडवले, तर संसार किती सुखी होईल !”


पालकांच्या व्हाट्सऍप समूहात सामील व्हा !

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!