जो जास्त विचार करतो त्यालाच असं वाटतं कि, मला खूप टेन्शन आहे !
मिनल वरपे
लहान मुलांचं निरीक्षण केलं की आपल्या लक्षात येते की एखादी वस्तू हवी म्हणून जोरजोरात रडणारे ती वस्तू मिळाली की क्षणात हसतात आणि मिळाली नाही तरी काही वेळ रडतात आणि त्यांना एखादी गंमत करून दाखवली की आधीच रडू विसरून लगेच हसतात.
माझ्या भाचीला खेळत असताना अंगावर गरम चहा सांडला त्यावेळी ती नक्कीच कोणीही रडणार कारण वेदनाच तेवढ्या असह्य असतात पण नंतर तिला दवाखान्यात नेलं औषध दिली,मलम पट्टी लावली आणि आम्ही मोठी माणस तिच्याकडे पाहून डोळ्यात पाणी यायचं पण ती मात्र तिच्या खेळण्यात इतकी मग्न असायची की तिचं तिच्या दुखण्याकडे लक्ष नसायचं.
मला तर तीच खूप अप्रूप वाटायचं की कशी सहन करतेय ही आणि इतक्या वेदना होत असताना सुद्धा किती गोड हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे?? खर तर हेच हास्य तिच्या वेदना कमी करण्याचं औषध होत.
आपण बहुतेक चित्रपट तसेच मालिका बघतो त्यामधे असे व्यक्तिमत्त्व दाखवतात जे त्यांचं आयुष्य जगताना खूप हसत खेळत जगतात.त्यांच्या आजूबाजूचे त्यांना परिस्थितीच गांभीर्य दाखवताना आढळतात पण त्यांचा तो गैरसमज असतो कारण हसत खेळत जगतोय म्हणजे परिस्थितीची जाणीव नाही असे होत नसते. खरं तर ते आजूबाजूला त्यांच्या वागण्यातून कळून सुद्धा देत नाहीत आणि आलेल्या वेळेला सामोरे जातात.
आपल्याला सुद्धा बहुतेक वेळा असे वाटते आपण सुद्धा मनमुराध हसावं, बागडाव कधीतरी आपण सुद्धा जबाबदाऱ्या बाजूला ठेवून मनमोकळ जगावं पण …. हा पण च आपल्याला आयुष्यभर त्रास देत असतो.
असे कोणी सांगितले आहे की जबाबदाऱ्या आहेत म्हणून कायम टेन्शन असलेला चेहरा घेऊन जगावं, अडचणी आहेत म्हणून हसणं आणि हसवण सोडावं, चिंता असतील तर त्या चिंतेमधेच अडकून मन मारून जगाव????
सगळ्या समस्यांच उत्तर असते..मुळात जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर तर असतेच पण ते शोधण्यासाठी आपल्याकडे धीर असावा लागतो. एखादी समस्या आली की लगेच त्या विचारात अडकून राहण्यापेक्षा हसत हसत येणाऱ्या समस्यांना तोंड दिलं की आपल्याला कळत सुद्धा नाही की किती मोठी समस्या होती..पण आपण मात्र गंभीर होतो आणि त्या अडचणीचं गांभीर्य वाढवतो.
जो जास्त विचार करतो त्याला नेहमी असेच वाटते की मलाच सगळे टेन्शन आहेत, मलाच सगळे त्रास आहेत पण तो असा विचार करायचं सोडून जेव्हा आनंदाने हसत मनमुराध जगायचा प्रयत्न करेल तेव्हा कोणत टेन्शन कधी येऊन गेलं हे कळणार सुद्धा नाही अगदी जस लहान मुलांचं असते तस..
जबाबदाऱ्या तर सर्वांनाच असतात पण आजूबाजूला पाहिलं तर सगळेच तोंड पाडून जगताना दिसत नाहीत. आणि आपण सुद्धा असेच चेहरे बघायचे जे हसत हसत जगतात आणि आलेल्या आव्हानांना सहज सोडवतात.

Online Counseling साठी !
लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.
तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.

