Skip to content

एका ‘स्त्री’ चे आपल्या पतीला भावनिक पत्र !!!

एका ‘स्त्री’ चे आपल्या पतीला भावनिक पत्र !!!


मिना राव


सहजीवनानंतर एका निवांत क्षणी भावुक होऊन तिला त्याने विचारलं…”काही हवंय का तुला??”

अशा अनपेक्षित प्रश्नाने तारा दचकली, 40 वर्षाच्या संसारात साधं पाणीही न विचारलेला माणूस आज का असं विचारतोय??

कारण आज त्याला जाणीव झाली…. आपल्या जीवनाची नौका किती सहजपणे पार झाली या भ्रमातून सुटून त्या नौकेची नावाडी त्याची बायको होती याची जाणीव.

डोळ्यावरचा चष्मा सुरकूतलेल्या कानामागे सरकवत ती म्हणाली…
“हो, खूप काही हवं होतं… पण योग्य वेळी…आता या वयात काय मागू मी??

लग्न झालं आणि या घरात आले, हक्काचा माणूस म्हणून फक्त तुम्ही जवळचे होते.. पण तुम्हाला ना कधी बोलायला सवड ना माझ्यासोबत वेळ घालवायची आवड…सतत आपले मित्र, नातेवाईक आणि भाऊ बहीण…आपल्याला एक बायको आहे…तिच्या काही मानसिक गरजा आहे…ते तुम्ही ओळखून मला तुमच्याकडून मानसिक ऊब हवी होती…

घरातली कामं करून दमायचे, आल्या गेल्याचं जेवण, नाष्टा, पाणी, त्यांचा मुक्काम.. अंगावर ओढून घ्यायचे….कितीतरी स्वप्न पाण्यावर सोडायचे, आजारपण अंगावर काढायचे, जीव नकोसा व्हायचा, पण संसाराचे नाव येताच त्राण परत आणून पुन्हा सज्ज व्हायचे…

त्यावेळी गरज होती मला, 2 शब्द फक्त विचारपूस केली असती तर पुढची 40 वर्ष जोमान आणि आनंदाने जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या….
तुमच्या घरात जेव्हा सर्वजण एका बाजूला राहून माझ्यावर खापर फोडायचे, मला एकटं पाडायचे, तेव्हा मला गरज होती ती तुमची… तुम्ही मात्र तटस्थ….तेव्हाची झालेली जखम आजतागायत मनावर ओली आहे, वेळ निघून गेली, आता कशी पुसणार ती जखम??

गर्भार असतांना माझ्या आई वडिलांवर जबाबदारी टाकून मोकळे झालात, पण माझे डोहाळे पुरवायचे तुमच्याकडून राहून गेलेत..त्या 9 महिन्यात तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवावा.आपल्या बाळाशी बोलावं…..ते हवं होतं मला तेव्हा…आज काय मागू मी??

माझंही शिक्षण झालं होतं, मलाही काहीतरी करून दाखवायचं होतं.. तेव्हा प्रेरणा हवी होती, आधार हवा होता तुमचा….आज सगळं संपून गेल्यावर काय मागू मी???

मुलांमागे धावताना, त्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकताना तुम्ही माझा भार जरा हलका करावा हे हवं होतं मला, तेव्हा शरीराची जी झीज झाली त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत…आज ती वेळ निघून गेल्यावर कसे पुसणार ते व्रण???

संसाराच्या नावाखाली झालेला अन्याय मी पदराआड लपवला…तुम्हाला कसली शिक्षाही नाही मिळणार, मी कोण तुम्हाला शिक्षा देणारी?? पण एका स्त्री चं आयुष्य तुम्ही तुमच्या गरजेखाली पणाला लावत तिचं आयुष्य व्यर्थ घालवलं याची नोंद मात्र त्या विधात्याकडे अबाधित असेल…

एका स्त्रीचे आपल्या पतीला पत्र….
माफक अपेक्षा…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

15 thoughts on “एका ‘स्त्री’ चे आपल्या पतीला भावनिक पत्र !!!”

  1. लेख खूप छान आणि वास्तवादी आहे. कितीतरी स्त्रियांची कहाणी आहे.

  2. अगदी स्वतः ची कहाणी वाटली .मन भरुन आलं.

  3. आज काल पुरुष ही संसारा साठी तेवढेच झीझतात , घरकाम करतात , मुलांचे संगोपन करतात पन भावनिक सहान भूतीं महिलांनाच फ़क्त मिळते . त्यांचा कोण विचार करणार , फ़क्त पुरुष strong असायला पाहिजे म्हणून मानसिक त्रास कसा लपवनार

  4. हा लेख मागच्या पिढीसाठी योग्य आहे. आता तस काही नाही राहील आहे. आजकालच्या स्त्रिया सांभाळून किंवा ऍडजस्ट करण्यातला नाहीत. त्या लगेचच काही पर्याय शोधतात टोकाचं निर्णय घेवून मोकळ्या होतात

  5. जुन्या काळासाठी म्हणजे मागच्या पिढीसाठी योग्य, या तरुण मुलीसाठी हे लेखन सुट होत नाही, तिच्या गरजा वेगळ्या आहेत,

  6. अयोग्य लेख वाटतो. वाचल्यानंतर सर्व पुरुषांना एका Category मध्ये टाकल्यासारखे वाटते. असे लेख वाचल्यानंतर सारासार विचार न करु शकणार्‍या महिलांना आपल्या नवर्‍यातील अवगुण तेवढे दिसणार.

  7. काही अपवाद वगळता प्रत्येक महिलेच्या भावना आहेत या लेखात…….. खूपच छान….

  8. Sanjay hippale ,chakur

    खुप छान जिवनाची काहनी एका ओळिने कितेक नवरा बायकोचे जिवन सुधरेल पण हे दोघना कळल्यानंतर पेयतने करेणे हेम्हत्हवाचे आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!