मैत्रिणीचं स्टेटस पाहून ती नवऱ्याकडे डिमाण्ड करायची !!

मैत्रिणीचं स्टेटस पाहून ती नवऱ्याकडे डिमाण्ड करायची !!


मिनल वरपे


आज वय कोणतंही असो पण मोबाईल आणि वेगवेगळे सोशल ॲप यामार्फत जुन्या मित्र मैत्रिणींची मेसेज आणि कॉल वरून बोलणं होते. शाळेचे, महाविद्यालयातील मित्र मैत्रिणी यांची अचानक ऑनलाईन भेट होते.

रुपालीचं सुद्धा असच झालं.. घरात नविन मोबाईल आणल्यावर उत्साहाने त्यामध्ये बघताना फेसबुक मार्फत एका शाळेतल्या मैत्रिणीच अकाउंट दिसलं. नंतर तिथेच दोघी रोज गप्पा मारायच्या. पण रुपाली सतत तिच्या मैत्रिणीने फेसबुक वर शेअर केलेले घराचे तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो बघून नवऱ्याच्या मागे लागायची.

मला सुद्धा माझ्या मैत्रिणीसारखं घर पाहिजे, ती जसे दागदागिने घालते अगदी तसेच मला पण हवेत आणि हे हट्ट करताना तिला वस्तुस्थितीच भान राहिलं नव्हतं. पण तिचे हट्ट पूर्ण करणे तिच्या नवऱ्याला शक्य नव्हते म्हणून तो नेहमी शांत बसायचा.

रुपालीच्या नवऱ्याचा तिच्यावर खूप जीव. तिला थोड काही लागलं तरी त्याला ते सहन व्हायचं नाही. आर्थिक परिस्थिती जरी बिकट असली तरी त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम मात्र भरभरून होत. नवऱ्याची काळजी, त्याच प्रेम, त्याचा समजून घेण्याचा स्वभाव तसेच रुपाली ला कायम आनंदी ठेवण्यासाठी त्याची सतत धडपड चालूच असायची.

पण जेव्हापासून मैत्रिणीचे फोटो पाहिले तेव्हापासून तिला नवऱ्याच प्रेम वैगेरे काहीच दिसेनासं झालं. ती भौतिक सुखासाठी त्याच्याशी वाद करायची.पण तो जेवढं शक्य तेवढं करण्याचा आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करायचा पण ती काही ऐकत नसे.

एकदा अचानक रुपाली आणि तिच्या मैत्रिणीची भेट झाली. तेव्हा तिच्या मैत्रिणीने बोलता बोलता सहज सांगितल की माझ्याकडे इतकं सगळं असून त्याचा काहीच उपयोग नाही. कारण ते सर्व मिळवण्याच्या धडपडीत आम्ही दोघं एकमेकांना अजिबात वेळ देऊ शकत नाही. आमच्यात कधी नवरा बायको सारखा संवाद नसतो मग तर प्रेम, काळजी हे तर लांब राहील. जगात सगळं विकत घेता येते पण प्रेम, काळजी आणि सुख हे विकत घेता येणार नाही.

त्यावेळी रुपालीच्या लक्षात आले की आपण हीच वरवर सुख बघून खूप आकर्षित झालो पण आतून ती सुखी असेल की नाही हे या फोटोत कधी दिसतच नाही. त्या क्षणाला तिने तिच्या नवऱ्याला जाऊन घट्ट मिठी मारली आणि सांगितल की आपल्याकडे वरवर दिसणाऱ्या सुख सोयी नसतील तरी चालेल पण आपल नात्यात मात्र प्रेम, काळजी, उत्तम संवाद, समजदारी ,एकमेकांना वेळ देणे, सांभाळून घेणे हे सर्व मला कायम पाहिजे.

खरचं हल्ली असच चाललय कोणाचे स्टेटस चे फोटो बघतो आणि आपल्याला लगेच वाटते की किती सुख आहे त्या व्यक्तीकडे पण असे फोटो काढले, घर वरून कितीही सजवल तरी त्याचा काहीच उपयोग नसतो करण खर सुख आणि खरा आनंद हा आतून असला पाहिजे.

नात कोणतही असो त्या नात्याची श्रीमंती ही त्या नात्यातील आपुलकी आणि जिव्हाळा यावर अवलंबून असते. पैसा, गाडी, बंगला यामधे आनंद नसतोच मुळात कारण ते कधीही मिळवता येते आणि कायम टिकेल याची खात्री सुद्धा नसते. खरा आनंद तर एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यात, समजून घेण्यात आणि निरपेक्ष मनाने जे आहे ते स्वीकारण्यात असतो.Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.