Skip to content

ठरवलेलं प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काय प्रयत्न करावे ? वाचा टिप्स !

ठरवलेलं प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काय प्रयत्न करावे ?


मिनल वरपे I ९३०७८६७०६७


ठरवलं की सगळं काही होते फक्त जे काही ठरवतो ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ज्या प्रयत्नांची गरज असते त्यांची टाळाटाळ आपण करत असतो. आणि ते करण्याचं कारण एक नसते तर अनेक असतात. विचार करून कायम आपली वेळ आणि ऊर्जा वाया जाते. खालील गोष्टीची तयारी असेल तर नक्कीच आपण एका योग्य मार्गावर जाऊ शकतो:

ठाम विश्वास

आपण जे काही करत आहोत ते पूर्ण करण्याची ताकद आपल्याकडे आहे यावर आपला ठाम विश्वास पाहिजे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट करणे कठीण नाही.पण जर आपण स्वतःवरच अविश्वास दाखवत असू तर सगळं अस्पष्ट आणि अवघड होते. म्हणून पहिले स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे असते.

योग्यता

आपण जे काही करतोय ते योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी आपण केली पाहिजे. कारण जिथे अयोग्य काम करत असू तिथे सुरवातीला यश मिळेल पण नंतर आपल्यालाच त्याचा त्रास होईल.त्यामुळे इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही यासाठी त्या कामाची योग्यता पडताळणे गरजेचे आहे.

सकारात्मक परिणाम

जेव्हा आपण कोणतेही काम करायची सुरवात करतो तेव्हा त्यासोबतच आपल्याकडे त्या कामाबद्दल तसेच स्वतःबद्दल म्हणजेच आपल्या ध्येयाबद्दल सकारात्मकता असणे गरजेचे आहे. मला हे जमणार का? मला अपयश मिळणार तर नाहीना?? असे लहान नकारात्मक विचार सुद्धा आपल्यातील ऊर्जा वाया घालवू शकतात म्हणून पुढचा विचार न करता सकारात्मकतेने कामाची सुरवात केली तर त्याचे परिणाम सुद्धा तेवढेच सकारात्मक असतात.

नियोजन

फक्त विचार केल्यामुळे कोणतेही काम पूर्ण होत नसते तर त्याला जोड हवी असते ती कृतीची. आणि काहीही करायचं जरी असेल तर ते नियोजन न करता केले तर अचानक येणाऱ्या अडचणींना सामोरे जाताना कठीण जाते म्हणून आपण आपल्या कामाचं योग्य ते नियोजन करून सुरवात केली तर मार्गात येणाऱ्या प्रश्नांना सोडवणे अवघड जात नाही.

जिद्द

नको तिथे जिद्द करण्यापेक्षा आपल्या कामाच्या प्रती ते काम पूर्ण करण्याप्रती आपली जिद्द असेल तर ते काम अधिक सोपे होते. कारण कोणतेही काम करताना अडथळे आले की बहुतेक लोक माघार घेतात.पण कितीही अडथळे आले तरी घेतलेलं काम अर्धवट सोडून माघार न घेता ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर आपण यशाच्या वाटचालीत असतो.

इतरांची मते

आपण जे काही करतोय याबद्दल आपण जर इतरांच मत घेत असू तर नक्कीच आपल्याला वेगवेगळं शिकायला मिळते पण सल्ला घेताना तसेच अनुभव ऐकायचे असतील तर त्यांचेच ऐकावेत ज्यांच्या बोलण्यातून आपल्याला प्रेरणा मिळते.नाहीतर असे अनेक लोक आहेत जे आपल्याला नकारार्थी वळणाकडे सहज घेऊन जातात.

पूर्ण ज्ञान

म्हणतात ना Half knowledge is Always Dangerous.. म्हणून कोणतेही काम करण्याआधी त्या कामाबद्दल पूर्ण माहिती म्हणजेच संपूर्ण ज्ञान असणे कायम महत्त्वाचे. आपण अर्धवट माहिती घेऊन सुरवात केली तर आपल्याला येणाऱ्या समस्यांना तोंड देताना कुठे काय करावे? कोणता निर्णय कधी घ्यावा?? अशा अनेक अडचणींच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.

तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!