Skip to content

पर्याय नाही म्हणून कधीही लग्न करण्याचा मार्ग स्वीकारू नये !!

पर्याय नाही म्हणून कधीही लग्न करण्याचा मार्ग स्वीकारू नये !!


मिनल वरपे


माझ्या मैत्रिणीचं एका मुलावर प्रेम होत. ती दिसायला खूप सावळी पण रेखीव खूप जास्त शिक्षण नव्हत पण जितकं शिक्षण घेतलं त्यावर तिला सहज नोकरी मिळाली असती पण प्रेमात पडल्यावर बहुतेकांना कसलं भान राहते अर्थात काही अपवाद ठरतात.त्याचप्रमाणे तीनेसुद्धा शिक्षण आणि नोकरी याकडे दुर्लक्ष केलं.

त्या मैत्रिणीला वाटायचं की माझा प्रियकर दिसायला छान आहे, चांगली नोकरी करतो आणि त्याला सहज कोणतीही मुलगी हो म्हणेल असे असताना देखील तो मात्र माझ्यावर प्रेम करतो. माझ्या रंगाचा त्याला काहीच फरक पडत नाही. किती निर्मळ आणि खर प्रेम आहे त्याच माझ्यावर.

आणि त्या दोघांचं लग्न सुद्धा झालं. पण लग्नात आलेले बरेच मित्र त्याला हसत होते की हा इतका सुंदर आणि बायको मात्र अशी… मागे पुढे होणारी कुजबुज त्याच्या लक्षात आली. पण त्यावेळी त्याने दुर्लक्ष केलं.

पण काही दिवसानंतर तिच्या लक्षात आले की माझा नवरा मला कुठेच बाहेर फिरायला नेत नाही. ना कोणाच्या घरी ना नातेवाईकांना भेटायला.माझ्याशी बोलतो पण त्या बोलण्यात पहिलेसारख प्रेम आणि काळजी दिसत नाही.

तिच्या नवऱ्याच वागणं खूप बदलत गेलं. त्यामुळे तिच्या मनातील जिव्हाळा सुद्धा कमी होत गेला.लग्न केलं म्हणून सोबत राहायचं बाकी त्या नात्यात कोणतीच ओढ राहिली नव्हती.

जेव्हा नवरा बायकोचं नात हे फक्त नावापुरती असते तेव्हा एकमेकांना साथ देणे, एकमेकांची काळजी घेणे, काय हवं काय नको याकडे लक्ष देणे, सुख असो नाहीतर दुःख पण कुठेच न डगमगता आलेल्या वेळेला एकमेकांच्या साथीने तोंड देणे या सर्वांची उणीव त्या नात्यात प्रकर्षाने जाणवते.

म्हणून कधीही गरज म्हणून, अडल आहे म्हणून किंवा क्षणिक आकर्षण म्हणून कधीच लग्न करू नये. कारण आपल्या एका निर्णयाचा परिणाम आपल्यासोबत काहीही चूक नसताना आपल्या जोडीदाराला तसेच आपल्या कुटुंबाला होत असतो.

लग्न करणे ते निभावणे ही साधी सोपी गोष्ट नाही. आपण ज्याच्यासोबत आयुष्यभर साथ देण्याच वचन देतो त्याला आपल्यामुळे त्रास होईल असे वागण्यापेक्षा वेळ घ्या पण निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

कोणाच्याही काहीही बोलण्यामुळे तसेच मनातील चुकीच्या विचारांमुळे आपण घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा आपण आपल्या जोडीदाराला साथ देणे कायम योग्य.

रंग, उंची, शिक्षण, पैसा या सर्वांपेक्षा आपल्या जोडीदाराची आपल्याला असलेली साथ महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा कारणांमुळे विचित्र किंवा विक्षिप्त वागण्यापेक्षा आपल्या जोडीदाराच प्रेम, काळजी आणि स्वभाव महत्त्वाचा… लग्न करून संसार करणे म्हणजे कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता एकमेकांना समजून, एकमेकांना ओळखून आयुष्यभराच अतूट नातं बनवणे महत्वाचे असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!