Skip to content

नातं बिघडू नये म्हणून नवरा-बायकोने या गोष्टी टाळाव्यात!

नातं बिघडू नये म्हणून नवरा-बायकोने या गोष्टी टाळाव्यात!


मिनल वरपे


कोणत्याही कारणाने का असेना पण घरात भांडण झाल की लगेच त्याचा परिणाम म्हणजे नवरा बायको एकमेकांशी बोलायचं सोडतात. खर तर नवरा बायको हे नात इतकं पक्क असावं की कितीही वाद झाले , घरातलं वातावरण बिघडल की दोघे मिळून सगळ व्यवस्थित करायचं.

पण हेच नात घट्ट कधी नसते याकडे आपण लक्ष नाही देत. आपण आपल्या नात्याला वेळ दिला पाहिजे. पण आपण तसे अजिबात वागत नाही. नवरा बायको च नात भक्कम होण्यासाठी काय करावे याची आपण काळजी घेतो पण हेच नात बिघडू नये आणि त्यासाठी काय करू नये याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो.

१) एकमेकांना गृहीत धरू नये. बहुतेक वेळा आपल्याला आपल्या जोडीदाराला काही गोष्टी सांगायच्या असतात आणि त्या खूप महत्त्वाच्या सुद्धा असतात पण आपण जर सांगितलं तर आपला जोडीदार त्यावर असेच react होणार अस आपण गृहीत धरतो आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी सांगत नाहीत आणि तीच गोष्ट उशिरा कळली तर त्याचे परिणाम आपल्यालाच सांभाळावे लागतात.

२) दोघात तिसरा हा प्रकार शक्यतो टाळलेलाच बरा. याचा अर्थ असा नाही की लग्नाबाहेरील संबंध पण नवरा बायकोच्या नात्यातील वीण घट्ट असावी त्यांच्या नात्यातील गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगायची गरज पडू नये. आपण जेव्हा आपल्या जोडीदाराच्या तक्रारी तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा आपल्या जोडीदाराला ते अजिबात सहन होत नाही. ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतील ते आपण एकमेकांना सांगून त्यामधे बदल करावेत पण तिसऱ्या व्यक्तीला सांगून त्यामधे अजून विषयात वाढ करू नये.

३) मित्र मैत्रीण हा तर खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या जीवनातला.पण आपल्या मित्र मैत्रिणींना किती वेळ द्यावा आणि त्यांच्याशी कस वागावं याच भान आपल्याला असायला हवे. प्रत्येक नात्याच्या मर्यादा असतात जस आपल्याला आपल्या बायकोने तिच्या मित्राशी जास्त गप्पा मारलेल्या आवडत नाही तसेच तीलासुद्धा आपल्या नवऱ्याने त्याच्या मैत्रिणीसोबत नको तेवढ्या गप्पा मारलेल्या आवडत नसणार म्हणून दोघांनी सुद्धा आपल्या जोडीदाराला काय आवडते आणि काय आवडत नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे.

४) संशय हा नात खराब करतो पण हाच संशय निर्माण होईल असे जर आपण वागत असू तर आपलं वागणं चुकीचं आहे हे आपल्या लक्षात यायला हवे. आपण काही गोष्टी लपवत नसतो पण सांगत सुद्धा नसतो त्यामुळे गैरसमज वाढतात आणि संशय निर्माण होतो म्हणून आपणच आपल्या वागण्याची काळजी घ्यावी.

५) काही असे विषय असतात ज्यामधून नक्कीच वाद होण्याची शक्यता असते आणि हे वाद टाळावेत म्हणून आपण ते विषय आपल्या जोडीदाराला सांगत नाही.पण असे न करता आपण आपल्या जोडीदाराला नीट समजावून सांगावं. आणि वाद होईल या भीतीने दोघांमधील संवाद सोडू नये.

६) दोघांचं जर पटत नसेल, सतत वाद असतील तर एकमेकांना दोष देण्यापेक्षा शांत राहाव. आपण आपल्या वादामुळे आपल्या जोडीदारासोबत बोलणं टाळतो तसेच गरज असेल तरी आपण रागाला महत्त्व देऊन एकमेकांना टाळतो. असे न वागता राग शांत करून स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला समजावलं की नात योग्य दिशेत राहते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!