Skip to content

परीक्षा रद्द ! पालकांनो सकारात्मक राहण्यासाठी या टिप्स वाचा !!!

पालकांनो सकारात्मक राहूया.


मनीषा चौधरी


दहावी बोर्ड परीक्षा रद्द झाल्या आणि अनेक मत मतांतरे टि. व्ही., वर्तमानपत्रे, आणि सोशल मीडियावर धडकू लागली. करोंना महामारीमुळे मागील वर्षी फक्त एक दोन विषयांचे पेपर रद्द झाले होते. यावेळी मात्र संपूर्ण परिक्षाच रद्द झाल्याने काहींना आनंद आहे तर काहींना खूप वाईट वाटलेले आहे.

आता पुढे काय होणार? मुलांचे अँडमिशन कसे व कुठे घ्यायचे? ते कुठल्या आधारावर घ्यायचे? मुलांच्या भविष्याचे काय? हुशार मुलांचे खूप नुकसान झाले राव! अशा आशयाचे गहन(?) संभाषण पालक करताना दिसताय.

मुळात हुशार मुले म्हणजे कोणती? ज्यांना ९९% १००% मिळतात ती हुशार असा सर्व साधारण पगडा आहे समाजमानवर. जेवढे जास्त मार्क्स तेवढे मुलं हुशार. हे मार्क्स ठरतात परीक्षेवरून. म्हणूनच परीक्षाच रद्द तर हुशार मुलांचे केवढे प्रचंड नुकसान झाल्याचा सुर आळवला जातोय.

परंतु पालकांनी हे विसरता कामा नये की प्रत्येक मुल हे हुशारच असते. प्रत्येकात काही न काही कलागुन हे असतातच. केवळ परीक्षा व मार्क्स यावरून हुशारी ठरवणे योग्य नाहीच. दहावीत अपयशी ठरलेल्या अनेकांनी पुढे उज्ज्वल भविष्य घडविल्याची असंख्य उदाहरणे समाजात आहेत.

करोंनामुळे संपूर्ण वर्षभर मुले घरीच होती. जमेल तसी ऑनलाइन ऑफलाइन अभ्यासाची प्रचंड मेहनत मुलांनी घेतलेली आहेच. शाळा आणि पालक यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रयत्न केलेच आहेत.

परंतु करोंना महामारीच्या या दुसर्‍या तिसर्‍या लाटेपुढे जनजीवन हतबल झाले आहे. अशा भयंकर वातावरणात जीव वाचवणे, सुरक्षित राहणे ही सर्वात मोठी गरज आहे. त्या पुढे परीक्षा मार्क्स यांना कितीसे महत्व द्यावे? गेले एखादे वर्ष तसेच तर कुठे एवढे मोठे नुकसान होणार आहे?

ज्या मुलांनी अभ्यासात प्रचंड मेहनत घेतलेली आहे, ज्ञानाचा उपयोग त्याला भविष्यात नक्कीच होईल. प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम हा पुढील वर्गाचा पायाच असतो. ती मेहनत वाया कशी जाईल? पालकांनीच पुढे होऊन मुलांना समजाऊन सांगायला हवे.

आपल्या पाल्यांशी चर्चा करायला हवी. मुलांचे मनोबल वाढवणे ही सर्वात मोठी जवाबदारी आहे. शाळा, अभ्यास, शिकवणी, विविध क्लासेस च्या चक्रात फिरणार्‍या मुलांच्या आयुष्यात आलेली ही पोकळी त्यांच्यासाठी नवीनच आहे.

समोर आलेल्या प्रत्येक परिस्थिति कडे सकारात्मकतेने बघण्याची नजर पालकांनीच आपल्या मुलांना द्यायला हवी. भविष्यातही अशा समस्या उद्भवू शकतात, त्यासाठी आपल्या मुलांना शारीरिक मानसिक दृष्ट्या खंबीर बनविण्याची ही संधीचा समजावी.

आधी कसे आई बाबा कामावर जाणारे, विभक्त कुटुंब, मुलांना शाळा आणि क्लासेस साठी डबे तयार करून ठेवणे व त्यांची जाण्यायेण्याची सोय केली की पालकांची जवाबदारी संपलेली असायची. अगदी शेतात जाणारे आई बाबाही मुलांना शाळेत पाठवून दिवसभर निश्चिंत होवून जायचे.

मुलांची आणि पालकांची भेट होणार ती संध्याकाळीच. सगळेच थकलेले असत. प्रत्येकाला आपापली कामे, वेळ कमी. त्यात संवाद हरवत चालल्या सारखे वाटायचे. मिळालेली सुट्टी ही कुठेतरी बाहेर फिरायला जावून फोटो काढण्यात वेळ घालवला जात असे.

सध्या एकदम विरुद्ध वातावरणाचा ताण सर्वांवर आलाच. पण पुन्हा सरावलोच न आपण? पुन्हा संवादाच्या कौटुंबिक मैफिली जमवता आल्या. फक्त त्या कायम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न आवर्जून व्हायला हवेत.

हे वातावरण नक्कीच बदलणार आहे. या महामारीचे संपूर्ण उच्चाटन होऊन पुन्हा जनजीवन सुरळीत होईल तेव्हा मुलांना विविध परीक्षांना सामोरे जायचेच आहे. आपली मुले समाजमाध्यमामध्ये पुरती गुरफटली जाणार नाही याची ही खबरदारी सध्या पालकांनी घ्यायला हवी.

मुलांना चौफेर वाचनाची, ज्ञान मिळवण्याची सवय लागण्यास मदत करावी. दहावी नंतर मुलांना ज्या फील्ड मध्ये जाण्यात रस असेन त्या विषयीचे ज्ञान आत्मसात करण्यात हा वेळ उपयोगात आणावा. प्रतिकार क्षमता वाढविण्याचे महत्व समजाऊन सांगावे. सर्व फळे, भाज्या किंवा उपलब्ध असेन ते आनंदाने खाण्याची सवय पुन्हा रुजवावी.

चांगल्या संस्कारांचे महत्व कधीच कमी होऊ शकत नाही.ते पुन्हा रुजविण्यास हे दिवस बोनस समजावे. आपली आर्थिक परिस्थिति मुलांजवळ मोकळेपणाने बोलावे. उपलब्ध परिस्थितीतही एकमेकांच्या सोबत आपल्या कुटुंबात आनंदी राहू शकतो याचा विश्वास निर्माण करावा.

आरोग्यासाठी आवश्यक नियम मोडून पालकच जर विनाकारण घराबाहेर फेरफटका मारत असतीन तर मुलांवरही चुकीचे संस्कार होऊ शकतात. टेंशन मुळे किंवा वेळ जात नाही म्हणून पालक व्यसन करत असतीन तर मुलांच्या मनावर चुकीच्या विचारांचा पगडा बसू शकतो.

आपले मूलं पुढे कसे घडावे, तसे वर्तन आज पालकांनी मुलांसमोर ठेवणे गरजेचं आहे. कारण आज संपूर्ण चोवीस तास मुले पालकांच्या संपर्कात आहे.

सतत सगळ्या गोष्टींना नावे ठेवण्याच्या सवयीने नकारात्मकता मनात साठत जाते. त्यामुळे परीक्षा , अँडमिशन, संदर्भात नक्कीच काहीतरी चांगले निर्णय घेतले जातील हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करावा.

पर्यावरण , प्रदूषण, पृथ्वी संवर्धन अशा जागतिक समस्यांवर मुलांशी चर्चा कराव्यात. त्यांनाही या विषयांवर विचार करण्याची सवय रुजवावी. हीच मुले पुढे देशाचे भविष्य असणार आहे, त्यांची संवेदनशीलता हरवणार नाही यावर ही कटाक्षाने लक्ष द्यावे.

मिळालेला रिकामा वेळ टि.व्ही. किंवा सोशल मीडियावर पडीक राहण्यासाठी नाही तर व्यक्तिमत्व विकासासाठी सत्कारणी लावला जाऊ शकतो, याची जाणीव मुलांना करून द्यावी.

बाहेर जाऊन खेळायला न मिळाल्या मुलं त्यांची ऊर्जा सोशल मीडियावर वाया घालवणार नाही याचीही काळजी घ्यावी. आणि महत्वाचे, मूलं म्हणजे त्यात मुले आणि मुले दोहोंचा समावेश आलाच. तेव्हा मुलींना परीक्षा नाही, पुढे कसे होणार म्हणून, तिला शिक्षणापासून वंचित करून लवकरच तिचे लग्न करून देण्याचा विचार पालकांनी मनाला स्पर्शू देऊ नये.

आपली मुले ही आपली जवाबदारी आहे. त्याचे ओझे मानू नये.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!