Skip to content

तुमची मुलं योग्य दिशेला आहेत का ?

मूल आणि मोबाईल


मिनल वरपे


हल्ली मुलांनी मोबाईल वापरायचं म्हटलं की अजिबात आश्चर्य वाटत नाही.. पूर्वी कस मुलांनी नुसता मोबाईल हातात घेतला तरी त्या मुलाला तसेच आजूबाजूच्या मंडळींना काय कौतुक वाटायचं…

लॉकडाऊन जस सुरू झालंय तसेच त्या आधीपासूनच मुलांना इंटरनेट च्या नावाखाली मोबाईल द्यावा लागायचा. जास्त माहिती मिळावी, गूगल वर सर्वच मिळते आणि वॉट्स ॲपवर सर्व ग्रुप आहेत आणि त्यामधून रोजचे शाळा क्लास यांचे अपडेट्स मिळतात म्हणून.

मुलांना आता तर सर्व मोबाईल वरच शिकवलं जातं आहे कारण ही काळाची आणि परिस्थितीची गरज झालिये. शिक्षण तर महत्त्वाच आहेच म्हणून ते टाळता सुद्धा येणार नाही.पण यामुळे आपण काही गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष तर करत नाहीत ना याची आपण काळजी घ्यावी. त्या गोष्टी म्हणजे

मुळात ज्यासाठी मुलांना आपण बिनधास्त मोबाईल देऊन आपली काम करतोय तो म्हणजे अभ्यास. काही मुलं फक्त ऑनलाईन लेक्चर्स ऐकतात पण त्यातून काही शिकत नाहीत.त्यामुळे त्यांचा अभ्यास होतोय की नाही याकडे लक्ष द्यावे.

शिक्षक ऑनलाईन परीक्षा घेतात पण घरी बसून परीक्षा द्यायची म्हणजे किती प्रामाणिकपणे असेल ते ज्याच त्याला माहित असणार.म्हणून पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपला मुलगा किती प्रामाणिकतेने परीक्षा देतोय याकडे लक्ष देणे.

अभ्यास झाला की काही मुलं मोबाईल मधेच टाईमपास करत राहतात. हल्ली मुल अभ्यासाच्या निमित्ताने मोबाईल खूप वेळ हातात घेतात आणि त्यामधे गेम तसेच इतर कार्यक्रम बघत बसतात. त्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे लक्ष राहत नाही म्हणून आपणच मुद्दाम त्यांच्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

एकदा मोबाईल हातात असला की मुलांना आजूबाजूला कोण आहे ? आपल्याला काय सांगतात तसेच जरी पालक ओरडत असतील कोणी नातेवाईक आले असतील तरी त्यांचं अजिबात भान नसते त्यामुळे पालकांनी मुलांना नक्कीच स्वतःचा धाक ठेवावा की ते असे वागणार नाहीत.

मोबाईल वर अभ्यास, गेम तसेच इतर टाईमपास यामुळे मुलांना मोबाईल व्यतिरिक्त दुसर जग आहे याची कल्पना सुद्धा राहिली नाही. त्यामुळे पालकांनीच मुलांना वेगवेगळे खेळ शिकवावेत. हल्ली एकत्र येऊन जरी खेळता येत नसेल तरी असे बरेच खेळ आहेत ज्यामधे पालकांना सुद्धा मुलांसोबत खेळता येतात जसे कॅरम, लुडो.

पालकांचा आणि मुलांचं हल्ली संवाद कमी झालाय. आपली मुलं जे मागतात ते त्यांच्या हातात देणे, त्यांना सर्व सुखसोयी दिले म्हणजे सर्व कर्तव्य पार पाडली असे होत नाही. मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्याशी संवाद असेल तर ते आपल्याशी मनमोकळ बोलणार आणि त्यामुळे आपल्याला त्यांना काही गोष्टी न ओरडता गप्पांमध्ये समजावता येतात. आणि असा संवाद असेल तर मुलं सतत मोबाईल मधे न अडकता आपल्यासोबत वेळ घालवणार.

गरज जरी असली तरी प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते म्हणून मुलांना त्यांच्या अभ्यासाकरिता जरी मोबाईल गरजेचा असेल तरी त्या मोबाईल चा योग्य तो वापर होतोय की नाही याकडे लक्ष देणे पालकांचे कर्तव्य आहे. आपली मुलं योग्य दिशेला असावेत असे आपल्याला वाटत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांना योग्य मार्ग दाखवणे, समजावणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुमची मुलं योग्य दिशेला आहेत का ?”

  1. खूप छान माहिती आहे त्यामुळे त्याचा उपयोग करता येईल

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!