Skip to content

भितीला बाजूला सारून मनाला बळकट बनवूया..

भितीला बाजूला सारून मनाला बळकट बनवूया..


मिनल वरपे


आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. प्रत्येकाचे वय वेगळे, शरीर रचना वेगळी कोणाची प्रतिकार शक्ती वेगळी तर कोणाच्या आजुबाजूच वातावरण वेगळं पण या सगळ्यात वेगळं घडतेय ते म्हणजे आपण प्रत्येकाची तुलना स्वतःसोबत तसेच आपल्या माणसांसोबत करतो आणि स्वतः घाबरतोच पण त्यासोबतच सर्वांनाच घाबरवतो.

आज पाहायला गेलो तर असे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत ज्यांनी कोरोना वर मात करून घरी सुखरूप आले आहेत.मग त्यांचं वय अगदी कमी म्हणजे ५वर्ष असो नाहीतर ९०वर्ष वयाच्या पुढचे सदस्य सुद्धा यातून बाहेर पडून आनंदाने जगत आहेत.

कोणाला शुगरचा त्रास असेल तर कोणाला हृदयरोग तर कोणाला त्याहीपेक्षा जास्त भयानक असे जुने आजार असताना देखील असे लोक सुद्धा कोरोनामुक्त होऊन निवांत जगत आहेत.

पूर्वी सुद्धा असे आजार झाले आहेत ज्यांचे उपचार शोधायला वर्ष लागले पण त्यावेळी मात्र याला झालं म्हणून मलासुद्धा होईल अशी भिती जवळ ठेवून लोक जगत नव्हते.

कोरोना येण्याआधी सुद्धा असे आजार नक्कीच होत शिवाय आहेत ज्यातून बर होणे सहज सोपे नव्हते पण तरीसुद्धा आपण मनाची तयारी करून उपचार घेत होतो.

मला तो आजार झालाय जो बरा होणे जवळजवळ अशक्य आहे तरीसुद्धा मी नाही घाबरणार जास्तीत जास्त प्रयत्न करून त्याचा प्रतिकार करेन हा विश्वास आपण स्वतःवर ठेवत भरपूर आयुष्य जगणारे माणसं आपण स्वतः बघितले आहेत.

मग आता काय झालंय… आज या कोरोनामुळे आपण इतके घाबरतो की त्यामुळे आपण आपली आर्धी ऊर्जा त्या भीतीमुळे वाया घालवतो.पण ही वेळ घाबरायची नाहीये.

कित्येक लोक घरी उपचार करून उत्तम झालेत आणि कित्येक वयस्क व्यक्ती याचा सामना करून घरी बसलेत.

प्रत्येक गोष्टीचा सामना करताना मनात भिती असेल तर सर्व अवघड होते आणि नको तिथे जर आपण दुसऱ्यांशी तुलना केली तर तिथे भिती निर्माण होणारच. म्हणून भीतीला बाजूला सारून मनाला बळकट बनवायचं, घडणाऱ्या चांगल्या गोष्टींना समोर ठेवून मनाला धीर द्यायचा.

आजार कोणताही असो त्या आजाराचा सामना जर सकारात्मकतेने केला तर त्या आजाराला हरवून आपण उभे राहू शकतो.मग जरी कोरोना positive असेल तरी आपल्यातील positive विचार आणि ताकद त्यावर सहज मत करेल.

 



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “भितीला बाजूला सारून मनाला बळकट बनवूया..”

  1. Kushare chandrakant Prabhakar

    Very nice information.It will increase our mind power so we must be think positively
    So don’t worry and frightened.thanks.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!